Aishwarya Rai ऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो

Spread the love

​लग्नानंतरचा लुक

ऐश्वर्या रायने वर्ष २००७ मध्ये अभिषेक बच्चनसोबत थाटामाटात लग्न केलं. लग्नसोहळ्यानंतर ती सर्व प्रथम बच्चन कुटुंबीयांसह एका मंदिरामध्ये दिसली होती. पूजेसाठी ऐश्वर्याने लाल रंगाची सिल्क पॅटर्न साडी नेसली होती. यावर सोनेरी धाग्यांनी विणकाम करण्यात आले होते. साडीवर तिने मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या आणि झुमके असे दागिने घातले होते. या लुकसाठी ऐश्वर्याने कमीत कमी मेकअप केला होता.

(Bollywood Fashion अनुष्का शर्माच नव्हे तर या अभिनेत्रींनीही प्रेग्नेंसीमध्ये परिधान केले होते स्विमसूट)

पांढऱ्या साडीतील मोहक रूप

पांढऱ्या रंगाची साडी नेसणे कित्येक महिला टाळतात. कारण या रंगाची साडी नेसून स्टायलिश लुक कॅरी करणं कठीण जाते. पण ज्या महिलांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे, त्या ऐश्वर्याचा हा लुक फॉलो करू शकतात. अ‍ॅशच्या साडीवर चिकनकारी आणि मण्यांचे वर्क करण्यात आले होते. या साडीवर तिनं गोल्डन आणि पर्ल ज्वेलरी परिधान केली होती. हेअर स्टाइल म्हणून तिने केसांचा अंबाडा बांधला होता, त्यावर गजरा देखील माळला आहे. अशा पॅटर्नची एखादी साडी नेसून तुम्ही देखील स्टायलिश दिसू शकता.

(ऐश्वर्या रायपासून ते अनुष्का शर्मापर्यंत, ‘या’ दागिन्यांशिवाय राहू शकत नाहीत हे ५ स्टार्स)

​काळ्या साडीतील सौंदर्य

काळा ड्रेस परिधान करणं तुमच्यासाठी कम्फर्टेबल नाही? तर मग ऐश्वर्या रायचा हा साडी लुक परफेक्ट चॉइस ठरू शकतो. एका सिनेमाच्या प्रीमियर शो साठी तिनं ही काळ्या आणि सोनेरी रंगाची साडी नेसली होती. सब्यसाची मुखर्जी यांनी ही साडी डिझाइन केली होती. यावर तिनं वेलव्हेट पॅटर्नचे स्ट्रॅप ब्लाउज परिधान केले आहे. या साडीवर अ‍ॅशने कोणत्याही प्रकारची ज्वेलरी परिधान केलेली नाही. या साडीमध्ये ऐश्वर्या प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

(बॉयफ्रेंडसोबत दिसली सुष्मिता सेन, प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलचा स्टायलिश लुक लई भारी)

​राखाडी रंगाची साडी

ऐश्वर्याच्या वॉर्डरोबमध्ये सिल्कच्या साड्यांचे चांगले कलेक्शन आहे. त्यामध्ये या राखाडी रंगाच्या साडीचाही समावेश आहे. साडीच्या पदरावर आणि बॉर्डरवर अतिशय बारीक स्वरुपातील एम्ब्रॉयडरी करण्यात आल्याचे तुम्ही पाहू शकता. ऐश्वर्याने हा डल ग्रे लुक आकर्षक दिसण्यासाठी मरून रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. ज्यावर चंदेरी रंगाच्या धाग्याने विणकाम करण्यात आलं होतं. या लुकसाठी तिनं रेड स्टोनचे डँगलर्स कानात घातले होते.

(सिनेमातील त्या सीनसाठी जेव्हा मनीष मल्होत्राने वापरलं चक्क राणी मुखर्जीच्या आईचे मंगळसूत्र)

​लाल रंगाची साधी पण सुंदर साडी

लाल रंगाच्या या साडीमध्ये ऐश्वर्या राय नेहमी प्रमाणेच सुंदर दिसतेय. एका कार्यक्रमासाठी तिने या लाल रंगाच्या जॉर्जेट पॅटर्न साडीची निवड केली होती. या साडीच्या पदरावर सोनेरी रंगाच्या धाग्यांनी काळ्या रंगाचे वेलव्हेट फॅब्रिक जोडण्यात आले आहे. सीक्वेन्स वर्क असणारे बॉर्डर तुम्ही साडीवर पाहू शकता. ब्लाउजवरही तशाच डिझाइनचे बॉर्डर दिसत आहे. ऐश्वर्याने साडीवर गोल्डन बांगड्या आणि सुंदर ईअररिंग्स मॅच केले होते. तर केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजराही माळला होता.

(Radhika Merchant नीता अंबानींच्या होणाऱ्या सूनेचे हे पाच डिझाइनर लेहंगे पाहिले का?)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *