How to make: हॉटेल स्टाइल दाल मखनी रेसिपी
गॅसवर कूकर गरम करत ठेवा. यानंतर त्यात एक कप स्वच्छ धुतलेली अख्ख्या उडदाची डाळ, राजमा, आवश्यकतेनुसार पाणी घ्या आणि सर्व सामग्री उकळत ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यात एक चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे मोहरीचे तेल टाका. सात ते आठ शिट्या येईपर्यंत सामग्री शिजू द्यावी.
Step 2: कांद्यासह अन्य सामग्री तेलात फ्राय करा
दुसऱ्या कढईत दोन चमचे तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या, आले टाका. आता त्यात कपभर चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा परतून झाल्यावर त्यात एक चमचा जिरे घालावे. कांद्याचा रंग हलका चॉकलेटी होईपर्यंत सर्व सामग्री फ्राय करत राहा.

Step 3: दाल मखनीचा मसाला
यानंतर कढईमध्ये टोमॅटोची पेस्ट घाला, सर्व पदार्थ तीन ते चार मिनिटांसाठी शिजू द्या. आता त्यात एक चमचा चिरलेली हिरवी मिरची, एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धणे पूड देखील मिक्स करा. दाल मखनीचा मसाला तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा.

Step 4: डाळ आणि मसाला मिक्स करा
कूकरच्या सात ते आठ शिट्ट्या झाल्यानंतर त्यावरील कूकरचे झाकण काढा आणि शिजलेली डाळ कढईतील मसाल्यामध्ये मिक्स करा. सर्व सामग्री शिजल्यानंतर वरून फ्रेश क्रीम मिक्स करावी.

Step 5: खमंग दाल मखनी आहे तयार
पाहा संपूर्ण व्हिडीओ : तयार झाली आहे आपली गरमागरम दाल मखनी. ही डिश तुम्ही पराठा किंवा पोळीसोबत खाऊ शकता.

घरीच तयार करा हॉटेलसारखी दाल मखनी
Source link
Recent Comments