उत्साह शिगेला
सोहाची मुलगी इनाया दरवर्षी बाप्पाला बघत असते आणि आता जस जशी ती मोठी होती आहे तसतश्या बऱ्याच गोष्टी तिला कळू लागल्या आहेत. त्यामुळेच बाप्पा येणार या आनंदाने तिचा उत्साह गणेशोत्सवाच्या आधीपासूनच शिगेला पोहोचलेला होता आणि आता जेव्हा गणेशोत्सव सुरु झाला तसा तिचा आनंद गगनात मावत नाही आहे. वडील कुणाल खेमूने सुद्धा तिचा हा आनंद कमी होऊ दिला नाही आणि घरच्या घरी ते थाटात गणेशोत्सव साजरा करीत आहेत.
(वाचा :- पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर घाबरलेल्या मुलीला याविषयी अशी द्या योग्य माहिती!)
प्रत्येक सणाचे महत्त्व समजावले

सोहा आणि कुणाल या दोघांनी इनायाला प्रत्येक सणाचे महत्त्व सांगितले आहे. ते तिला वारंवार याबद्दल माहिती देत असतात आणि चांगली शिकवण देतात. धर्माच्या पलीकडे जाऊन आपल्याही मुलीने खऱ्या अर्थाने आपल्या संस्कृतीचा आनंद लुटावा अशी सोहाची इच्छा आहे. सर्व सणांमध्ये तरी इनायाला गणेशोत्सवाचेच खास अप्रूप आहे आणि जसंजसा काळ पुढे जाईल आणि ती मोठी होईल तसं तसे बाप्पाबद्दलचे तिचे प्रेम वाढतच जाईल याची सोहाला मनापासून खात्री आहे.
(वाचा :- मुलांच्या बारीकपणामुळे आहात चिंताग्रस्त? मग त्यांच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश!)
सजावटीचे धडे

बाप्पा येण्याआधी सर्वात जोरदार तयारी सुरु असते ती मखर बनवण्याची! जशी ही तयारी सामान्य माणसांकडे सुरु असते तशी ही तयारी सोहाच्या घरी सुद्धा सुरु असते आणि विविध गोष्टी करण्यासाठी इनाया हट्ट करते, तिला प्रत्येक गोष्ट करायची असते आणि सोहा त्यात तिला अजिबात अडवत नाही. अशा गोष्टी मुलांचं माइंड क्रियेटिव्ह बनवतात असं सोहाचं मत आहे आणि त्यामुळेच सजावटीच्या कामात ती इनायाला मागे पडू देत नाही. उलट स्वत: तिला अनेक गोष्टी शिकवते.
(वाचा :- बाळाने कोणत्या महिन्यात गुडघ्यावर रांगणं गरजेचं असतं?)
यंदा गणेशोत्सव घरीच

दरवर्षी घरी बाप्पाला बसवून आणि मनोभावे पूजा करून संपूर्ण खेमू कुटुंब इतरांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जाते. यामुळे भेटीगाठी होतात, एकत्र छान वेळ जातो. इनाया सुद्धा अशा भेटी एन्जोय करते असे सोहा सांगते. पण सध्या लॉकडाऊनमुळे यंदाचा गणेशोत्सव हा घरीच साजरा होत आहे. तरी इनायाच्या उत्साहात तसूभर सुद्धा कमतरता जाणवत नाही आहे. नेहमी प्रमाणे याही वर्षी ती बाप्पाची स्वत: मनोभावे सेवा करते आहे आणि हे पाहून सोहाला खूप आभिमान वाटतो आहे.
(वाचा :- मुलांच्या चेह-यावर सफेद चट्टे दिसू लागल्यास अजिबात करु नका दुर्लक्ष!)
मुलींना कुकिंगचे धडे

सोहाला कुकिंग करायला जमत नाही पण आपल्या मुलीला त्याची गोडी लागावी अशी तिची मनापासून इच्छा आहे म्हणून कोणताही सण आला की ती इनायाला जवळ बसवून कुकिंग करते. जेणेकरून ती सर्व गोष्टी बारकाईने पाहिल आणि तिलाही कुकिंगबद्दल प्रेम निर्माण होईल. गणेशोत्सव जवळ आला की खास गोडधोड पदार्थ करण्यात दोन्ही मायलेकी बिझी असतात आणि यंदाही विविध पदार्थ बनवून दोघींनी कुकिंगची आपली हौस पूर्ण करून घेतली आहे. आपल्या मुलीला जवळ बसवून कुकिंग करण्याचे परिणाम सोहळा आता दिसू लागले आहेत कारण यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कुकिंग करण्याचा सर्वाधिक उत्साह इनायाचाच आहे. तर अशा प्रकारे इनाया सोहच्या चांगल्या संस्कारामध्ये घडते आहे. आपल्या मुलीला एक चांगली व्यक्ती बनवण्यासाठी आणि तिने हे आयुष्य नेहमी साजरे करत रहावे यासाठी चाललेली सोहाची धडपड खरंच उल्लेखनीय आहे.
(वाचा :- बाळाला असलेली न्युमोनियाची लक्षणं वेळेत कशी ओळखाल?)
Source link
Recent Comments