हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी, रवीना टंडनने ब्युटी टिप्ससह सांगितली योग्य पद्धत

Spread the love

​हिवाळ्यात आंघोळ करण्याची योग्य पद्धत

थंडीमध्ये त्वचा केसांशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी ब्युटी केअर रुटीन योग्य पद्धतीने फॉलो करणं गरजेचं आहे. हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबत रवीनाने व्हिडीओमध्ये सांगितले की, ‘थंड हवामानात आंघोळ करताना साबणाचा जास्त प्रमाणात वापर करू नये. तसंच त्वचेसाठी सौम्य ऑर्गेनिक साबणाचा वापर करावा. जेणेकरून तुमच्या त्वचेचं नुकसान होणार नाही’.

(व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर बारीक पुरळ आणि खाज येते का? जाणून घ्या हे ५ घरगुती उपाय)

​अशा पद्धतीने टॉवेलने अंग पुसावे

आंघोळीनंतर अंग पुसण्यासाठी टॉवेलचा कसा वापर करावा, याचीही योग्य पद्धत रवीनाने समजावून सांगितली आहे. रवीनाने सांगितलं की ‘आंघोळीनंतर टॉवेलच्या मदतीने अगदी हलक्या हाताने अंग पुसावे, आपली त्वचा टॉवेलनं कधीही रगडू नये’.

(Navratri 2020 उपवासादरम्यान चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो? डाएटमध्ये या ६ गोष्टींचा करा समावेश)

​त्वचेला मॉइश्चराइझर लावण्यास विसरू नका

त्वचेला मॉइश्चराइझर लावणे हा स्किन केअर रुटीनमधील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. रवीनाने आपल्या चाहत्यांना सांगितले की, कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कच्च्या आणि शुद्ध दुधाचा वापर करू शकता. मऊ कापडाच्या मदतीने कच्चे दूध आपल्या त्वचेवर लावा. १५ मिनिटांसाठी कच्चे दूध त्वचेवर राहू द्यावे.

(Navratri 2020 नवरात्रौत्सव 2020 : उपवास करण्याचे सौंदर्यवर्धक व आरोग्यवर्धक लाभ माहीत आहेत?)

​हेअर केअर टिप्स

रवीना टंडनने यापूर्वीही सोशल मीडियावर नैसर्गिक – घरगुती ब्युटी टिप्स आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. गेल्या वेळेस तिनं केसगळती समस्या कमी करण्यासाठी आवळ्याचं हेअर मास्क कसे तयार करायचे, याची पद्धत सांगितली होती.

(Natural Hair Care केसगळती कशी रोखावी? अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला नैसर्गिक उपाय)

​आवळ्याचे हेअर मास्क

आवळ्याचे हेअर मास्क तयार करण्यासाठी कपभर दुधामध्ये जवळपास ६ आवळे उकळून घ्या. आवळे नरम झाल्यानंतर मॅश करा. यानंतर मॅश केलेले आवळे आपल्या मुळांसह केसांना लावा.

(Natural Hair Care टक्कल पडण्याची आहे भीती? केसगळती रोखण्यासाठी या नैसर्गिक तेलांचा)

१५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर शॅम्पूने केस धुण्याची आवश्यकता नाही. कारण या हेअर मास्कमुळे केस-टाळूवर जमा झालेली दुर्गंध स्वच्छ होते, असेही रवीनानं सांगितलं.

(मुरुम, काळवंडलेल्या त्वचेपासून हवीय सुटका? वापरा आयुर्वेदिक मुलतानी मातीचे फेस पॅक)

NOTE केस- त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *