हिवाळ्यात वजन घटवणे होईल सोपे, जाणून घ्या ब्रेकफास्टपासून ते डिनरपर्यंतचा डाएट प्लान

Spread the love

थंडीच्या दिवसांत बहुतांश जणांचे वजन अतिशय वेगाने वाढते. संशोधनातील माहितीनुसार, आहार आणि हवामानातील बदलामुळे वजन वाढणं स्वाभाविक असते. वजन वाढण्यासोबतच पोटावरही अतिरिक्त चरबी वाढू लागते. थंडीच्या दिवसांत शरीरात जमा झालेली चरबी कमी करणं खरंतर कठीण काम आहे.

पण आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल केल्यास आणि पौष्टिक आहाराचे सेवन केल्यास पोटावरील चरबी सहजरित्या कमी करता येणे शक्य आहे. वजन घटवण्यासाठी आपल्या डाएटमध्ये केवळ पालक आणि सॅलेडच नव्हे तर फायबर, प्रोटीन, पौष्टिक फॅट आणि अन्य आवश्यक पोषक तत्त्वांचा समावेश करणं आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी आपला डाएट प्लान कसा असावा? जाणून घेऊया सविस्तर माहिती
(डिटॉक्स डाएट म्हणजे काय? याचे शरीरावर होणारे महत्त्वाचे परिणाम जाणून घ्या)

​जास्त प्रमाणात फळ आणि भाज्यांचे सेवन करा

हिवाळ्यात वजन आणि पोटावरील चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक प्रमाणात फळे आणि भाज्यांचं सेवन करावे. कारण यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आणि अधिक मात्रेत फायबर असतात. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन, खनिज आणि अन्य आवश्यक अँटी ऑक्सिडंट्सचाही समावेश असतो. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. ज्यामुळे पचन प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने होते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

(व्यायामाला नव्यानं सुरुवात करताना या ५ सोप्या प्रकारांची घ्या मदत)

​प्रोटीनयुक्त आहार

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कॅलरीचे कमी प्रमाणात सेवन करणं आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांत आपण आहारामध्ये अक्रोड, पौष्टिक बिया, कडधान्य, डाळी, अंडे, मासे इत्यादी पौष्टिक आहाराचा समावेश करावा. यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता वाढण्यास मदत मिळते. तसंच वारंवार भूक लागण्याची समस्या देखील दूर होते. प्रोटीनयुक्त डाएट फॉलो केल्यास गोड आणि जंक फूड खाण्याची इच्छा होत नाही. योग्य डाएट फॉलो केल्यास शरीराला प्रोटीनचा पुरवठा होतो आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

(डायबेटिक फुट म्हणजे नेमके काय? जाणून घ्या आजाराची कारणे व धोका)

​जंक फूड खाणे टाळा

अधिक प्रमाणात साखर, सोडिअम आणि सॅच्युरेटेड फॅटचे सेवन केल्यास पोटावर सूज येऊ शकते. याव्यतिरिक्त हृदय विकार, वजन वाढणे, टाइप २ मधुमेह यासारख्या शारीरिक आजारांची लागण होण्याचीही शक्यता असते. वजन वाढू नये यासाठी प्रक्रिया केलेले आणि पाकीटबंद खाद्यपदार्थ खाणे टाळावे. या गोष्टी लक्षात ठेवल्यास हिवाळ्याच्या दिवसांत पोटावर चरबी वाढणार नाही.

(Detox Drink १७ ते २३ नोव्हेंबर, या ७ दिवसांत प्या ७ वेगवेगळे ज्युस, कारणही जाणून घ्या)

​हिवाळ्यात फिट राहण्यासाठी डाएट प्लान

सकाळी ७ वाजता : सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यावे. यामध्ये आपण मध आणि आल्याचा ताजा रस देखील मिक्स करू शकता. यामुळे चयापचयाची क्षमता वाढते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

(Health Care Tips मधुमेह आहे? डोळा सांभाळा…)

सकाळचा नाश्ता ८ वाजता : नाश्त्यामध्ये फायबरयुक्त आहार उदाहरणार्थ ओट्स आणि बाजरी इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. सोबतच एक चमचा अळशीच्या बियांची पावडर, एक ग्लास दूध आणि एक वाटी दह्यासोबत ताज्या फळांचाही समावेश करावा.

स्नॅक सकाळी १० वाजेपर्यंत : मूठभर बदाम आणि अक्रोड

​दुपारचे जेवण

दुपारी १ वाजेपर्यंत: एक वाटी ब्राउन राइस, भाज्या, एक वाटी सॅलेड, एक पोळी आणि डाळ

अल्पोपहार दुपारी ३ वाजता : एक चतुर्थांश कप कप काकडीची कोशिंबीर किंवा एक ग्लास ताक आणि केळी

(उच्च रक्तदाबाचा त्रास आहे? किडनीचं आरोग्य जपणं का आहे आवश्यक ? जाणून घ्या)

​संध्याकाळचा नाश्ता

संध्याकाळी ५ वाजता: मल्टीग्रेन बिस्किटांसह (दोन) एक कप ग्रीन टी

रात्रीचे जेवण ८ वाजता : दोन पोळ्या, एक वाटी डाळ, मिक्स भाज्या आणि पनीर

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी पौष्टिक आहारासोबत व्यायाम करणं देखील आवश्यक आहे. कोणते व्यायाम करणं तुमच्या शरीरासाठी योग्य ठरेल याबाबत आपल्या ट्रेनरकडून माहिती घ्यावी.

NOTE आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा अथवा करू नये, याबाबत आपल्या ओळखीच्या आहारतज्ज्ञांचा तसंच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दुसऱ्या व्यक्तीचे डाएट प्लान फॉलो करण्याची चूक करू नये.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *