Almonds Skincare बदामामुळे कोरड्या त्वचेपासून होईल सुटका, जाणून घ्या योग्य पद्धत

Spread the love

हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे आणि त्वचेला खाज सुटणे या सामान्य समस्या आहेत. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी शरीर हायड्रेट असणं आवश्यक आहे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहील. याव्यतिरिक्त त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करणाऱ्या स्किन केअर प्रोडक्टचाही उपयोग करावा. दरम्यान त्वचेला (Skin Care Tips) नैसर्गिक स्वरुपातील मॉइश्चराइझर देण्यासाठी आपण बदामाच्या तेलाचाही उपयोग करू शकता.

बदामाच्या तेलाचा योग्य प्रकारे वापर केल्यास त्वचेशी संबंधित कित्येक समस्या दूर होण्यास मदत मिळेल. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड भरपूर असते. हे घटक आपल्या त्वचेसाठी पोषक आहेत. बदाम तेलाच्या उपयोगामुळे त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते. यामुळे वृद्धत्वाची लक्षणे देखील दूर होतात. हिवाळ्यामध्ये बदामाचा त्वचेसाठी कसा उपयोग करावा? जाणून घेऊया सविस्तर माहिती…
(Body Massage हिवाळ्यात शरीराचा मसाज केल्यानं मिळतात हे ५ मोठे आरोग्यदायी लाभ)

​मुरुमांचे डाग होतात कमी

बदामाच्या दुधाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग कमी होण्यास मदत मिळते. तसंच मुरुम व मुरुमामुळे होणाऱ्या वेदनेतूनही मुक्तता होते. बदामाचे दूध आणि गायीचे दूध एकत्र करून हे मिश्रण आपण चेहऱ्यावर लावू शकता. या नैसर्गिक उपचारामुळे चेहऱ्यावरील मुरुम लवकरात लवकर दूर होण्यास मदत मिळेल. कारण यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.

(द्राक्षबियांच्या तेलाचे त्वचा आणि केसांसाठी फायदे, जाणून घ्या कसा करायचा वापर)

​अँटी-एजिंग

चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी बदामाचे तेल, बदाम पेस्ट किंवा बदामाचे दुधाचा वापर आपण करू शकता. यासाठी काही बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर भिजलेले बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि लेप सुकल्यानंतर थंड पाण्यानं आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.

(करीना-अनुष्‍कासह अन्य सेलिब्रिटीही करतात मुरुमांचा सामना, करतात हे नैसर्गिक उपाय)

​कोरडेपणा कमी करण्यासाठी

अधिक संवेदनशील आणि कोरड्या त्वचेसाठी आपण बदामाच्या दुधाचा वापर करू शकता. आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन कप बदामाचे दूध मिक्स करा. यामुळे कोरड्या, निस्तेज, निर्जीव त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. त्वचेला येणारी खाज देखील कमी होईल. बदामातील पोषण तत्त्वांमुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल.

(Winter Foot Care Tips टाचांच्या भेगा दूर करायच्या आहेत? हिवाळ्यात अशी घ्या पायांची काळजी)

​त्वचा विकार होतील दूर

एक्झिमासारखे त्वचा विकार दूर करण्यासाठी बदाम रामबाण उपाय आहे. शरीरावरील स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठीही आपण बदामाचा उपयोग करू शकता. बदामाच्या पेस्टमुळे त्वचेवरील डाग देखील दूर होण्यास मदत मिळते.

(थंडीत बॉडी मसाज का करावा, आयुर्वेदानुसार कोणते तेल वापरल्यास मिळतील जास्त लाभ? जाणून घ्या)

​मेकअप काढण्यासाठी

चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी तसंच त्वचेवरील दुर्गंध, धूळ-मातीचे कण स्वच्छ करण्यासाठी आपण बदामाच्या तेलाचा उपयोग करू शकता. बदामातील पोषण तत्त्वांमुळे त्वचा मऊ आणि नितळ होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त या तेलाच्या मदतीने आपण सहजरित्या मेकअप देखील काढू शकता.

(चेहऱ्याची त्वचा अशी डिटॉक्स करते अनुष्का शर्मा, तजेलदार त्वचेसाठी असं फॉलो केलं जातं रुटीन)

​आंघोळ केल्यानंतर लावा बदाम तेल

आंघोळ केल्यानंतर मॉइश्चराइझर म्हणून आपण संपूर्ण शरीरावर बदामाचे तेल लावू शकता. आंघोळीनंतर आपली त्वचा ओलसर असते, ज्यामुळे त्वचा तेल सहजरित्या शोषून घेते. यामुळे त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते.

(नितळ व डागविरहित त्वचेसाठी रात्री चेहऱ्यावर अशा पद्धतीने लावा कोरफड जेल)

NOTE : त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *