हेल्दी रिलेशनशीपसाठी गरजेच्या आहेत ‘या’ ५ गोष्टी!

Spread the love

प्रेमात पडण्याची इच्छा तर सर्वांनाच असते पण प्रेमात पडल्यानंतर मात्र ते नातं निभावणं किती कठीण आहे हे सर्वच जोडप्यांच्या लक्षात येतं. प्रेम करणं व प्रेम अबाधित राखून नातं हसतं-खेळतं ठेवणं तितकं सोपं नसतं जितकं ते सिनेमा व मालिकांमध्ये दाखवलं जातं. भले मग प्रियकर-प्रेयसीचं असो वा पती-पत्नीचं असो, नातं हेल्दी ठेवण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं.

प्रेमात पडल्यानंतरचा काही काळ हा अगदी आनंदात व समजून-उमजून वागण्यात जातो पण कालांतराने विविध गोष्टींवरुन मतभेद होऊ लागतात. या मतभेदांचं रुपांतर वादात होतं आणि टोकाचे वाद नातं तुटण्याच्या मार्गावर घेऊन जातात. त्यामुळे वादाची सुरुवात व मतभेद टाळून निखळ नातं राखायचं असलं तर खाली दिलेल्या ५ गोष्टी प्रामाणिकपणे पाळाव्या लागतात. या ५ गोष्टी तुमचं नातं अनहेल्दी बनवण्यापासून रोखू शकतात.

संवाद

जे लोकांनी कधीकाळी प्रेम केलं होतं व जे आताही प्रेमात आहेत त्या लोकांना चांगलंच माहित आहे की, नात्यात संवाद असणं किती गरजेचं असतं. मेसेज, कॉल, भेटणं, वॉट्सअॅप मेसेज, व्हिडीओ कॉल यापैकी माध्यम कोणतंही असो पण संवाद कायम राहणं गरजेचं असतं. संवाद असला की वाद नाहीसे होतात, कारण गैरसमजांना नात्यात जागा उरत नाही. संवादामार्फत जोडपी आपल्या भावना एकमेकांसमोर मांडू शकतात. जेव्हा दोन्ही व्यक्तींना एकमेकांची परिस्थिती व भावना माहित असतील तेव्हा नात्यातील समजुतदारपणा अधिक वाढतो.

(वाचा :- बॉलिवूडमधील ‘या’ जोडप्यांमुळे कळते लहान वयाची मुलगी का ठरते बेस्ट जोडीदार?)

विश्वास

आजकालच्या काळात अपोजिट जेंडरच्या व्यक्तीसोबत काम करणं, मैत्री करणं, फोनवर बोलणं, फिरायला जाणं किंवा मग सोशल मीडियावर जोडलं जाणं साधारण गोष्ट आहे. पण या गोष्टी बहुतांश वेळा विश्वासाच्या आड येतात. यामुळे सर्वात गरजेचं असतं की नात्यात असणा-या दोघांनी एकमेकांवर डोळे झाकून विश्वास ठेवणं. जर तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल अनकम्फ्ट्रेबल असाल तर ते आपल्या जोडीदाराजवळ व्यक्त करा. तसंच आपल्या जोडीदाराला असुरक्षित वाटत असेल तर याची मजा घेण्यापेक्षा त्याच्या मनातील असुरक्षितता व नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करा. जेणे करुन नात्यातील विश्वास अधिक घट्ट होईल.

(वाचा :- मैत्री जपण्यासाठी या ८ गोष्टी आहेत महत्त्वाच्या)

आदर

प्रेम आपल्या जागी आणि आदर आपल्या! जर जोडीदारावर प्रेम प्रचंड आहे पण तुम्ही त्याचा आदर करत नसाल तर नात्यात नकारात्मकता येण्यास वेळ लागणार नाही. असं झाल्यास तुमचं नातं दिवसेंदिवस अनहेल्दी होत जाईल. बोलण्यातूनच नाही तर कृतीतूनही जोडीदाराविषयी आदर दाखवणं गरजेचं असतं. एकमेकांना दिलेला आदर हर्ट करण्यापासून बचाव करतो. तसंच जोडप्यांना एकमेकांच्या अधिक जवळ आणण्यासोबतच प्रेमावरील विश्वास दृढ करतो.

(वाचा :- “माझे वडिल खोटारडे आहेत” सोनम कपूरने वडिलांबद्दल केला मोठा खुलासा!)

मर्यादा

ब-याचदा जोडपी असं बोलताना दिसतात की, “अरे आपल्यात कसली मर्यादा?” पण सत्य तर हे आहे की, प्रत्येक नात्यासारखीच प्रेमाच्या नात्यामध्ये देखील एक बारीकशी मर्यादेची रेखा ही हवीच. का? ही मर्यादा नात्यातील ओलावा व ओढ कायम ठेवतं. जर असं झालं नाही तर जोडीदाराला वाटू शकतं की आपला पार्टनर वैयक्तिक आयुष्यात जास्तच दखल देतोय. ज्यामुळे त्याची घुसमट होऊ शकते. अशी स्थिती उद्भवू नये म्हणून नात्यात मर्यादा आखणं अत्यंत गरजेचं असतं.

(वाचा :- ‘या’ खास कारणांमुळे विराटने कोहली आहे अनुष्का शर्माच्या प्रेमात वेडा!)

सेल्फ लव्ह

नात्यात सेल्फ लव्ह कुठून आलं? असा विचार तुम्हीही करत असाल तर तुम्ही हेल्दी नात्याची पहिली पायरीच चढला नाहीत. प्रेमाची किंवा हेल्दी नात्याची पहिली पायरी तुम्ही तेव्हाच चढाल जेव्हा तुम्ही सेल्फ लव्ह करायला शिकाल. जे लोक स्वत:वर प्रेम करु शकत नाहीत ते रिलेशनशीपमध्ये कधीच खुश राहू शकत नाहीत. अशा नात्यात नकारात्मकता असते. त्यामुळे कोणाच्या प्रेमात पडण्याआधी सेल्फ लव्ह करायला नक्की शिका.

(वाचा :- लग्नाच्या नावानेही अभिनेत्री फातिमा सना शेखला वाटते भिती! तिच्यासारखे विचार आयुष्याचं का करतात नुकसान?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *