सेलिना जेटलीच्या जुळ्या मुलांमधील एकाचा झाला मृत्यु, जुळी मुलं झाल्यास काय काळजी घ्यावी?

Spread the love

काही दिवस आधी अभिनेत्री सेलिना जेटली हिने सोशल मीडियावर आपल्या लहान मुलगा आरथुरच्या जन्मदिनाचा फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सेलिनाने आरथुरला ‘मिरॅकल बॉय’ असं म्हटलं होतं. आता तीने आरथुरला असं का म्हटलं याची कहाणी नंतर उलगडली आणि ती आपण जाणून घेऊयाच पण त्यासोबतच गर्भात जुळी मुलं असताना किंवा जुळ्या मुलांचा जन्म झाल्यानंतर पालकांनी कोणत्या प्रकारची काळजी घेणं आवश्यक असतं हे पण आपण जाणून घेऊया. कारण आई-बाबा बनणं हे कोणत्याही जोडप्याच्या आयुष्यातील सर्वात खास आणि अवर्णनीय क्षण असतो.

आई-बाबा बनण्यासाठी कित्येक जोडपी प्रचंड मेहनत घेतात म्हणजेच आपली जीवनशैली, खाणंपिणं, झोपणं-उठणं, डायट सारं काही बदलतात. जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा ते आपल्या बाळाला हाताच्या फोडाप्रमाणे जपू लागतात. काही काही वेळेस देव जुळ्या मुलांच्या माध्यमातून जोडप्यांना दुप्पट आनंद देतो. पण हा आनंद चिरंतर काळ टिकावा यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कारण जुळी मुलं ब-याचहा नाजूक आणि शारीरिकरित्या अविकसित असतात. खूप काळजी घेऊन त्यांना नवीन जीवनदान द्यावं लागतं अन्यथा दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. चला तर जाणून घेऊया जुळी मुलं झाल्यास काय काळजी घ्यावी.

जुळी मुलं होती पण…!

अभिनेत्री सेलिना जेटली दोन वेळा प्रेग्नेंट झाली आहे. दोन्ही वेळेस तिला जुळी मुलंच झाली. पण दुस-या प्रेग्नेंसी वेळी जुळ्या मुलांचा जन्म होताच त्यातील एका बाळाचा मृत्यु झाला होता. आरथुर त्या दोन मुलांपैकी दुसरा म्हणजेच सेलिनाचा छोटा मुलगा आहे. आरथुरलाही तब्बल दोन महिने इन्क्युबेटर मध्ये ठेवलं गेलं होतं. तेव्हा कुठे आरथुरला नवं जीवनदान मिळालं. हेच कारण आहे ज्यामुळे सेलिना जेटली आपल्या छोट्या मुलाला म्हणजेच आरथुरला ‘मिरॅकल बॉय’ असं म्हणते.

(वाचा :- गर्भपात होण्याची कारणे, लक्षणे आणि संकेत!)

जुळी मुलं झाल्यास काय करावे व कॅलरीज किती घ्याव्या?

जुळी मुलं गर्भात असताना महिलांना अधिक सावधानता बाळगण्याची गरज असते. कारण यावेळी ती महिला एक नाही तर दोन दोन जीवांना आपल्या जीवावर जगवत असते त्यामुळे त्या दोन्ही मुलांना समप्रमाणात पोषक तत्वे मिळणं अत्यंत आवश्यक असतं. या काळात काळजी घेतल्यास सुरक्षित डिलिव्हरी होऊ शकते. तसंच लोकांमध्ये ही अफवा पसरलेली आहे की ज्या स्त्रिच्या गर्भात एक नाही तर दोन जीव असतील तिने कॅलरीजची मात्रा देखील दुप्पट प्रमाणात घ्यावी जे की चुकीचं आहे. प्रेग्नेंसी न्‍यूट्रिशियन गाइडलाइंस गर्भात वाढत असणा-या बाळाच्या संख्येवर नाही तर कंसीव करतेवेळी आईच्या शरीरातील मास इंडेक्सवर अवलंबून असते. त्यामुळे आपल्या आहारात गरजेपेक्षा जास्त कॅलरीज अजिबात सेवन करु नका.

(वाचा :- वयाच्या ३७ व्या वर्षी ऐश्वर्या झाली होती आई! या वयात आई बनण्याचे काय आहेत धोके?)

प्रेग्नेंसीतील जोखीम समजून घ्या

जुळी मुलं झाल्यास बहुतांश वेळा डिलिव्हरीतील जोखीम वाढते. यामध्ये आईला आराम करण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये प्रीटर्म लेबर आणि सिझेरियन डिलिव्हरीचा धोका असतो. त्यामुळे स्वत:ची खूप काळजी घेणं आवश्यक आहे जेणे करुन जोखीम टाळता येईल.

(वाचा :- नॉर्मल डिलिव्हरी हवी असल्यास करा बद्धकोणासन, आई व बाळ राहिल स्वस्थ!)

अ‍ॅक्टिव राहा

अ‍ॅक्टिव राहिल्याने शरीर योग्य रितीने काम करु शकतं आणि स्नायू व कंबरेच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो. योग केल्याने स्नायू मजबूत व लवचिक होतात आणि डिलिव्हरीसाठी तयार होण्यास मदत मिळते. यामुळे जेस्टेशनल डायबिटीजचा धोकाही कमी होतो. त्यामुळे जितकं शक्य आहे तितकं या नऊ महिन्यांमध्ये अ‍ॅक्टिव राहा आणि एक्सरसाईज करा. तसंच प्रेग्नेंसीमध्ये पायी चालणंही लाभदायक असतं.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये ‘या’ गोष्टींचा विचार करुन भावूक होतात महिला!)

झोपण्याची पद्धत

ब-याच महिलांना प्रेग्नेंसीच्या २० व्या आठवड्यात कुशी होऊन झोपण्याचा सल्ला दिला जातो पण जुळी मुलं गर्भात असतील तर १६ व्या आठवड्यापासूनच त्या स्त्रिला कुशी झोपण्यास सांगितलं जातं. गर्भाशयाचा आकार वाढल्याने रक्तवाहिन्या दाबल्या जातात. ज्यामुळे ह्रदयास होणारा रक्तपुरवठा अवरोधित होतो. यामुळे कमजोरी किंवा चक्कर येऊ शकते. सोबतच सामान्य ते तीव्र सूजही येऊ शकते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये घरच्या घरी तयार करा आपलं ब्युटी पार्लर! असे बनवा विविध DIY फेस मास्‍क/पॅक)

डायटची काळजी घ्या

साखरेचे पदार्थ किंवा स्नॅक्स आणि फ्रिजमधील थंड पेय पिऊ नयेत. जुळी मुलं असताना महिलांमध्ये एनीमियाचा धोका अधिक असतो. अशावेळी तुम्हाला आर्यन सप्लीमेट्स दिले जाऊ शकतात. रेड मांस, हिरव्या पालेभाज्या, बिन्स, फोर्टिफाईड धान्याने लोहाची पूर्तता केली जाऊ शकते. गर्भवती महिलांसाठी लोह अत्यंत आवश्यक असतं. यामुळे त्याची डायट किंवा आर्यन सप्लीमेंट्स द्वारे पूर्तता करणं आवश्यक असतं.

(वाचा :- Pregnancy glow : प्रेग्नेंसीमध्ये महिलांच्या चेह-यावर का येतं चंद्रासारखं तेज?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *