How to make: होममेड ब्रेड दही वडा
ब्रेड स्लाइस घ्या व त्याचे कोपरे काढा आणि ते बाजूला ठेवून द्या.
Step 2: वड्यांसाठी मसाला तयार करून घ्या
एक बाउल घ्या. त्यामध्ये उकडलेले दोन बटाटे मॅश करा. बटाट्यांमध्ये चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा आमचूर पावडर, चार ते पाच मनुके, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. सर्व सामग्री एकजीव करा. तयार झाला आहे तुमचा दही वड्यांचा मसाला.

Step 3: वडे तयार करण्याची स्टेप
यानंतर ब्रेड स्लाइसवर थोडेसं ताक लावा. मसाल्याचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्या. हा मसाला ब्रेड स्लाइसवर ठेवा आणि हलक्या हाताने मिश्रणाचे वडे तयार करा.

Step 4: ब्रेड वडे फ्राय करा
आता पॅनमध्ये तूप गरम करत ठेवा. तूप गरम झाल्यावर त्यात हे वडे बटाटा स्टफिंगच्या बाजूने तळून घ्या. यानंतर दोन्ही बाजूनं वडे चांगल्या पद्धतीने फ्राय करा. मध्यम आचेवर वडे फ्राय करून घ्यावेत.

Step 5: चटपटीत ब्रेड दही वडे
वडे तयार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यात थोडेसे गोड दही, चिंचेची चटणी, कोथिंबिरीची चटणी, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, लाल तिखट चवीनुसार मिक्स करा. यानंतर वरून पुन्हा थोडेसे दही, काळे मीठ, कोथिंबिरीचा समावेश करा. तयार झाले आहेत आपले ब्रेड दही वडे. या चटपटीत डिशचा आस्वाद घ्या आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा.

Step 6: ब्रेड दही वडे रेसिपीच प्रत्येक स्टेप जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ

इन्स्टंट ब्रेड दहीवडा
Source link
Recent Comments