सोनमच्या लग्नात जॅकलीनने परिधान केला होता साडेसात लाख रुपयांचा लेहंगा, तर करीनाच्या ड्रेसची होती एवढी किंमत

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचे (Sonam Kapoor) लग्न थाटामाटात पार पडले. या सोहळ्यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमधील मोठ-मोठ्या दिग्गजांनीही हजेरी लावली होती. सोनम कपूरने बीटाउनमधील खास मंडळींना आपल्या विवाहसोहळ्याचे निमंत्रण दिले होतं. यामध्ये जॅकलीन फर्नांडिस आणि करीना कपूर यांच्या नावाचाही समावेश होता.

या दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी गुलाबी रंगाच्या पोषाखाची निवड केली होती. आता आपल्या जवळच्याच मैत्रिणीचे लग्न म्हटल्यावर आपले आउटफिट सुद्धा खास आणि आकर्षक असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आउटफिटसाठी कितीही पैसा खर्च करण्यास स्टार मंडळी तयार असतात. दरम्यान करीना आणि जॅकलीनला आपल्या स्टायलिश लुकसोबत तडजोड करणं अजिबात पसंत नाही.
(VIDEO जेव्हा देसी गर्ल प्रियंकाने परदेशी महिलेला शिकवलं केवळ ३ पिनच्या मदतीनं साडी नेसणं)

​सिल्क पॅटर्नचा होता जॅकलीनचा लेहंगा

करीना आणि जॅकलीनचे आउटफिट अनिता डोंगरे यांनी डिझाइन केले होतं. जॅकलीन फर्नांडिसचा लेहंगा सिल्क फॅब्रिकपासून तयार करण्यात आला होता. गडद गुलाबी रंगाच्या या पारंपरिक पोषाखाच्या स्कर्टवर तुम्ही क्लासिक फ्लेअर्ड डिझाइन पाहू शकता. हाफ स्लीव्ह्ज मॅचिंग ब्लाउजला मोहक लुक देण्यासाठी जूल कट नेकलाइन डिझाइन देण्यात आलं होतं. तर लेहंग्याच्या ओढणीवर मॅचिंग बॉर्डर लावण्यात आली होती.

(इतक्या वर्षांनंतर जेव्हा माधुरी दीक्षितच्या स्टायलिश ड्रेसबद्दल ट्रोलर्स म्हणाले, ‘अखियाँ मिलाऊँ या चुराऊँ…’)

लेहंग्याच्या डिझाइनचे काय आहे वैशिष्ट्य?

जॅकलीनच्या लेहंग्यावर जरी, गोटा पट्टी, सीक्वंस आणि मोत्यांपासून विणकाम करण्यात आलं होतं. याच्या मदतीने संपूर्ण आउटफिटवर वृक्ष, पाने आणि फुले यांचीही डिझाइन जोडण्यात आली होती. सुंदर धागे आणि शुद्ध सिल्कपासून तयार केलेल्या या लेहंग्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. अनिता डोंगरे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार या पोषाखाची किंमत ७ लाख २८ हजार रुपये एवढी आहे. वेबसाइटवरील माहितीनुसार हा लेहंगा ग्राहकांच्या मागणीनुसार तयार केला जातो आणि यासाठी जवळपास ८ आठवड्यांचा कालावधी लागतो.

(ऐश्वर्या रायची ७५ लाख रुपयांची लग्नातील साडी, मौल्यवान खडे व सोन्याच्या धाग्यांचा केला होता वापर)

सोनम कपूरचा सुंदर डिझाइनर लेहंगा

सोनम कपूरचा लुक

​करीना कपूरचा गुलाबी रंगाचा ड्रेस

तर करीना कपूरने (Kareen Kapoor Khan) गुलाबी रंगाचा सुंदर सूट परिधान केला होता. हा ड्रेस अनिता डोंगरे यांनी अतिशय नाजूक फॅब्रिकपासून तयार केला होता. करीनाचा हा सूट नेट बेस्ड होता, ज्यामध्ये नायलॉन कापडही वापरण्यात आलं होतं. यावर गोटा पट्टी, मोती आणि सीक्वंस वर्कही तुम्ही पाहू शकता.

(अंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का?)

​करीनाच्या ड्रेसची किंमत

करीनाच्या या ड्रेसवर आकर्षक एम्ब्रॉयडरी दिसत आहे. क्लासिक फ्लेअर्ड फॉल असणाऱ्या या आउटफिटवर कमीत- कमी वर्क असणारी ओढणी मॅच करण्यात आली होती. या लुकमध्ये करीना नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती.

(Kareen Kapoor Birthday करीना कपूरने बर्थडे सेलिब्रेशनसाठी परिधान केला होता हा महागडा स्टायलिश ड्रेस)

या ड्रेसवर तिनं केवळ स्टेटमेंट ईअररिंग्स घातले होते. हेअर स्टाइल म्हणून साधा अंबाडा बांधून त्यावर गजरा माळला होता. अनिता डोंगरेंच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार या ड्रेसची किंमत एक लाख ४४ हजार रुपये एवढी होती.

(‘सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना’, अली फजलच्या टी-शर्टनं वेधून घेतलं लक्ष)
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *