हिना खानच्या ‘या’ स्वस्त ड्रेससमोर फिका पडला जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक

Spread the love

टेलिव्हिजनवरील अभिनेत्रींच्या फॅशनची तुलना नेहमीच बॉलिवूडमधील A लिस्टर्स अभिनेत्रींसोबत केली जाते. टीव्ही अभिनेत्रींनी आपल्या स्टाइलबाबत कितीही गांभीर्यानं विचार केला तरीही त्यांच्या ड्रेसपासून ते फुटवेअरपर्यंत; सर्वच गोष्टी बी-टाउनमधील अभिनेत्रींच्या लुकची कॉपी असल्याचे मानले जाते. पण बदलत्या ट्रेंडनुसार आता टीव्ही अभिनेत्रींमध्येही फॅशनच्या बाबतीत बरेच ग्लॅमरस बदल पाहायला मिळत आहेत. हिना खानपासून ते निया शर्मा, करिश्मा तन्ना आणि मौनी रॉय यासारख्या अभिनेत्री आपल्या हटके फॅशनसाठी ओळखल्या जाताहेत. शानदार अभिनयाव्यतिरिक्त या अभिनेत्रींनी आपल्या स्टाइल स्टेटमेंटनंही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

तसं पाहायला गेलं तर महागातील महाग आउटफिटपासून ते फॅशनेबल ज्वेलरी, डिझाइनर बॅग, स्टायलिश फुटवेअर कॅरी करणं हे अभिनेत्रींच्या फॅशन रूटीनमधील एक भाग आहे. पण यातील आश्चर्यकारक बाब म्हणजे जेव्हा याच अभिनेत्री अतिशय स्वस्त आउटफिट परिधान करतात तेव्हाही त्यांच्या स्टायलिश अवताराची चर्चा मोठ्या प्रमाणात केली जाते. असेच काहीसे उदाहरण हिना खानच्या (Hina Khan) बाबतीत पाहायला मिळालं. या अभिनेत्रीनं एक स्वस्त आणि मस्त ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तिच्या या लुकसमोर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचीही (Janhvi Kapoor) स्टाइल फिकी पडलीय.

​हिना खानने मारली बाजी

हिना खान सध्या मालदीवच्या दौऱ्यावर आहे. तिथे गेल्यापासून हिना स्वतःचे शानदार अवतारातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. गुलाबी रंगाच्या बिकिनीपासून ते कफ्तान, लेसी ड्रेस आणि मिनी ड्रेस यासारख्या आउटफिटमधील फोटो तिनं चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. नुकतेच हिनाने समुद्रकिनाऱ्यावरील सुपर स्टायलिश अवतारातील फोटो पोस्ट केला होता. यावेळेस तिनं Angel Croshet नं डिझाइन केलेला काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. मालदीव दौऱ्यादरम्यान हिनानं सर्वाधिक आवडत्या पोषाखांमध्ये या काळ्या रंगाच्या ड्रेसचाही समावेश केला होता. यामध्ये हिना अतिशय सुंदर दिसत होती.

(अनुष्का शर्माचे हे ५ स्टायलिश ड्रेस प्रेग्नेंट महिलांसाठी आहेत परफेक्ट, पाहा फोटो)

​हिनाचा स्टायलिश लुक

व्हेकेशनदरम्यानही स्टायलिश दिसण्यासाठी हिना खानने प्लंजिंग नेकलाइन असणाऱ्या काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॅपी ड्रेसची निवड केली होती. या बॉडीकॉन ड्रेसच्या पुढील बाजूस एक क्रॉस नेक ओव्हरलॅपिंग पॅटर्न जोडण्यात आलंय. तसंच हाई-थाई स्लिट डिझाइनमुळे ड्रेसला अधिक आकर्षक लुक मिळाला आहे. या लुकसाठी हिनाने डॅक्सी मेकअप केला होता. तसंच कॅट आइज् सनग्लासेस आणि स्वतःच्या नावाची हॅट देखील मॅच केली होती. तुम्हाला हिनाचा हा ड्रेस आवडला का? तर यासाठी Angel Croshet च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. वेबसाइटवरील माहितीनुसार या ड्रेसची किंमत एक हजार ८०० रुपये एवढी आहे.

(अपूर्वा नेमळेकरचा मोहक पारंपरिक अवतार, पाहा हे ५ फोटो)

​जान्हवीचा बोल्ड लुक

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लाडकी लेक जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) देखील आपल्या स्टायलिश लुकसाठी प्रसिद्ध आहे. रेड कार्पेट इव्हेंट असो किंवा कौटुंबिक सोहळा, जान्हवी कपूर एकापेक्षा एक सुंदर पोषाख परिधान करताना दिसते. नुकतेच जान्हवीचे नवीन फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडिया पाहायला मिळाले. या फोटोशूटसाठी तिनं नवी दिल्लीतील फॅशन लेबल APZ ने डिझाइन केलेलं को-ओर्ड सेट परिधान केलं होतं.

(Winter Fashion स्टायलिंगचा हिवाळी मोड ऑन! ग्लॅमरस लुकसाठी ट्राय करा हे फॅशन ट्रेंड)

​असा होता पोषाख

जान्हवीने या फोटोशूटसाठी काळ्या रंगाच्या डेनिम जॅकेटसह फ्लेअर्ड पँट परिधान केली होती. ज्यामध्ये मॅचिंग बेल्टसह समोरील बाजूस आकर्षक बटणचे डिझाइनही जोडण्यात आलं होतं. यामुळे पोषाखास स्टायलिश लुक मिळाला. परफेक्ट लुक मिळावा, यासाठी जान्हवीने काळ्या रंगाचे बुट्स मॅच केले होते. तसंच या लुकसाठी तिनं न्यूड टोन मेकअप केला होता. डोळ्यांचा खास मेकअप केल्यानं ती अधिक सुंदर दिसत होती. जान्हवी कपूरच्या या ड्रेसची किंमत २५ हजार रुपये एवढी आहे. यामध्ये जॅकेटची किंमत १६ हजार ५०० रूपये आणि पँटची किंमत ८ हजार ५०० रूपये एवढी आहे.

(ऐश्वर्या ते अनुष्कासह यांनीही परिधान केले होते ग्लॅमरस बॅकलेस ड्रेस, फोटोंमुळे उडाला धुरळा)

​जान्हवीच्या लुकवर भारी पडली हिनाची स्टाइल

एकीकडे हिना खान लेसी ड्रेसमध्ये आकर्षक आणि स्टायलिश दिसत होती. तर जान्हवी कपूर देखील कॉलर नेकलाइन पोषाखामध्ये सुंदर दिसतेय. तसं पाहायला गेलं तर दोघींचीही स्टाइल अप्रतिम आहे. पण फॅशनच्या बाबतीत हिनाचा लुक जान्हवीच्या स्टाइलवर भारी पडल्याचे दिसतंय.

(रणवीर सिंह विचित्र फॅशनमुळे पुन्हा चर्चेत, गळ्यात मोत्यांची माळ घातलेला फोटो केला शेअर)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *