हाय ब्लड प्रेशरमुळे का करावी लागते सिझेरियन डिलिव्हरी? जाणून घ्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी उपाय!

Spread the love

गरोदरपणात अनेक आजारांमुळे समस्या निर्माण होऊ शकतात आणि तसाच एक आजार म्हणजे ब्लड प्रेशर अर्थात उच्च रक्तदाब (high blood pressure) होय. यामुळे स्त्रीच्या नॉर्मल डिलिव्हरी मध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. पूर्वी रक्तदाबाची समस्या फार कमी स्त्रियांमध्ये दिसून यायची. पण आता लोकांची आहारशैली आणि जीवनशैली बदललेली आहे व त्यामुळे रक्तदाबाचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

रक्तदाबाच्या समस्येचे सगळ्यात मोठे रहस्य म्हणजे या आजाराची कल्पना तोवर येत नाही जोवर हृदय रोग किंवा हार्ट स्ट्रोकला व्यक्तीला सामोरे जावे लागत नाही आणि म्हणूनच ब्लड प्रेशरला सायलेंट किलर असेही म्हणतात. त्यामुळे कधी कधी गरोदरपणात ब्लड प्रेशरचे निदान होते आणि आपली नॉर्मल डिलिव्हरी व्हावी ही अशा ठेवून असणाऱ्या गरोदर स्त्रीची आशा मावळू शकते.

दोन प्रकारचे असते ब्लड प्रेशर

उच्च रक्तदाब दोन प्रकारचे असतात. एक असतो प्रायमरी ब्लड प्रेशर आणि दुसरा असतो सेकंडरी ब्लड प्रेशर! प्रायमरी ब्लड प्रेशर कसा ओळखावा त्याची कोणतीच लक्षणे अजून तरी समोर आलेले नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात अजूनही प्रायमरी ब्लड प्रेशरवर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे. सेकंडरी ब्लड प्रेशर मध्ये वजन वाढणे, अनुवंशिकता, आळशी जीवनशैली, व्यसनाची सवय आणि वाढते वय यांसारख्या समस्यांचा समावेश होतो. हे दोन्ही प्रकार घातक असून वेळीच उच्च रक्तदाबाच्या समस्येला आळा घालणे गरजेचे होऊन बसते.

(वाचा :- सिझेरियन डिलिव्हरीनंतर टाक्यांमध्ये होऊ शकतं इन्फेक्शन, या गोष्टींची घ्या काळजी!)

का निर्माण होते समस्या?

उच्च रक्तदाबामुळे प्लेसेंटा मधून पुरेश्या प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही. याचाच अर्थ बाळाला पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन आणि अन्न मिळत नाही. यामुळेच कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते किंवा मुदतपूर्व डिलिव्हरी होऊ शकते. उच्च रक्तदाब असल्यास नॉर्मल डिलिव्हरीच्या शक्यता अतिशय कमी असतात. मात्र जर वेळीच उच्च रक्तदाब ओळखून तो नियंत्रित केला तर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. पण जर उच्च रक्तदाब हाताबाहेर गेला तर मात्र सिझेरियन डिलिव्हरीशिवाय पर्याय मुळेनसतो. याच कारणामुळे गरोदरपणात उच्च रक्तदाबाची तपासणी करून घ्यायला हवी.

(वाचा :- थंडीत प्रेग्नेंट महिलांनी अशी घ्यावी स्वत:ची काळजी! जाणून घ्या काय करावं व काय टाळावं?)

क्रोनिक हायपरटेन्शन

जेव्हा गरोदरपणाच्या आधी किंवा गरोदरपणाच्या 20 आठवड्यांआधी पासून ब्लड प्रेशर 140/90 एमएम एचजी इतके असेल तर त्याला क्रोनिक हायपरटेंशन असे म्हणतात. यामुळे प्रीक्‍लेंप्‍सिया, बाळाच्या शारीरिक वाढीमध्ये अडथळा, प्‍लेसेंटा एब्‍रप्‍शन आणि प्रीटर्म बर्थ यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. क्रोनिक हायपरटेंशन मुळे सिझेरियन डिलिव्हरीची शक्यता वाढते. डिलिव्हरी नंतर देखील क्रोनिक हायपरटेंशन राहू शकते. त्यामुळेच उच्च रक्तदाबाच्या प्रकारातील हा प्रकार अतिशय घातक समजला जातो.

(वाचा :- डिलिव्हरीनंतर रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ खास बदल!)

जेस्‍टेशनल हायपरटेन्शन

गरोदरपणाच्या 20 व्या आठवड्यानंतर निर्माण होणाऱ्या उच्च रक्तदाबाला जेस्‍टेशनल हायपरटेंशन असे म्हणतात. अनेक प्रकरणात यामुळे बाळाला काहीही धोका निर्माण न झाल्याचे दिसून आले आहे. ना यामध्ये काही दुसरी लक्षणे दिसतात. या प्रकारचा उच्च रक्तदाब गरोदरपणाच्या काळात किंवा डिलिव्हरी नंतर ठीक होऊन जातो. पण यामुळे अनेकदा बाळाचे वजन कमी होऊ शकते. जाणकारांच्या मते, जेस्‍टेशनल हायपरटेंशन जरी धोकादायक नसले तरी त्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला जातो.

(वाचा :- आईच्या ‘या’ चुकांमुळे पोटातच होऊ शकतो बाळाचा मृत्यु! काय काळजी घ्यावी?)

प्रीक्‍लेंप्‍सिया

गरोदरपणाच्या 20 व्या आठवड्यानंतर अचानक जेव्हा उच्च रक्तदाब वाढतो तेव्हा त्याला प्रीक्‍लेंप्‍सिया असे म्हणतात. सामान्यत: असे गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. प्रीक्‍लेंप्‍सिया लिवर किडनी आणि मेंदूला नुकसान पोहोचवतो. हा एक गंभीर प्रकारचा उच्च रक्तदाब असून यामुळे आई आणि बाळ दोघांना नुकसान पोहोचते. डिलिव्हरी नंतर सुद्धा प्रीक्‍लेंप्‍सिया होऊ शकतो ज्याला पोस्‍टपार्टम प्रीक्‍लेंप्‍सिया असे म्हणतात. गरोदरपणात गरोदर स्त्रीने संतुलित आहार घ्यावा, दरोरोज योग आणि व्यायाम करावा व शक्य तितके ताण तणावापासून दूर राहावे. या प्रकारे गरोदर स्त्री उच्च रक्तदाबापासून स्वत:चा बचाव करू शकते आणि तिची डिलिव्हरी सुद्धा नॉर्मल होऊ शकते. याबद्दल सामान्य स्त्रियांच्या मनात खूप गैरसमज आहे. त्यांना या समस्येविषयी जागरूक करण्यासाठी हा लेख आवर्जून शेअर करा. जेणेकरून त्या सुद्धा वेळीच हा धोका ओळखून सिझेरियन डिलिव्हरी टाळू शकतात.

(वाचा :- प्रेग्नेंट नसतानाही तशी लक्षणे दिसण्यामागे काय कारण असतं व फॉल्स प्रेग्नेंसीची लक्षणे कोणती?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *