सोहा-कुणालने सांगितला त्यांचा लिव्ह इन रिलेशनशिपचा अनुभव! खरंच हा पर्याय योग्य असतो?

Spread the love

आकर्षण, प्रेम आणि पुढील पायरी

सोहा अली खानने सांगितलं होतं की सर्वात आधी तिला कुणालप्रती आकर्षण वाटलं. पुढे जेव्हा दोघांना एकमेकांविषयी समान भावना वाटू लागल्या तेव्हा दोघांनी थोडं पुढे येऊन लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. सोहाने सांगितलं की हा निर्णय घेणं दोघांसाठी देखील सोपी गोष्ट नव्हती पण खूप विचार केल्यानंतरच ते या निर्णयापर्यंत पोहचले. सोहाच्या या वक्तव्यावरुन हेच दिसून येतं की जोडपी प्रेमाच्या सागरात कितीही का खोल डुबेनात पण जेव्हा असा काही मोठा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तो समजून आणि विचार करुनच घेतला जावा.

(वाचा :- सुशांतचा मृत्यु व धोनीची निवृत्ती! अनोळखी असलेल्या दोघांसाठी का होतायत लोक इतके भावूक?)

मुंबई असल्याने सोपं गेलं

कुणालने लिव्ह इन रिलेशनशीपबद्दल खूपच मनमोकळेपणे आपलं मत मांडलं होतं. त्याने म्हटलं होतं की तो आणि सोहा मुंबईमध्ये राहतात आणि इथे लोक मोकळ्या विचाराचे आहेत. तसेच त्यांचे कुटुंबीय देखील खुल्या, फ्रॅंक आणि मॉर्डन विचारांचे असल्याने त्यांना लिव्ह इनमध्ये राहणं सोपं गेलं. कुणालने हे देखील सांगितलं होतं की लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहणं आणि ते समाजाद्वारे स्विकारलं जाणं इतकं सोपं नक्कीच नाही. हा रस्ता सर्वांसाठीच सोपा नसतो.

(वाचा :- लग्नाचा वाढदिवस विसरल्याने पत्नी झाली नाराज तर अशी काढा तिची समजूत!)

मोठी वचनं

सोहा अली खानने एका कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना लिव्ह इन रिलेशनशीप म्हणजे लग्नाइतकंच मोठं कमिटमेंट म्हणजेच वचनबद्धता असल्याचं सांगितलं होतं. तिचं असं माननं आहे की लग्नाविना एकत्र राहिल्याने त्यांच्यातील प्रेम अधिकच दृढ आणि नातं मजबूत झालं. सोहाने सांगितले की लिव्ह इन मध्ये असताना आपण आपल्या आवडीच्या आणि खास माणसाच्या ओढीने अगदी आनंदाने घरी परततो नाही की एक जबाबदारी किंवा मजबूरी म्हणून..! याच काळात सोहाला ही जाणीव झाली की कुणाल तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे आणि त्याच्याशिवाय आयुष्य जगणं कठीण आहे.

(वाचा :- ऐश्वर्यातील या गुणांवर प्रभावित होऊन अमिताभ बच्चन यांनी केला तिचा सून म्हणून स्वीकार!)

एकमेकांना समजून घेणं

सोहा आणि कुणालने एकत्र राहायला सुरुवात केली तेव्हा सर्वात आधी त्यांनी एकमेकांना समजून घेण्याचा निश्चय केला. कुणालने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की लिव्ह इन रिलेशनशीपने मला माझ्या जोडीदाराला पूर्णत: जाणून घेण्यासाठी खूप मदत केली आणि यामुळेच सोहा ही माझी जोडीदार बनण्यास पात्र असून आपण हिच्याशीच विवाहबद्ध व्हावे या निर्णयापर्यंत पोहचण्यास मोलाची मदत केली. तरीही नातं निभावण्याची आणि आपली वचनं पाळण्यासाठी प्रत्येकाला आपापली एक वेगळी व खास पद्धत शोधून काढावी लागते. कारण प्रत्येकासाठी एकच युक्ती कामी येईल असं मुळीच नाही.

(वाचा :- लॉकडाऊनने तुमच्यातील ही व्यक्ती जिवंत केली असेल तर मग तुम्हीही म्हणाच ‘थॅंंक यू लॉकडाऊन’!)

लग्नानंतर जास्त बदल जाणवला नाही कारण

सोहाने तिचा अनुभव शेअर करताना सांगितलं की लग्नानंतर जसं प्रत्येक मुलीच्या आयुष्यात खूप मोठे बदल होतात तसं तिच्या आयुष्यात काहीच बदललं नाही. कारण लिव्ह इन दरम्यानच दोघांनाही एकमेकांच्या सवयी, स्वभाव आणि सारं काह माहित पडलं होतं. यातही सर्वात मोठी त्यांची मदत केली ती म्हणजे जसं आहे तसंच राहणं या त्यांच्या स्वभावाने. एकत्र राहत असताना सोहा व कुणालच्या नात्यातही अनेक चढाव-उतार आले पण उगाचच चांगुलपणाचा आव आणण्यापेक्षा दोघांनीही जसं आहे तसं स्वत:ला सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते मनापासून एकमेकांना स्वीकारु शकले. तसंच लिव्ह इनमुळे जोडीदाराविषयी मनात शंका किंवा किंतू-परंतु राहत नाही व आपण खुल्या मनाने लग्नास तयार होतो.

(वाचा :- २ महिने उलटून गेल्यानंतर आजही ‘हे’ डोळे सुशांत सिंग राजपूतची निरंतर वाट पाहत आहेत!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *