५३ वर्षांच्या माधुरी दीक्षितचा ग्लॅमरस अवतार, शॉर्ट ड्रेसमधील फोटोमुळे सोशल मीडियावर धुरळा

Spread the love

माधुरीच्या ग्लॅमरस लुकमुळे चाहते घायाळ

माधुरी दीक्षितने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ग्लॅमरस लुकमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिनं मजेंटा रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केल्याचे आपण पाहू शकता. या शॉर्ट ड्रेसमध्ये शीअर फॅब्रिक वापरून त्यास रफल डिझाइन टच देण्यात आलाय. सॅटन मेड बेल्टमुळे आउटफिटला आकर्षक लुक मिळाला आहे.

(रंग खुलवतील सौंदर्य! आउटफिट व अ‍ॅक्सेसरीजची अशी करा निवड)

या लुकसाठी माधुरीने मेकअप देखील स्टायलिश केला होता. लाइट टोन मेकअप आणि वेव्ह हेअर स्टाइलमध्ये माधुरी दीक्षित प्रचंड सुंदर दिसतेय. माधुरीच्या या लुकवर चाहते फिदा झाले आहेत. चाहत्यांनी फोटोवर कमेंट्स आणि लाइकचा अक्षरशः वर्षाव केलाय. ‘सारा-दीपिकापेक्षाही सुंदर’, ‘अजूनही विशीतलीच वाटतेय’, अशा कमेंट्स करत चाहत्यांनी माधुरीवर प्रेमाचा वर्षाव केला. दरम्यान मौनी रॉयनेही गुलाबी रंगाच्या आउटफिटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण स्टाइलच्या बाबतीत माधुरीने बाजी मारल्याचे दिसलं.

मौनी रॉयचा बोल्ड लुक

मौनी रॉयने टुल आणि सॅटन मेड आउटफिटमधील स्टायलिश फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यामध्ये फ्लेअर्ड पँट आणि क्रॉप टॉपचा समावेश आहे. तर या क्रॉप टॉपमध्ये डीप कट नेकलाइन आणि स्पगेटी स्लीव्ह्ज डिझाइन आपण पाहू शकता. यामुळे मौनीच्या लुकला बोल्ड टच मिळाला आहे. दरम्यान मौनीनं या ड्रेसवर बलून स्लीव्ह्ज डिझाइनचे जॅकेट देखील मॅच केले होते. हे जॅकेट शीयर फॅब्रिकपासून तयार करण्यात आलं आहे. या लुकमध्ये मौनी नेहमी प्रमाणेच सुंदर दिसत होती. पण सोशल मीडियावर माधुरीच्या सौंदर्याचीच चर्चा सर्वाधिक होतेय.

(आलिया भटने या स्टायलिश लुकसाठी केला तब्बल सात लाख रुपयांचा खर्च)

​लाल रंगाच्या गाउनमधील स्टनिंग लुक

यापूर्वीही माधुरी दीक्षितने आपल्या वेस्टर्न लुकने चाहत्यांना क्लीन बोल्ड केलंय. एका कार्यक्रमासाठी माधुरीने लाल रंगाचा शिमरी गाउन परिधान केला होता. वाइन रेड कलरच्या या आउटफिटमध्ये स्पगेटी स्लीव्ह्ज आणि प्लंजिंग नेकलाइन डिझाइन आपण पाहू शकता. ड्रेसमध्ये टुल पॅच देखील जोडण्यात आलं होतं. स्लिट डिझाइनमुळे ड्रेसला ग्लॅमरल लुक मिळालाय. या लुकसाठी माधुरीने डायमंड ज्वेलरी आणि हाय हील्स मॅच केले होते. ज्यामुळे तिचा लुक परफेक्ट दिसतोय.

(मैं अपनी फेवरेट हूं! २०२० मधील करीना कपूरचे पाच सुपर स्टायलिश लुक)

रेड कार्पेटवरील फॅशनचा जलवा

माधुरी दीक्षित रेड कार्पेट इव्हेंटसाठीही बहुतांश वेळा ग्लॅमरस लुकची निवड करताना दिसते. या फोटोच्या माध्यमातून आपण दोन हटके लुक पाहू शकता. एका फोटोमध्ये माधुरीने वेलवेटचे वन शोल्डर गाउन परिधान केलंय, ज्यामध्ये स्लिट आणि टेल डिझाइन देखील होतं. धकधक गर्ल माधुरीच्या या लुकमुळे चाहते घायाळ झाले होते. तर दुसऱ्या फोटोमध्ये लाल रंगाचा ऑफ शोल्डर आउटफिट आपण पाहू शकता. या ड्रेसमध्येही माधुरी प्रचंड आकर्षक दिसतेय. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर ही अभिनेत्री तितकीच सुंदर-मोहक आणि फिट आहे. याची झलक तुम्ही या फोटोंद्वारे पाहू शकता. तुम्हाला माधुरी दीक्षितची ही स्टाइल आवडली का?

(ख्रिसमस पार्टीसाठी हवाय हटके लुक? फॉलो करा आवडत्या सेलिब्रिटींच्या ‘या’ हेअर स्टाइल)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *