How to make: स्वादिष्ट मखाना चिक्की रेसिपी!
सर्वप्रथम एका प्लेटला साजूक तूप लावून घ्यावे.
Step 2: मखाने लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले भाजून घ्या
एका पॅनमध्ये १ चमचा तूप घ्या आणि त्यामध्ये मखाने घालून ३ ते ४ मिनिटे तांबूस रंगाचे व कुरकुरीत होईपर्यंत चांगले भाजून घ्या. भाजलेले मखाने एका प्लेटमध्ये काढून घ्या.

Step 3: किसलेला गुळ, तुप आणि पाणी एकत्र करुन पाक बनवून घ्या
आता त्याच पॅनमध्ये थोडं साजूक तूप, किसलेला गुळ आणि पाणी घ्या. सर्व सामग्री मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करुन घ्या.

Step 4: गुळाच्या पाकात मखाने टाकून परतून घ्या
गुळ पाण्यात पुर्णपणे विरघळून त्याचा चांगल पाक होईपर्यंत मिश्रण ढवळत राहा. आता भाजलेले मखाने गुळाच्या पाकात टाकून छान मिक्स करुन घ्या. त्यानंतर पाकात मुरलेले मखाने तुप लावलेल्या प्लेटमध्ये काढून पसरुन घ्या.

Step 5: तयार झाली आपली स्वादिष्ट अशी मखाना चिक्की!
तयार झाली आपली स्वादिष्ट अशी मखाना चिक्की! अशा या रुचकर मखाना चिक्कीचा संध्याकाळच्या नाश्त्यालाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता.

Step 6: मखानाच्या चिक्कीची रेसिपी :- पाहा VIDEO
व्हिडीओमध्ये दिलेली पद्धत फॉलो करुन बनवा मखाना चिक्की!

Source link
Recent Comments