हे एक असं स्वस्त व मस्त होममेड बटर आहे जे तुमचं हृदय ठेवतं तंदुरुस्त!

Spread the love

असं बटर जे आर्टरीजमध्ये जमत नाही

शेंगदाण्यांमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतं. एका वैज्ञानिक अध्ययनानुसार पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे हृदय रोगापासून बचाव करता येतो. तसंच पौष्टिक शेंगदाण्यांपासून तयार केलं जाणारं पीनट बटर हार्ट आर्टरीज ब्लॉक करत नाही. उलट हे नसांना पोषण देऊन त्यांना लवचिक ठेवण्यास मदत करतं.

(वाचा :- थायरॉइड ठेवायचा असेल नैसर्गिकरित्या नियंत्रणात तर नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन!)

हृदय असं ठेवतं स्वस्थ

पीनट बटर मध्ये जगातील सर्व बटरच्या तुलनेत सर्वात कमी फॅट असतं. हे जे कमी प्रमाणात फॅट असतं ते देखील अनसॅच्युरेटेड असतं. म्हणजे असं फॅट जे नसांमध्ये जमून राहत नाही. या चरबीमुळे हानिकारक कोलेस्ट्रॉल म्हणजे कमी घनतेचे लिपोप्रोटिन कमी होते आणि निरोगी कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. हेल्दी कोलेस्ट्रोल शरीरातील रक्तप्रवाह सुरुळीत ठेवण्याचे काम करते.

(वाचा :- डोक्यात सतत येतायत नकारात्मक विचार? मग अशी जपा सकारात्मकता!)

पोटॅशियमची भरपूर मात्रा

तुम्हाला माहित आहे का? पीनट बटरमध्ये ६०% पॉटेशियम सामावलेले असते. हे पोटॅशियम आपल्या शरीरातील रक्त प्रवाह संतुलित ठेवण्यास तसेच आपल्या हृदयाचे ठोके नॉर्मल ठेवण्यास मदत करते. रक्त अधिक घट्ट झालं किंवा अधिक पातळ झालं तर दोन्ही स्थिती आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात. पण जर तुम्ही आहारात पीनट बटर खात असाल तर तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात पोटॅशियमची प्राप्ती होते. पण ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवा की प्रत्येक पदार्थाचं सेवन हे एका मर्यादीत प्रमाणातच योग्य आणि लाभदायक असते. गरजेपेक्षा अधिक खाल्ल्यास लाभदायक पदार्थही आरोग्यास नुकसान पोहचवतात. त्यामुळे दिवसातून एकदाच या बटरचं सेवन करावं.

(वाचा :- कोरफडीच्या गराचे सेवन करत नसाल तर आजच सुरुवात करा, दिसून येतील अगणित लाभ!)

स्वाद आणि आरोग्यदायी गुणधर्मांचा संगम

पीनट बटर स्वाद आणि आरोग्यदायी गुणधर्मांचा अनोखा संगम आहे. कारण हे इतर विविध प्रकारच्या बटर सारखाच आपल्याला स्वादाचा आनंद देतं पण त्या बटरसारखं आरोग्याचं नुकसान मात्र करत नाही. उलट आरोग्यास असणा-या धोक्यांपासून बचाव करतं. कारण यामध्ये असलेलं अनसॅच्युरेटेड फॅट शरीरातील इन्सूलिनची पातळी संतुलित ठेवण्याचं काम करतं. यामुळे तुम्ही डायबिटीज टाईप २ च्या विळख्यात अडकण्यापासून वाचता. जर तुम्हाला आजन्म डायबिटीजच्या आजारापासून दूर राहायचं असेल तर शुद्ध पीनट बटरचे सेवन नक्की करा.

(वाचा :- व्यायामासाठी कशाला हवा खास वेगळा वेळ? बसल्या जागी असा करा व्यायाम!)

प्रोटीन डायट

आजवरच्या आयुष्यात तुम्हाला जरुर कोणाकडून ना कोणाकडून हा सल्ला मिळाला असेलच की कमजोरीपासून दूर राहायचं असेल तर प्रोटीन डायट घ्या. पीनट बटरमध्ये ३०% हिस्सा हा प्रोटीनचा असतो. हे हेल्दी प्रोटीन शरीरात जाऊन अमिनो अॅसिडमध्ये बदलतं आणि शरीरातील मृत पेशींना जीवदान देऊन नवीन पेशी निर्माण करण्यास सहकार्य करतं.

(वाचा :- चक्कर येऊ लागल्यास ताबडतोब करा ‘हे’ उपाय, काही सेकंदातच डोकं होईल शांत!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *