Bollywood Fashion अनुष्का शर्माच नव्हे तर या अभिनेत्रींनीही प्रेग्नेंसीमध्ये परिधान केले होते स्विमसूट

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) स्विमिंग पूलमधील स्वतःचा ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने स्टायलिश स्विमसूट घातल्याचे दिसत आहे. या लुकमध्ये अनुष्का अतिशय सुंदर दिसत आहे. दरम्यान, प्रेग्नेंसीमध्ये स्विमसूट किंवा बिकिनी परिधान करणारी अनुष्का शर्मा पहिली अभिनेत्री नव्हे. यापूर्वीही कित्येक बॉलिवूड अभिनेत्रींनी गर्भावस्थेत अशा प्रकारचे आउटफिट परिधान केले आहेत.

काही जणींनी तर बिकिनी लुकमध्ये फोटोशूट देखील केलं आहे. त्यांच्या फोटोंची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाली होती. आतापर्यंत कोणकोणत्या अभिनेत्रींनी गर्भावस्थेत असताना बिकिनी किंवा स्विमसूटमध्ये फोटो शेअर केले होते, जाणून घेऊया माहिती
(सर्व फोटोंचे क्रेडिट : इन्स्टाग्राम)
(Kareen Kapoor Birthday करीना कपूरने बर्थडे सेलिब्रेशनसाठी परिधान केला होता हा महागडा स्टायलिश ड्रेस)

​अनुष्का शर्माने शेअर केला पूल फोटो

अनुष्का शर्माने स्विमसूटमधील स्वतःचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नो मेकअप लुकमधील या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीमधील ग्लो स्पष्टपणे दिसत आहे. अनुष्काने Asos लेबलचे मॅटर्निटी स्विमसूट परिधान केलं होतं. या स्विमसूटमध्ये बँडो नेकलाइन तुम्ही पाहू शकता. नेकलाइनवर फ्रिल डिझाइन देण्यात आलं आहे. या स्विमसूटमध्ये अनुष्का शर्मा अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

(मलायका अरोरा ते करीना कपूर, प्रेग्नेंट असताना या अभिनेत्रींनी केलं शानदार रॅम्प वॉक)

​कल्की केक्ला

गर्भावस्थेदरम्यान आलेल्या छोट्या- मोठ्या गोष्टींचा अनुभव कल्की आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत होती. ती सतत आपल्या भावना सोशल मीडियावर शेअर करताना दिसायची. कल्कीची पहिली प्रेग्नेंसी तिने केलेल्या फोटोशूटने अधिक संस्मरणीय ठरली आहे. या फोटोशूटमध्ये तिनं फॉरेस्ट प्रिंटची बिकिनी आणि ग्लॅमरस ड्रेस परिधान केले होते. याव्यतिरिक्त तिनं गडद रंगाची बिकिनी आणि स्विमसूटचीही निवड केली होती.

(ड्रेस पाहिल्यानंतर लोक म्हणाले, अनुष्का शर्मानंतर आता पक्का प्रियंका चोप्राचा नंबर)

​लिसा हेडन

लिसा हेडनला ‘सुपर कुल मॉम’ असंही म्हटलं जातं. या अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमध्ये बिकिनी परिधान केली होतीच. शिवाय तिनं स्विमसूट घालून बिनधास्तपणे सर्फिंगचा आनंदही लुटला होता. सर्फिंग करतानाचे व्हिडीओ आणि फोटो तिनं आपल्या चाहत्यांसोबत शेअर देखील केले होते. तिचे हे व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

(करीनापासून ते रायमापर्यंत, या अभिनेत्रींनी फोटोशूटसाठी घेतला असा बोल्ड निर्णय)

​श्वेता साळवे

श्वेता साळवे बहुतांश वेळ स्वतःचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते. तर मग प्रेग्नेंसीमधील फोटो पोस्ट करायला श्वेता कसं काय विसरू शकते. गर्भावस्थेच्या काळातही श्वेताने स्वतःचे स्टायलिश फोटो शेअर केले होते. कित्येकदा तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर बिकिनी अवतारातील फोटो देखील पाहायला मिळाले आहेत. यासह तिनं एक सुंदर फोटोशूट देखील होते. हे हटके आणि ग्लॅमरस फोटोशूट होते.

(सारा अली खान ही गोष्ट करतेय मिस, म्हणून स्वतःचे स्टायलिश थ्रोबॅक फोटो केले शेअर)

अ‍ॅमी जॅक्सन

अ‍ॅमी जेक्सननंही पहिल्या प्रेग्नेंसीच्या काळामध्ये आपले शूटिंग सुरू ठेवले होते. तसंच कित्येक इव्हेंट्समध्येही ती सहभागी झाली होती. अ‍ॅमीनं सुद्धा एक खास फोटोशूट केले होते. समुद्रकिनाऱ्यावरील तिचा स्टायलिश बिकिनी लुक चाहत्यांना पाहायला मिळाला होता. या फोटोशूटमध्येही अ‍ॅमी नेहमी प्रमाणे सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोशूटचे चाहत्यांनी कौतुक केले होतं.

(बॉयफ्रेंडसोबत दिसली सुष्मिता सेन, प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलचा स्टायलिश लुक लई भारी)

​समीरा रेड्डी

समीरा रेड्डीने प्रेग्नेंसीदरम्यान अतिशय खास आणि हटके फोटोशूट केले होतं. या फोटोशूटमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला होता. एका फोटोमध्ये समीरा जलपरी प्रमाणे पोझ देताना दिसत आहे. या फोटोशूटसाठी तिनं हिरव्या रंगाची टू-पीस बिकिनी परिधान केली होती. ज्यावर शीअर मटेरिअलही तुम्ही पाहू शकता. या मटेरिअलमुळे फोटोमध्ये समीराचा शानदार लुक कैद झाला आहे.

(सिनेमातील त्या सीनसाठी जेव्हा मनीष मल्होत्राने वापरलं चक्क राणी मुखर्जीच्या आईचे मंगळसूत्र)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *