Aloe Vera Benefits कोरफड जेल रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवल्यास काय होते? वाचा माहिती

Spread the love

​चेहऱ्यावर अ‍ॅलोव्हेरा जेल लावण्याचे फायदे

कित्येक ब्युटी प्रोडक्टमध्ये अ‍ॅलोव्हेरा जेलचा वापर केला जातो. सौंदर्य प्रसाधनांप्रमाणेच कोरफडचा रस देखील चेहऱ्यासाठी लाभदायक आहे. या औषधी वनस्पतीमध्ये ७५ प्रकारचे घटक असतात. ज्यामध्ये मुख्यतः व्हिटॅमिन, खनिजे, सॅलिसिलिक अ‍ॅसिड, लिग्निन, सॅपोनिन यांचा समावेश असतो.

(Natural Hair Care नैसर्गिक सामग्रींपासून कसे तयार करायचे घरगुती हेअर पॅक?)

​कसा करावा कोरफड जेलचा वापर

केमिकलयुक्त प्रोडक्टमुळे होणारे दुष्परिणाम पाहता प्रत्येक जण आता आयुर्वेदिक, हर्बल उपचार करण्यावर भर देत आहेत. नैसर्गिक उपचारांमुळे चेहऱ्याला दीर्घ काळासाठी फायदे मिळतात आणि महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपाय केल्यास दुष्परिणामही होत नाहीत. कशा पद्धतीने कोरफड जेलचा (aloe vera benefits) त्वचेसाठी वापर करावा, जाणून घेऊया काही नैसर्गिक उपायांची माहिती.

(Skin Care Tips चेहरा धुताना तुम्ही देखील या चुका करता का? जाणून घ्या या ५ गोष्टी)

​कोरफड आणि काकडी

काकडी व कोरफड एकत्र करून चेहरा आणि डोळ्यांच्या आसपास लावा. कोरफड जेल आणि काकडी मिक्सरमध्ये वाटून घ्या. यानंतर एका स्वच्छ कापडाच्या मदतीने काकडी – कोरफडचा रस बाउलमध्ये गाळून घ्या. हा रस तुम्ही कापसाच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. याद्वारे तुमच्या त्वचेला व्हिटॅमिन ईचा पुरवठा होईल आणि त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत मिळेल. हवे असल्यास तुम्ही व्हिटॅमिन ई तेलासह देखील कोरफड जेल मिक्स करू शकता. नियमित हे उपाय केल्यास चेहऱ्यावर सकारात्मक बदल पाहायला मिळतील.

(Hair Care केसांसाठी सल्फेट फ्री शॅम्पू का वापरावा? तुम्हाला याचे फायदे माहिती आहेत का)

​अ‍ॅलोव्हेरा फेस स्क्रब

कोरफड जेल आणि ग्राउंड ओटमील एकत्र घ्या. जाडसर मिश्रण तयार करा. नियमित या स्क्रबचा वापर करावा. ओटमील आपली त्वचा एक्सफोलिएट करण्याचं कार्य करते. तर कोरफडमुळे त्वचेला थंडावा मिळतो.

चेहऱ्यासाठी अ‍ॅलोव्हेरा लेप

तुमच्या घरामध्ये कोरफडचे रोपटे असेल तर त्यातील ताजा गर काढून घ्या. यामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाचे तेल मिक्स करा. मिश्रण तयार झाल्यावर चेहऱ्यावर लावा. हेअर पॅक म्हणूनही याचा वापर होऊ शकतो.

(Natural Hair Care दही आणि केळ्यापासून घरामध्ये कशी तयार करायची हेअर स्पा क्रीम? जाणून घ्या माहिती)

​कोरफड जेल रात्रभर चेहऱ्याला लावण्याचे फायदे

आपल्या चेहऱ्यावर शुद्ध कोरफड जेलनं मसाज करा आणि रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा. यातील पोषण तत्त्वांमुळे त्वचेला लाभ मिळतात. सर्वप्रथम फेस वॉशने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. कॉटनच्या कापडाने चेहरा पुसून घ्यावा. यानंतर कोरफड जेल चेहरा आणि मानेवर लावा. आवश्यकता वाटल्यास तुम्ही एसेंशियल ऑइलचाही वापर करू शकता. चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर जेल चेहऱ्यावर राहू द्या. नियमित स्वरुपात हा उपाय केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. सोबत मुरुम आणि मुरुमांचे डाग देखील कमी होतात.

(Hair Care Tips आंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा)

NOTE चेहरा आणि त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *