Bhaubeej 2020 भाऊबीजसाठी या खमंग नॉनव्हेज रेसिपींचा आखा बेत

Spread the love

सण-उत्सव म्हटलं की घराघरांमध्ये खमंग पदार्थांच्या मेजवानीचा खास बेत आखला जातोच. यातही दिवाळी सण म्हणजे दिव्यांचा उत्सव आणि स्वादिष्ट पक्वान्नांची मेजवानी. देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून दिवाळी जल्लोष साजरी केली जाते. भाऊबीजेच्या दिवशीही लज्जतदार व स्वादिष्ट पदार्थांचा बेत आखला जातो.

काही जणांच्या घरी नॉनव्हेज पदार्थ तयार केले जातात. पण त्याच- त्याच नॉनव्हेज डिशची चव चाखण्याऐवजी यंदा चिकनचा या तीन चटपटीत रेसिपींचा आस्वाद घेऊन पाहा. चला तर जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप रेसिपी…
(Diwali Special Recipe दिवाळीसाठी घरच्या घरी तयार करा ‘हे’ स्पेशल ५ गोड पदार्थ)

​चिकन कटलेटसाठी लागणारी सामग्री

 • ५०० ग्रॅम बॉइल्ड चिकन, उकडलेले बटाटे – तीन, दोन ते तीन मध्यम आकाराचे चिरलेले कांदे
 • बारीक चिरलेले लसूण, किसलेले आले, दोन ते तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्या, दोन चमचे मिरपूड, तीन चमचे धणे पूड
 • दोन चमचे लाल तिखट, दीड चमचा चिकन मसाला, एक चमचा गरम मसाला, चार ते पाच हिरव्या मिरच्या
 • थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग, तळण्यासाठी तेल, पाच ब्रेडचे स्लाइस, दोन अंडी

(मूग डाळीची कुरकुरीत भजी)

​पाककृती

 • चिमूटभर हळद, मिरपूड आणि व्हिनेगर घालून ३-४ शिट्ट्या येईपर्यंत चिकन शिजवून घ्या. शिजलेलं चिकन एका मोठ्या बाउलमध्ये काढा. चिकन मॅश करून घ्या. दुसऱ्या बाउलमध्ये उकडलेले बटाटे मॅश करा.
 • पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेलामध्ये मोहरी, बारीक चिरलेले लसूण, आले आणि कढीपत्ताही घालावा. यानंतर दोन ते तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्याही मिक्स करा. चवीनुसार मीठ घालून सर्व सामग्री नीट फ्राय करा.
 • यानंतर पॅनमध्ये चिरलेले कांदे घाला. नंतर चिकन मसाला, गरम मसाला, दोन चमचे लाल तिखट आणि तीन चमचे धणे पूड घालून सर्व सामग्री नीट ढवळून घ्या.
 • मसाल्यामध्ये मॅश केलेले चिकन मिक्स करा. थोडंसं चिकन स्टॉकही घाला.
 • यानंतर पॅनमध्ये मॅश केलेले बटाटे घालून सर्व सामग्री पाच मिनिटे शिजू द्यावी.
 • तयार झाला आहे चिकन कटलेटचा मसाला

​कटलेट कसे तयार करावेत?

 • दुसऱ्या एका बाउलमध्ये दोन अंडी फेटून ठेवा आणि ब्रेडचा चुरा देखील तयार करा.
 • आता मसाल्याचे लहान-लहान गोळे तयार करा. फेटलेल्या अंड्यामध्ये मसाल्याचा गोळा डिप करून ब्रेडच्या चुऱ्याने कोटिंग करा.
 • यानंतर मसाल्याच्या गोळ्यांचे कटलेट तयार करून घ्या.
 • तेलामध्ये कटलेट फ्राय करून घ्या.
 • गरमागरम कटलेट सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

(Bhindi Do Pyaza : चटपटीत कांदा भेंडी रेसिपी)

चिकन कटलेट रेसिपीचा व्हिडीओ

​चिकन रोस्ट

सामग्री: ७५० ग्रॅम चिकन, चार मध्यम आकाराचे चिरलेले कांदे, चार चमचे चिल्ली फ्लेक्स, एक चमचा व्हिनेगर, तीन चमचे किसलेले आले, तीन चमचे चिरलेले लसूण, पाच चमचे तेल, एक वाटी कढीपत्ता, तूप किंवा बटर, चवीनुसार मीठ

पाककृती

 • एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. यानंतर तेलात एका वाटी कढीपत्ता परतून घ्यावा. यानंतर चिरलेले कांदे, चवीनुसार मीठ, व्हिनेगर, बारीक चिरलेले लसूण आणि किसलेले आले टाकून २-३ मिनिटे सर्व सामग्री परतून घ्यावी.
 • आता मसाल्यामध्ये चिकन आणि चिली फ्लेक्स घाला. सर्व सामग्री नीट शिजू द्या. थोडे पाणी घालून सर्व मिश्रण ढवळा.
 • चिकनची चव वाढवण्यासाठी वरून थोडेसे बटर किंवा तूप घालू शकता.
 • तयार झालं आहे गरमागरम चिकन रोस्ट.

(बनारसी स्टाइल बटाटा चण्याची लज्जतदार भाजी)

चिकन रोस्टची स्टेप बाय स्टेप रेसिपी

​पेपर चिकन

सामग्री: अर्धा किलो चिकन, एक चमचा तेल, चिरलेले कांदे – दोन, चिरलेले टोमॅटो – दोन, हिरव्या मिरच्या – तीन, दीड चमचा आले- लसूण पेस्ट, दीड चमचा मिरपूड, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी

पाककृती

 • एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात दोन चिरलेले कांदे परतून घ्या. यानंतर चिरलेले टोमॅटो सुद्धा फ्राय करा.
 • कढईत मीठ टाकून सामग्री चार ते पाच मिनिटे शिजवावी.
 • यानंतर आले-लसूण पेस्ट, चिरलेली हिरवी मिरची, हळद आणि मिरपूड घाला. सर्व सामग्री शिजू द्यावी.

(लसूण व लाल मिरचीची चटणी, जाणून घ्या सोपी रेसिपी)

​मसाल्यामध्ये चिकन मिक्स करा

 • यानंतर कढईतल्या मसाल्यात चिकन मिक्स करा. सर्व सामग्री ढळवत राहा.
 • कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटे चिकन शिजू द्यावे. आवश्यकता वाटल्यास थोडेसे पाणी मिक्स करा.
 • रेसिपी तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. गरमागरम पेपर चिकनचा आस्वाद घ्या.

(वांग्याचे झणझणीत भरित)

पेपर चिकन पाककृती जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *