Ankita Lokhande अंकिता लोखंडेचा सुंदर साडी लुक, हे ६ फोटो पाहिले का?

Spread the love

​महाराष्ट्रीयन लुक

खास प्रसंगी अंकिता लोखंडे महाराष्ट्रीयन पेहराव परिधान करतेच. विशेषतः एखादी पूजा असो किंवा सण-उत्सव असोत; अंकिता महाराष्ट्रीयन पद्धतीची वेशभूषा आणि दागिने परिधान करणं पसंत करते. महाराष्ट्रीयन लुकमधील काही फोटो तिनं नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोमध्ये तिनं हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसल्याचं तुम्ही पाहू शकता. या साडीवर गडद मरून- सोनेरी रंगाची बॉर्डर आहे. बॉर्डरशी मॅचिंग असलेले ब्लाउज तिनं घातले होते. या लुकसाठी अंकिताने सोनेरी रंगाचे दागिने घातले होते.

(VIDEO देसी गर्ल प्रियंकाने परदेशी महिलेला शिकवलं केवळ ३ पिनच्या मदतीनं साडी नेसणं)

​पांढऱ्या रंगाची साडी

अंकिताने ही पांढऱ्या रंगाची साडी अतिशय सहजतेने आणि आत्मविश्वासाने कॅरी केली आहे. तसं पाहायला गेलं तर ही बाब प्रत्येकासाठी सोपी नाही. कारण पांढऱ्या रंगाची साडी नेसून स्टाइल करणं थोडेसं कठीण असते. दरम्यान अंकितानं पार्टीपासून ते रेड कार्पेटपर्यंत पांढऱ्या रंगाची साडी आतापर्यंत अनेकदा नेसली आहे. पांढऱ्या साडीतील तिचा लुक शानदारच असतो.

(ऐश्वर्या रायची ७५ लाख रुपयांची लग्नातील साडी, मौल्यवान खडे व सोन्याच्या धाग्यांचा केला होता वापर)

​सोनेरी सिल्क साडी

टेलिव्हिजन इंडस्ट्रीनंतर अंकितानं ‘मणिकर्णिका’ सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमाच्या ट्रेलर लाँचदरम्यान तिनं सोनेरी रंगाची सिल्क साडी नेसली होती. या साडीमध्ये अंकिता अतिशय सुंदर दिसत होती. उपस्थितांची नजर तिच्यावरच खिळली होती. या सिल्क साडीवर अंकिताने हिरव्या रंगाचा ब्लाउज आणि कुंदन ज्वेलरी मॅच केली होती. तिचा हा लुक ग्लॅमरस आणि मोहक दिसत होता.

(Navratri 2020 फॅशनमध्ये काय आहेत नवीन ट्रेंड? ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनी जाणून घ्या गोष्टी)

​साडी ड्रेस

साडी व्यतिरिक्त अंकिताला गाउन परिधान करणंही पसंत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या स्टायलिश गाउनमधील तिचे कित्येक फोटो तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतीलच. एका अवॉर्ड शोसाठी तिनं लाल रंगाचा साडी पॅटर्नमधील गाउन घातला होता. या संपूर्ण साडीवर पांढऱ्या रंगाचे प्रिंट होते. यावर अंकितानं व्ही नेकलाइन डिझाइनचं, पांढऱ्या आणि सोनेरी धाग्यांची एम्ब्रॉयडरी असणारे हाफ स्लीव्ह्जचे ब्लाउज घातले होते. तसंच या लुकसाठी तिनं क्रिस्टल आणि हिरव्या रंगाच्या खड्यांचं नेकलेस मॅच केलं होतं.

(अंकिता लोखंडेने साडी लुकमधील सुंदर फोटो केले शेअर, लोकांना सुशांत सिंह राजपूतची आली आठवण)

​हिरव्या रंगाची डिझाइनर साडी

अंकिताला जेव्हा ग्लॅमरस दिसायचं असतं तेव्हा देखील ती एखाद्या साडीची निवड करते. तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गडद हिरव्या रंगाच्या फेदर डिझाइनमधील साडी लुक शेअर केला होता. यावर तिनं आकर्षक आणि स्टायलिश ब्लाउज घातले होते. या लुकसाठी तिनं वजनाने हलक्या असलेल्या ज्वेलरीची निवड केली होती. या साडीमध्ये अंकिता प्रचंड सुंदर दिसत होती.

(ऐश्वर्या रायपासून ते अनुष्का शर्मापर्यंत, ‘या’ दागिन्यांशिवाय राहू शकत नाहीत हे ५ स्टार्स)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *