Beauty Tips घरच्या घरी कसं तयार करायचं मेकअप फाउंडेशन, जाणून घ्या पद्धत

Spread the love

​होममेड फाउंडेशन तयार करण्यासाठी लागणारी सामग्री

  • मॉइश्चराइझर – तीन चमचे
  • मक्याचे पीठ – अर्धा चमचा
  • जायफळ पावडर – अर्धा चमचा
  • कोको पावडर – १/४ चमचा (आपल्या चेहऱ्याच्या टोननुसार तुम्ही याची मात्र वाढवू शकता आणि कमी देखील करू शकता.)
  • हळद – चिमूटभर
  • एसेंशिअल ऑइल – दोन थेंब (त्वचा कोरडी असणाऱ्यांसाठी)

Note : येथे फाउंडेशनची सामग्री लाइट स्‍किन टोननुसार घेण्यात आली आहे.

(घरच्या घरी या ६ सामग्रींपासून कसं तयार करावं बॉडी पॉलिशिंग स्क्रब, जाणून घ्या माहिती)

​फाउंडेशन तयार करण्याची पद्धत

सर्व प्रथम एका कंटेनरमध्ये तीन चमचे मॉइश्चराइझर घ्या. मॉइश्चराइझरमुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते. ज्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. आता यामध्ये अर्धा चमचा मक्याचे पीठ मिक्स करा. फाउंडेशनला शेड मिळावं यासाठी यामध्ये अर्धा चमचा जायफळ पावडर मिक्स करावी. मुरुमांपासून मुक्तता मिळवण्यासाठी तज्ज्ञमंडळींकडून जायफळचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. पुढील स्टेपमध्ये कंटेनरमध्ये अर्धा चमचा कोको पावडर घालावी. या पावडरचे प्रमाण आपण आपल्या स्किन टोननुसार ठरवावे.

(Natural Skin Care त्वचेची काळजी घेताय ना? या १० गोष्टी लक्षात ठेवणं आहे आवश्यक)

​हळद आणि एसेंशिअल ऑइल

आता यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करा. आता सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यावी. यानंतर एसेंशिअल ऑइलचे दोन थेंब त्यात मिक्स करावेत. जाडसर पेस्ट तयार होईपर्यंत सर्व सामग्री ढवळत राहा. आपले होममेड फाउंडेशन आहे तयार. आपण आपल्या त्वचेच्या टोननुसार जायफळ पावडर आणि कोको पावडरचे प्रमाण वाढवू किंवा कमी करून फाउंडेशनचा कलर टोन हलका किंवा गडद करू शकता.

(केसगळती रोखण्यासाठी करा हा रामबाण उपाय, महिन्याभरात केसांमध्ये दिसेल आश्चर्यकारक फरक)

​चेहऱ्यासाठी जायफळचे फायदे

त्वचा डागविरहित आणि सुंदर दिसण्यासाठी आपण आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये जायफळचा समावेश करू शकता. पण त्यापूर्वी तज्ज्ञमंडळींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जायफळमध्ये मॅग्‍नेशिअम, मॅगनिज आणि कॉपरव्यतिरिक्त व्हिटॅमिन बी-१ आणि व्हिटॅमिन बी-६ हे घटक असतात. या घटकांमुळे आपल्या त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत मिळते. सोबत चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होण्यास मदत मिळते.

(Natural Skin Care गुलाब पाण्याने घरच्या घरी फेशिअल कसे करावे, जाणून घ्या योग्य पद्धत)

NOTE : त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी किंवा ब्युटी प्रोडक्ट वापरण्यापूर्वी ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *