Ankita Lokhande अंकिता लोखंडेचा मोहक आणि सुंदर साडी लुक, पाहा फोटो

Spread the love

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) नॅचरल ब्युटी आहे, यामध्ये कोणतेही दुमत नाही. कोणत्याही प्रकारच्या आउटफिटमध्ये अंकिताचा लुक अप्रतिमच असतो. वेस्टर्नपासून ते पारंपरिक वेशभूषा अंकिता अगदी सहजरित्या कॅरी करते. दरम्यान, अन्य पोषाखाच्या तुलनेत पारंपरिक वेशभूषेमध्ये अंकिता जास्त सुंदर दिसते. गणेश उत्सवामध्येही वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्यांमधील अंकिताचा आकर्षक लुक चाहत्यांना पाहायला मिळाला. अंकितानं आपले ट्रेडिशनल अवतारातील कित्येक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या फोटोंवर चाहत्यांसह तिच्या मित्र – मेत्रिणींनी देखील लाइक आणि कमेट्सचा अक्षरशः पाऊस पाडला. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लुकमधील तिचे फोटो पाहायला मिळतील.
(Ganesh Utsav 2020 अंकिता लोखंडेने महाराष्ट्रीयन लुकमधील सुंदर फोटो केले शेअर)

​गणेश चतुर्थीचा दिवस

गणेश चतुर्थीच्या दिवशी अंकिता लोखंडेने पिवळ्या रंगाच्या साडीतील आपले फोटो शेअर केले होते. लायनिंग प्रिंटच्या या साडीच्या बॉर्डवर हिरव्या आणि सोनेरी रंगाच्या धाग्यांनी डिझाइन करण्यात आली होती. मराठमोळ्या पद्धतीनेच अंकिताने ही साडी नेसली होती. साडीवर तिनं मॅचिंग हिरव्या रंगाचा हाफ स्लीव्ह्ज ब्लाउज परिधान केला होता. ब्लाउजवर देखील सोनेरी रंगाच्या धाग्यांनी डिझाइन करण्यात आल्याचे दिसत आहे. अंकितानं सोन्याचे दागिने परिधान केले होते. ज्यामध्ये सर्वात खास अंकिताची नथ दिस होती आणि यामुळे तिला परफेक्ट मराठमोळा लुक मिळाला होता.

(शिल्पा शेट्टीनं आपल्या ६ महिन्यांच्या लेकीसाठी तयार करून घेतला स्पेशल ड्रेस)

​लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत होती सुंदर

यानंतर अंकिताने सिल्क पॅटर्नमधील साडीतील आपले फोटो शेअर केले. गडद लाल रंगाच्या साडीवर सोनेरी आणि चंदेरी धाग्यांनी विणकाम करण्यात आले होतं. विशेषतः पदरावर धाग्यांच्या मदतीने सुंदर डिझाइन केल्याचे दिसत होते. या साडीमध्ये अंकिता सुंदर आणि मोहक दिसत होती. अंकिता या साडीवर गोल्ड आणि पर्ल चे स्टेटमेंट ईअररिंग्स व महाराष्ट्रीयन नथ परिधान केली होती. तिच्या गळ्यामध्ये हलक्या स्वरुपातील चोकर नेकलेस दिसत आहे. तसंच तिनं कंबरपट्टा देखील परिधान केला होता. अंकिता लोखंडेने लुकसाठी अंबाडा हेअर स्टाइल केली होती. तर हातामध्ये साडीला मॅचिंग अशा बांगड्या देखील दिसत आहेत.

(Ankita Lokhande ‘पवित्र रिश्ता’मधील अंकिता लोखंडेचा स्टायलिश अवतार)

​गुलाबी रंगाच्या साडीतील मोहक रूप

लाल रंगाच्या साडीनंतर अंकितानं इन्स्टाग्रामवर हलक्या गुलाबी रंगाची साडीतील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. या साडीवर सोनेरी रंगांची मोठी बॉर्डर दिसत आहे. तर संपूर्ण पदरावरही सोनेरी रंगाचे लायनिंग डिझाइन होतं. तसंच गोल्डन पोल्क डॉट्स देखील दिसत होते. या सुंदर साडीवर अंकिताने डीप नेकलाइन डिझाइनचे हाफ स्लीव्ह्ज ब्लाउज परिधान केलं होतं.

(करीना कपूरचा हा अवतार पाहून सर्व झाले स्तब्ध, इव्हेंट संपल्यानंतर लक्षात आली चूक)

​स्टायलिश अंबाडा

हेअर स्टाइल म्हणून तिनं स्टायलिश अंबाडा घातला होता. दागिन्यांबाबत सांगायचे झाले तर अंकिताने केवळ सोनेरी रंगाचे झुमके परिधान केले होते. एकूणच या साडीतील तिचा लुक परफेक्ट होता.

(अंकिता लोखंडेनं हिना खानची स्टाईल केली कॉपी? फोटो झाले होते व्हायरल)

​गणपती विसर्जनच्या दिवशी परिधान केला होता ड्रेस

अंकिताने (Ankita Lokhande Saree Look) एका पाठोपाठ एक सुंदर साडीतील लुक शेअर केल्यानंतर गणपती विसर्जनाच्या दिवशी ड्रेस परिधान केला होता. जांभळ्या रंगाचा साधा कुर्ता तिनं घातला होता. ज्यावर गडद निळ्या रंगाच्या फॅब्रिकचाही वापर करण्यात आला होता. तसंच यावर सोनेरी रंगाचे प्रिंट देखील दिसत आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनच्या दिवशी अंकिताची वेशभूषा अतिशय साधी होती. तिनं कमीत कमी दागिने परिधान केले होते आणि हेअर स्टाइल म्हणून साधा मेसी लुक पोनी बांधला होता.

(Hairstyles For Women या ५ सोप्या हेअर स्टाइलमुळे तुम्हाला मिळेल कूल लुक)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *