स्टायलिश ड्रेसवरून नेटिझन्सनी अभिनेत्री मौनी रॉयला केलं होतं ट्रोल, म्हणाले…

Spread the love

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आपल्या शानदार अभिनयाव्यतिरिक्त स्टायलिश फॅशनसाठीही ओळखली जाते. आपली स्टाइल स्टेटमेंट कशी चर्चेत राहील, याची काळजी मौनी योग्य पद्धतीने घेते. घराबाहेर पडताना ती फॅशनेबल आणि आकर्षक पोषाख परिधान करण्यावर भर देते. दरम्यान कधी- कधी अति स्टायलिश अवतारामुळेच मौनी रायला सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल देखील केलं जाते.

असाच काहीसा किस्सा ‘अंग्रेजी मीडियम’ सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान देखील पाहायला मिळाला होता. सिनेमाच्या स्क्रीनिंग शोसाठी मौनीने परिधान केलेल्या आउटफिटवरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. मौनी रॉयने नेमकी कोणती ड्रेसिंग स्टाइल कॅरी केली होती, ज्यामुळे तिला ट्रोल केलं गेलं? जाणून घेऊया माहिती.
(दिशा पटानीने घरामध्ये फोटोशूट करण्यासाठी या स्टायलिश ड्रेसची केली निवड)

मौनी रॉयला या ​ड्रेसवरून केलं होतं ट्रोल

मौनी रॉयने आपल्या अभिनय, सौंदर्य आणि स्टाइलने चाहत्यांच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण केलं आहे. पारंपरिक पोषाखापासून ते वेस्टर्नपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आउटफिट कशा पद्धतीने कॅरी करायचे आहे, याची तिला चांगली माहिती आहे. काही दिवसांपूर्वी सॅटन फॅब्रिक को-ऑर्डिनेट सेट आउटफिटमध्येही तिचा ग्लॅमरस लुक चाहत्यांना पाहायला मिळाला होता. दरम्यान ड्रेस प्रचंड स्टायलिश असतानाही सोशल मीडियावर तिला वाईटरित्या ट्रोल करण्यात आलं होतं.

(Nora Fatehi नोरा फतेहीच्या स्टायलिश फोटोशूटवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव)

​कसा होता मौनीचा लुक?

‘अंग्रेजी मीडियम’ बॉक्सऑफिसवर प्रदर्शित होण्यापूर्वी खास बॉलिवूडकरांसाठी या सिनेमाच्या स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आलं होतं. करीना कपूर, राधिका मदान यांच्यासह कित्येक अभिनेत्री स्क्रीनिंगसाठी पोहोचल्या होत्या. यादरम्यान मौनी रॉयने देखील सुंदर अवतारात आपली उपस्थिती दर्शवली. या शोसाठी तिनं हाय स्लिट डिझाइन Vestidos Moda ड्रेस परिधान केला होता. या आउटफिमध्ये स्कर्टसह बॅगी ब्लेझरचाही समावेश होता.

(मायलेकीची जोडी! मिशापासून ते आराध्याने परिधान केला होता आईसारखाच पोषाख)

​स्टायलिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं

या आउटफिटमुळे मौनी रॉयला स्टायलिश लुक मिळाला होता. अवतार स्टायलिश दिसावा यासाठी मौनीने ड्रेसवर ब्लॅक बेल्ट देखील मॅच केलं होतं. तर पायामध्ये स्ट्रॅपी हील्स घातल्या होत्या. तिनं सॉफ्ट न्यूड मेकअपसह आपल्या गालांचा भाग हायलाइट केला होता. तर कर्ली वेव्ह हेअर स्टाइलही सुंदर दिसत होती. मौनीच्या चाहत्यांना तिचा हा लुक अतिशय आवडला. पण सोशल मीडियावरील काही युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

(Radhika Merchant नीता अंबानींच्या होणाऱ्या सूनेचे हे पाच डिझाइनर लेहंगे पाहिले का?)

​ट्रोलर्स म्हणाले की…

मौनीचे आउटफिट्स आणि स्टाइल प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात नेहमीच यशस्वी ठरले आहेत. पण तरीही काही जण तिला ट्रोल करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. अभिनेत्रीचे या आउटफिटमधील फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर काहींनी त्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका करण्यास सुरुवात केली. काही जणांनी तिला ‘प्लास्टिक दीदी’ म्हटलं. तर एका युजरने तिच्या फोटोवर ‘मौनी प्लास्टिक रॉय’ अशी कमेंट केली. दरम्यान यापूर्वीही ऑफ शोल्डर गाउनवरून टोलर्सकडून तिच्यावर निशाणा साधण्यात आला होता.

(बॉयफ्रेंडसोबत दिसली सुष्मिता सेन, प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलचा स्टायलिश लुक लई भारी)

​सॅटन फॅब्रिक ड्रेसची फॅशन

अलिकडच्या काळात बी-टाउनमधील बर्‍याच अभिनेत्री सॅटन फॅब्रिक पॅटर्न ड्रेसची क्रेझ पाहायला मिळत आहे. स्लिप ड्रेस पॅटर्न असो किंवा को-ऑर्ड सेट… सॅटन हे एक असं फॅब्रिक आहे की ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला स्टायलिश लुक मिळू शकतो. बहुतांश महिलांना या फॅब्रिकचे आउटफिट परिधान करायला आवडते. दरम्यान सॅटन फॅब्रिक डेसमधील मौनीचा हा लुक तिच्या चाहत्यांना भरपूर आवडला होता.

( अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल. राहुलचे एकसारखेच कपडे? फोटो झाले होते व्हायरल)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *