हिवाळ्यात लहान मुलांसाठी घरच्या घरी असं बनवा गाजर-बीटचं सूप!

Spread the love

थंडीचे दिवस (winter season health care) सुरु झाले आहेत. हा असा ऋतू आहे ज्या काळात आरोग्याची सर्वाधिक काळजी घ्यावी लागते. थंडीत भूक सुद्धा खूप लागते आणि शारीरिक उर्जा (energy) सुद्धा मोठ्या प्रमाणावर हवी असते. खास करून लहान मुलांची या काळात जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागते. थंडीच्या दिवसांत त्यांना जास्त पोषणाची आवश्यकता असल्याने तुम्ही तसे पदार्थ त्यांना खाऊ घालून त्यांची पोषणाची गरज भरून काढायला हवी.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका रेसिपी बद्दल सांगणार आहोत जी रेसिपी थंडीच्या दिवसात मुलांसाठी पोषक ठरेल. ती रेसिपी म्हणजे बीट सूप (beetroot soup) होय. बीट हे असे कंदमूळ आहे जे फारसे कोणाला आवडत नाही त्याच्या चवीमुळे, पण जर याचे सूप योग्य पद्धतीने बनवून आणि तुमच्या आवडीनुसार स्वाद करून तुम्ही चवीने हे स्वत: खाऊ शकता आणि मुलांना सुद्धा खाऊ घालू शकता. चला तर जा या पदार्थांबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.

बीट सूप कसे बनते?

बीट सूप बनवायला अगदी सोपे आहे त्यासाठी तुम्हाला काही साहित्याची आवश्यकता आहे, सर्वप्रथम त्याबद्दल आपण जाणून घेऊया. बीट सूप बनवण्यासाठी एक मध्यम आकाराचे गाजर (कापलेले किंवा किसलेले), एक छोटे बीट, (कापले आणि किसलेले), एक लसणाची पाकळी, एक चमचा जीरा पावडर, एक चिमुटभर मिरपूड, एक चमचा तूप आणि गरजेनुसार मीठ आणि पाणी एवढे साहित्य तुम्ही जमा करून घ्या. हे साहित्य जमा झाले की तुम्ही बीट सूप बनवण्यास मोकळे.

(वाचा :- पहिल्यांदा आई होणा-या महिलांना अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने दिल्यात ‘या’ खास टिप्स!)

बीट सूपाची रेसिपी काय आहे?

सर्वात प्रथम एक कुकर घ्या आणि तो गॅस वर गरम करायला ठेवा. त्यानंतर यात गाजर टाका. त्यानंतर कुकर मध्ये बीट आणि मग लसूण टाका. आता दोन कप पाणी त्यात ओता आणि कुकरचे झाकण लावून मंद आचेवर 3 शिट्या होईपर्यंत उकडू द्या. 3 शिट्या झाल्या की कुकर उघडा. 3 शिट्यांपेक्षा कमी वा जास्त शिट्या अजिबात होऊ देऊ नका. कुकर उघडल्यावर गाजर आणि बीट एका वाडग्यात काढून ठेवा. ही प्रक्रिया झाल्यावर तुम्ही अर्धा टप्पा पूर्ण केला असे समजा. आता पुढील टप्पा पाहू.

(वाचा :- लहान वयात आई झालेली मीरा राजपूत मुलांना सांभाळताना येणा-या अडथळ्यांवर अशी करते आहे मात!)

पुढील रेसिपी

ज्या पाण्यात गाजर आणि बीट उकडले आहे ते पाणी सुद्धा एका भांड्यात काढून घ्या. जेव्हा भाज्या थंड होतील तेव्हा त्यांना ब्लेंडर मध्ये टाकून ब्लेंड करून घ्या. आता एक पॅन घ्या आणि तो गॅस वर ठेवा. पॅन गरम झाल्यावर त्यात तूप टाका. आता जीरा पावडर टाकून थोडे भाजून घ्या. आता यात बीट आणि गाजराची पेस्ट टाका. काही मिनिटे हे मिश्रण शिजू द्या आणि मग यात भाज्यांचे काढून बाजूला ठेवले पाणी टाका. सगळं योग्य प्रकारे शिजू द्या आता यात मिरपूड आणि मीठ टाका. पुन्हा एकदा सर्व मिश्रणाला कढ येऊ द्या. उकळी फुटली की गॅस बंद करा आणि अशाप्रकारे तयार झाले तुमचे बीट सूप! हे थंड झाले की तुम्ही मुलांना खायला देऊ शकता.

(वाचा :- मुलांना हेल्दी बनवण्यासाठी डाएटिशियन ऋजुता दिवेकरचे ‘हे’ ५ नियम करा आवर्जून फॉलो!)

लहान मुलांना कधी द्यावे बीट सूप?

बाळ जर लहान असेल म्हणजे नुकतीच त्याला 6 महिने पूर्ण झाले असतील तर तुम्ही त्याला बीट सूप भरवू शकता. त्यापेक्षा छोट्या बाळाला सूप भरवू नये कारण पाहिले 6 महिने बाळाला आईचेच दूध लागते. त्या दुधातूनच त्याचे पोषण होते. जर तुम्ही अन्य कोणता पदार्थ दिला तर त्याला तो पचणार नाही. 6 महिन्यांपेक्षा पुढील सर्व मुलांना तुम्ही बीट सूप भरवू शकता. मात्र मुलाला एकदा बीट सूप भरवल्यावर 2 दिवस वाट पहावी. त्याला त्यामुळे काही त्रास होत नाही आहे ना ते पाहावे. जर काही त्रास झाला नाही व मुलाला चव सुद्धा आवडली तर तुम्ही त्याला नियमितपणे बीट सूप भरवू शकता.

(वाचा :- तीन वर्ष झाल्यानंतरही बाळाने बोलण्यास सुरुवात न केल्यास असू शकतो ‘हा’ आजार!)

बीट खाण्याचे फायदे

बीट मध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन आणि खनिज पदार्थ असतात. ज्यात व्हिटॅमिन अ, ब, क आणि ई तसेच पोटॅशियम, मेग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यांचा समावेश असतो. यामुळे बाळाला अपचन, अतिसार यांसारखे आजार होत नाहीत. बीट मध्ये लोह सुद्धा अतिशय जास्त प्रमाणात असते यामुळे मुलांमध्ये एनिमियाचा धोका कमी होतो. बीट मध्ये असलेले फायबर बाळाचे पचनतंत्र योग्य राखते आणि अपचन होऊ देत नाही. तर मंडळी हे सगळे फायदे पाहता नक्की आपल्या बाळाला बीट सूप खाऊ घाला.

(वाचा :- बाळाचे केस नैसर्गिकरित्या घनदाट करण्यासाठी ट्राय करा ‘हे’ रामबाण घरगुती उपाय!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *