हिवाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यासाठी कशा पद्धतीने घ्यावी स्वतःची काळजी, जाणून घ्या माहिती

Spread the love

देशाच्या काही भागांमध्ये थंडीच्या दिवसांना (Winter Season) सुरुवात झाली आहे. संध्याकाळच्या वेळेस वातावरणात गारवा वाढू लागला आहे. हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारी उद्भवतात. तापमानात घट झाल्यानं सर्दी-खोकला, ताप, त्वचेशी संबंधित विकार इत्यादी त्रास निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी शरीराचे तापमान संतुलित ठेवणे आवश्यक आहे. हिवाळ्यात फिट आणि आरोग्य निरोगी राहण्यासाठी (Winter Health Tips) आहारापासून ते व्यायामापर्यंत सर्व गोष्टींची योग्य ती काळजी घ्यायला हवी.

उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये आपल्याला अधिक प्रमाणात भूक लागते. तसंच थंडीच्या दिवसांत शरीराची हालचाल देखील कमी प्रमाणात होते. हिवाळ्यात आजारांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घेऊया सविस्तर माहिती.
(निक्की तांबोळीच्या फिटनेसचे सीक्रेट आहेत ‘हे’ वर्कआउट, पाहा एक्सरसाइजचे व्हिडीओ)

​कसा असावा आहार?

हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या ऋतूमध्ये कित्येक प्रकारच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारामध्ये अख्खे कडधान्य, दलिया इत्यादी पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. हे पदार्थ आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक असतात. तसंच हिवाळ्यामध्ये अधिक प्रमाणात भाज्या आणि फळांचं सेवन करावे. फळ आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. या पोषक घटकांचा शरीराला पुरवठा झाल्यास आजारांविरोधात लढण्यात मदत मिळते. थंडीमध्ये शक्यतो तेलकट – तिखट खाद्यपदार्थांचे सेवन करणं टाळावे.

(डोळ्यांचे आरोग्य ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यापर्यंत, जाणून घ्या पालकच्या सेवनामुळे मिळणारे लाभ)

​पाणी आणि पेय

उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये कमी प्रमाणात पाणी प्यायलं जातं. पण या ऋतूमध्येही जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. चहा आणि कॉफीचे मर्यादित सेवन करावं.

(चालण्याचा व्यायाम कोणत्या वेळेस करणं आरोग्यास असते अधिक फायदेशीर? जाणून घ्या)

हर्बल टीमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइडची पातळी देखील कमी होण्यास मदत मिळते. पण कोणत्या हर्बल टीचा आहारात समावेश करावा, याबाबत आपल्या आहारतज्ज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

​व्यायाम करणं आवश्यक

शरीर फिट राहण्यासाठी आहारासोबतच नियमित व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे. शरीराची योग्य पद्धतीनं हालचाल होणं आवश्यक आहे. आपल्या फिटनेससाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन नियमित व्यायाम करावा. जिममध्ये जाऊन व्यायाम करणं शक्य नसल्यास तुम्ही चालण्याचा साधा आणि सोपा व्यायाम करू शकता.

(भुजंगासनाची पारंपरिक पद्धत माहीत आहे? हे ६ लाभही जाणून घ्या)

चालण्याच्या व्यायामामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि यामुळे रक्तप्रवाह देखील वाढतो. तसंच हिवाळ्यात रक्तातील शर्करा आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहणं आवश्यक आहे. या ऋतूमध्ये आहारात कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे. अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करणं हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असते.

(अक्षय-ट्विंकलच्या घराला दिलेली डिंपल यांची पहिली भेट ‘या’ पदार्थामुळे चांगलीच राहिली आठवणीत)

​थंडीपासून करावे संरक्षण

हिवाळ्यामध्ये आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे परिधान करावेत. या दिवसांत विशेषतः पाय-मोजे, हात-मोजे, कानटोपी इत्यादी गोष्टींचा वापर करावा. तसंच पुरेशा प्रमाणात झोप देखील घ्यावी. उबदार पोषाखांव्यतिरिक्त आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. ज्या पदार्थांच्या सेवनाने शरीरात उष्णता निर्माण होईल, असा डाएट फॉलो करावा. दरम्यान, हिवाळ्यात त्वचेशी संबंधित विकार मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी तेल किंवा बॉडी लोशनचा उपयोग करावा.

(इंटरव्ह्यू आणि परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्हालाही ‘हा’ त्रास होतो का? जाणून घ्या कारण)

चालण्याचा व्यायाम करता का?

NOTE आपल्या आहारामध्ये कोणत्याही गोष्टीचा समावेश करण्यापूर्वी ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच त्वचा आणि केसांसाठी कोणते ब्युटी प्रोडक्ट वापरावे, याबाबतही तज्ज्ञमंडळींचे मार्गदर्शन घ्यावे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *