हिवाळ्यात मुलांना हेल्दी ठेवायचंय? वापरा सेलिब्रेटी डाएटिशियन ऋजुता दिवेकरच्या ‘या’ खास टिप्स!

Spread the love

प्रत्येक पालकाला आपलं मुल निरीगी राहावं असं वाटत असतं आणि आपले मुल एकदम निरोगी राहावे म्हणून पालक त्यांना चांगलंचुंगलं खायला देण्यावर भर देतात. पण त्या शिवाय अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला या क्षेत्रातील जाणकार अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतात आणि याच अनुषंगाने लहान मुलांच्या आरोग्यासाठी काही हेल्दी टिप्स दिल्या आहेत डाएटिशियन ऋजुता दिवेकर (healthy tips by rujuta diwekar) यांनी! जर ऋतुजा दिवेकर म्हणजे कोण हे तुम्हाला माहित नसले तर प्रथम त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

करीना कपूर (kareena kapoor dietitian rujuta diwekar tips for kids) म्हणजे बॉलीवूड मधील सर्वात स्लिम असलेल्या अभिनेत्रींपैकी एक होय. तिच्या झिरो फिगरची तर आजही चर्चा असते. वयाची ३५ वर्षे ओलांडून, एका गोड मुलाची आई होऊनही आज तिची फिटनेस २० वर्षांच्या मुलींनाही लाजवेल अशी आहे. अर्थात या मागे तिची मेहनत, तिने आहाराबाबतीत केलेलं त्याग, तिचा काटेकोरपणा सर्वच आहे. पण अजून एक हात तिच्या या सुदृढ आरोग्यामागे आहे जो की बऱ्याच जणांना माहित नाही. हा हात म्हणजेच कपूरची वैयक्तिक डाएटिशियन ऋतुजा दिवेकर. चला तर आज जाणून घेऊया त्यांनी दिलेल्या स्पेशल टिप्स!

फळांचा आहार

ऋतुजा दिवेकर म्हणतात की फळे हा आहारातील मुख्य घटक आहे. मुलांना फळे खाण्याची सवय जरूर लावावी. दिवसाला किमान एक तरी ताजे फळ मुलाला खायला द्यावेच. ह्यात तुम्ही केळी, आंबा, पेरू यांसारखी पौष्टिक फळे मुलांना खायला देऊ शकता. याशिवाय मिल्क शेक देखील मुलांसाठी उपयुक्त ठरतो. नाष्ट्यामध्ये पोहा, उपमा, इडली, डोसा घरातच बनवून द्या. यासर्व गोष्टींमध्ये जीवनसत्त्व आणि पॉलीफेनोल विपुल प्रमाणात असते. यामुळे पचन शक्ती सुधारते.

(वाचा :- ऐन करोनामध्ये आपल्या मुलांचा नाताळ सण असा बनवा खास!)

रात्रीचे जेवण महत्त्वाचे

ऋजुता दिवेकर यांनी सांगितले की दिवसाच्या आहारासारखाच रात्रीचा आहार सुद्धा महत्त्वाचा असतो. यामुळे सर्दी ताप आणि खोकल्याशी बाळाचं शरीर प्रभावीपणे लढू शकेल. रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी, मासे आणि भात किंवा कुळीथाच्या पीठाची डिश आणि तूप मुलांना खायला द्यावे. बदलत्या वातावरणाशी शरीराला अनुकूल बनवायचे असेल तर ऋजुता दिवेकर यांनी एक स्पेशल ड्रिंक सुद्धा सांगितले आहे. हे ड्रिंक तयार करण्यासाठी आले, लिंबू, मध यांचा वापर करावा. चहा किंवा केसर सोबत आले व बदामचे सेवन करणे सुद्धा फायदेशीर ठरू शकते.

(वाचा :- जया बच्चन का म्हणते ऐश्वर्याला बेस्ट मॉम? ऐश्वर्याच्या टिप्स नवोदीत मातांच्या येऊ शकतात कामी!)

हि चूक करू नका

डिनरमध्ये काय खायला आवडेल? असे विचारून आई वडील सगळ्यात मोठी चुक ही करतात असे ऋजुता यांना वाटते. त्या ऐवजी आई वडिलांनी मुलांना सांगायला पाहिजे की त्यांना डिनरमध्ये काय खायला मिळणार आहे. जर तुम्ही स्वत:हून मुलांना विचाराल तर साहजिकच मुलं त्या पदार्थांचाच हट्ट धरतील जे त्यांना आवडतात. म्हणून मुलांना पौष्टिक पदार्थ खाऊ घालण्यावर भर द्यावा आणि त्यांची आवड न विचारलेली बरी, मात्र तुम्ही जे पदार्थ बनवाल त्याची चव मुलांना आवडेल अशी ठेवावी, जेणेकरून मुलं ते पदार्थ खाण्यास टाळाटाळ करणार नाही.

(वाचा :- मुलांचं सर्दी-पडसं व खोकला दूर करण्यासाठी असा बनवा घरगुती काढा!)

फास्ट फूडवर निर्बंध

लहान मुलांना चटर पटर आणि मसालेदार पदार्थ खूप आवडतात. पण हे पदार्थ मुलांना शक्य तितके कमी खाऊ द्यावेत. जर तुम्ही मुलाला चांगला पोषण आहार देत आहात पण सोबत जर हे पदार्थ सुद्धा मुल मोठ्या प्रमाणात खात असेल तर तुमच्या चांगल्या पोषण आहाराचा काही उपयोग होणार नाही. मुल जेवढे कमी फास्ट फूड खाईल तेवढे ते जास्त निरोगी राहील. त्यामुळे फास्ट फूड पेक्षा मुलांना जास्त जास्त घरचे खाणे खाऊ घाला.

(वाचा :- मुलांना जंक फुड खाऊ घालण्याआधी जाणून घ्या त्याचे गंभीर दुष्परिणाम!)

स्‍नॅक्‍स

मुलांना जेवल्यानंतर मध्ये मध्ये भूक लागते, खास करून संध्याकाळच्या वेळेस! हा असतो मुलांच्या स्‍नॅक्‍सचा वेळ, या स्‍नॅक्‍सकडे सुद्धा योग्य लक्ष देणे गरजेचे असते. मुलांचा स्‍नॅक्‍सचा वेळ झाल्यास त्यांना एका छोट्या भांड्यात दहीसोबत सुकामेवा द्या. यात लोह आणि जीवनसत्वाची मोठी मात्रा असते. ज्यामुळे थकवा आणि उष्णता दूर होते आणि हार्मोन्स सुद्धा संतुलित राहण्यास मदत होते. त्यामुळे मुलांना स्‍नॅक्‍सच्या वेळेस आवर्जुन हा आहार द्यावा.

(वाचा :- काही मुलं आईच्या गर्भातच पडतात ‘या’ हृदय रोगाला बळी! बचावासाठी काय काळजी घ्यावी?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *