Bacterial vaginosis in pregnancy : योनीतील ‘या’ इनफेक्शनमुळे प्रेग्नेंसीमध्ये उद्भवू शकतात अनेक समस्या!

Spread the love

बॅक्‍टीरियल वेजाइनोसिसची लक्षणे

सामान्यत: गरोदरपणाच्या काळात 10 ते 30 टक्के स्त्रिया या इन्फेक्शनने प्रभावित होतात. यात करडा किंवा पांढऱ्या रंगाचा दुर्गंधीयुक्त डिस्चार्ज योनीमधून स्त्रवत असतो. पण अनेकदा असे होते कि स्त्रियांना याची काही लक्षणे दिसत सुद्धा नाहीत आणि मग पेल्विक चाचणी केल्यावर त्यांचे निदान होते. यामुळे योनीमध्ये खाज येणे, दुर्गंधी येणे, लघुशंका करताना जळजळ निर्माण होणे व वेदना होणे यांसारखी लक्षणे दिसतात. अशी लक्षणे दिसत असतील तर ती बीवीचीच समजावीत आणि डॉक्टरांशी संपर्क साधून त्यावर त्वरित उपचार करावे.

(वाचा :- कोणत्याही वेदनेशिवाय डिलिव्हरी करण्याचे प्रकार आणि त्याचे दुष्परिणाम!)

बॅक्‍टीरियल वेजाइनोसिसची कारणे

बीवीची आपण लक्षणे पाहिली आता आपण त्याची कारणे सुद्धा पाहू, म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही समस्या नेमकी निर्माण का होते. तर मंडळी योनीमध्ये असणाऱ्या गुड आणि बॅड बॅक्टेरियामध्ये असंतुलन निर्माण झाल्याने आणि बॅड बॅक्टेरिया वाढल्याने बॅक्‍टीरियल वेजाइनोसिसची समस्या निर्माण होते. हे लैंगिक संक्रमण नाही पण याचा संबंध सेक्सशी आहे म्हणून ही समस्या सुद्धा लैंगिक संबंधातून होणाऱ्या आजारांमध्ये समाविष्ट केली जाते. यावर जेवढ्या लवकर स्त्री उपचार घेईल तेवढ्या लवकर ती बरी होईल आणि तिचा गरोदरपणाचा काळ सुरक्षित जाईल.

(वाचा :- प्रेग्नेंसीनंतर केसगळतीची समस्या वाढली आहे? मग ट्राय करा ‘हे’ घरगुती उपचार!)

बॅक्‍टीरियल वेजाइनोसिसचा गरोदरपणावर परिणाम

अनेक संशोधनांतून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की बॅक्‍टीरियल वेजाइनोसिसचा संबंध मुदतपूर्वी प्रसुतीशी आहे अर्थात 9 महिन्यांआधी होणाऱ्या बाळाच्या जन्माशी आहे. अनेक संशोधनात जाणकारांना असेही दिसून आले आहे की मिसकॅरेज, लो बर्थ वेटशी सुद्धा या समस्येचा थेट संबंध आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की ही समस्या झाल्यास या समस्यांना सुद्धा स्त्रीला तोंड यावे लागू शकते. म्हणूनच स्त्रीने योग्य खबरदारी घेऊन बीवीची लक्षणे दिसताच वैद्यकीय मदत घ्यावी.

(वाचा :- जाणून घ्या सिझेरियन डिलिव्हरीनंतर ‘या’ अभिनेत्रींनी वजन कसं कमी केलं याचं सिक्रेट!)

बॅक्‍टीरियल वेजाइनोसिसवर उपचार

गरोदर स्त्रीला बॅक्‍टीरियल वेजाइनोसिसची लक्षणे दिसल्यास डॉक्टर तिला काही औषधे देतात किंवा एक क्रीम देतात जी लावल्याने लवकर परिणाम दिसून येतात. एका संशोधनात असे दिसून आले आहे की बॅक्‍टीरियल वेजाइनोसिस आणि मुदतपूर्वी प्रसूती झालेल्या स्त्रियांवर अँटीबायोटीक ट्रीटमेंट केल्यावर कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याचा धोका कमी करता येऊ शकतो. मात्र याच ट्रीटमेंटने बॅक्‍टीरियल वेजाइनोसिसमुळे होणारा मुदतपूर्व प्रसुतीचा धोका कमी करता येऊ शकतो हे मात्र सिद्ध झाले नाही.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय!)

काय खबरदारी बाळगावी?

काही विशेष खबरदारी घेतल्यास स्त्रिया बॅक्‍टीरियल वेजाइनोसिस पासून स्वत:चा बचाव करू शकतात. सेक्स करताना नेहमी कंडोमचा वापर करावा. केमिकल युक्त साबणाचा वापर योनीच्या स्वच्छतेसाठी केल्यास त्यातील गुड बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात. यामुळे संक्रमणाचा धोका अजून बळावतो. म्हणून असे साबण सहसा वापरू नयेत. योनी साफ करण्यासाठी गरम करून कोमट केलेल्या पाण्याचाच वापर करावा. तर स्त्रियांनो ही समस्या सामान्य जरी असली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा गरोदरपणात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आजही अनेक स्त्रियांना या समस्येची जास्त माहित नाही. हा लेख जास्तीत जास्त शेअर करून तुमच्या ओळखीतल्या स्त्रियांना या समस्येबद्दल जागरूक करा जेणेकरून त्या सुद्धा सुरक्षित राहू शकतील.

(वाचा :- आई व बाळ दोघांसाठी धोकादायक असतात प्रेग्नेंसीमध्ये मिळणारे ‘हे’ संकेत!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *