Aloe Vera घरच्या घरी कसे तयार करायचे अ‍ॅलोव्हेरा जेल?

Spread the love

​घरगुती अ‍ॅलोव्हेरा जेल कसे तयार करावे?

सामग्री – कोरफडीचे एक पान, एक छोटा चमचा, मिक्सर, एक हवाबंद डबी, व्हिटॅमिन सी पावडर किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल

जेल तयार करण्याची पद्धत : जेल तयार करण्यासाठी जवळपास ३० मिनिटांचा कालावधी लागू शकतो. कोरफडीच्या रोपट्याचे मोठे पान घ्यावे. चाकू किंवा पेपर कटरच्या मदतीने पानाच्या टोकरी कडा कापून घ्या. यानंतर यातील गर काढावा. चमच्याच्या मदतीने हा गर काढून एका वाटीमध्ये ठेवा.

(Natural Hair Care नैसर्गिक सामग्रींपासून कसे तयार करायचे घरगुती हेअर पॅक?)

​अ‍ॅलोव्हेराची पेस्ट तयार करा

आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरफडीचा गर टाका आणि पातळ पेस्ट तयार होईपर्यंत गर वाटून घ्या. तयार झालेल्या पेस्टमध्ये व्हिटॅमिन सी पावडर किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा. या दोन्ही सामग्रीमध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटी एजिंग गुणधर्म आहेत. तुम्हाला नको असल्यास व्हिटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन ई मिक्स करू नये. केवळ कोरफडीचा गर चेहऱ्यासाठी वापर करू शकता.

(Aloe Vera Benefits कोरफड जेल रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवल्यास काय होते? वाचा माहिती)

​किती दिवस वापरू शकतो जेल?

घरामध्ये तयार केलेल्या अ‍ॅलोव्हेरा जेलचा शक्यतो लगेचच वापर करावा. हे जेल दुसऱ्या दिवशी वापरण्याची चूक करू नये. यासाठीच जेल तयार करताना एक किंवा दोन पानांचा उपयोग करावा. कोरफड जेलमुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. या वनस्पतीमध्ये नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझिंगचे गुणधर्म आहेत. तसंच यात व्हिटॅमिन आणि खनिजांचा साठा आहे. हे घटक आपल्या त्वचेसाठी पोषक आहेत.

(Steaming Benefits चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेणे योग्य आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत)

​कसा करायचा ताज्या जेलचा उपयोग?

चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर तुम्ही अ‍ॅलोव्हेरा जेल थेट आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही स्मूदी किंवा एखाद्या ड्रिंकमध्येही अ‍ॅलोव्हेरा मिक्स करू शकता. यापासून तुम्हाला आरोग्यवर्धक किंवा सौंदर्यवर्धक लाभ मिळू शकतात. सनबर्न, दुखापतीचे व्रण, मुरुम, काळवंडलेली त्वचा, त्वचेवर होणारी जळजळ इत्यादी समस्या दूर करण्यासाठीही तुम्ही कोरफड जेलचा उपयोग करू शकता.

(Natural Skin Care स्किन केअर रुटीनमध्ये अक्रोडचा कसा आणि किती प्रमाणात समावेश करावा?)

​कोरफड कोणी वापरू नये?

गर्भवती महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिला आणि १२ वर्षांखालील मुलांनी कोरफडीचे सेवन करणं टाळावे. तसंच कोरफडीचा उपयोग केल्यानंतर आपले शरीर कोणत्याही प्रकारचे संकेत देते, याकडेही लक्ष द्यावे. उदाहरणार्थ जेल लावल्यानंतर त्वचेला खाज सुटणे, त्वचा लाल होणे इत्यादी कोणत्याही समस्या उद्भवल्यास कोरफड जेलचा वापर करू नये. तसंच तुम्हाला लसूण, कांदा किंवा ट्युलिपची अ‍ॅलर्जी असल्यास अ‍ॅलोव्हेराचा उपयोग करणं टाळावे.

(Natural Skin Care घरच्या घरी कसे तयार करायचे ऑरेंज पील ऑफ मास्‍क?)

NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार एकसारखा नसतो.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *