Bridal Look ‘या’ नववधूने संगीत सोहळ्यासाठी फॉलो केली अनुष्का शर्माची स्टाइल, पाहा फोटो

Spread the love

रेड कार्पेट इव्हेंट असो किंवा एखाद्या सेलिब्रिटीचा लग्नसोहळा; बॉलिवूडमधील कलाकारमंडळींचे आउटफिट पाहण्यासारखे असतात. बॉलिवूड स्टार्स स्वतःचे स्टायलिश लुकमधील कित्येक फोटो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतात. दरम्यान बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींची स्टाइल फॉलो करण्याची संख्या देखील मोठी आहे. याबाबत सांगायचं झालं तर चाहते आपल्या आवडत्या कलाकाराने घातलेल्या आउटफिट्सची सेम-टु-सेम कॉपी करताना अनेकदा दिसतात.

सब्यसाची मुखर्जी यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे याचे उदाहरण देखील पुन्हा पाहायला मिळाले. डिजाइनर सब्यसाची मुखर्जी यांनी ‘ब्राइड्स ऑफ सब्यसाची पेज’वर नववधूंचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोतील नववधूनं अभिनेत्री अनुष्का शर्माची (Anushka Sharma) स्टाइल फॉलो केल्याचे पाहायला मिळालं.
(रब ने बना दी जोडी! विराटच्या वाढदिवशी अनुष्काने परिधान केला होता ‘हा’ सर्वात सुंदर ड्रेस)

​या लुकमध्ये नववधू दिसत होती सुंदर

संगीत सोहळ्यासाठी नववधूने या बोहो स्टाइल लेहंग्याची निवड केली होती. या पारंपरिक पोषाखाच्या स्कर्टवर तुम्ही केशरी, हलका निळा रंग याप्रमाणे अन्य रंग देखील पाहू शकता. प्रत्येक रंगावर असलेल्या डोम स्ट्रक्चरवर कॉन्ट्रास्ट शेड देण्यात आली आहे. तर काळ्या रंगाच्या हाफ स्लीव्ह्ज ब्लाउजवर लेहंग्याशी मॅचिंग असलेल्या रंगीबेरंगी धाग्यांनी फ्लोरल एम्ब्रॉयडरी करण्यात आलीय. या नववधूने चोकर नेकलेस, मॅचिंग ईअररिंग्स, बांगड्या, मांगटिका आणि रिंग असे दागिने परिधान केले होते.

(Shilpa Shetty शिल्पा शेट्टीची बुट आणि जीन्सची अनोखी स्टाइल, पाहा फोटो)

अनुष्का शर्माचा वेडिंग लेहंगा

कित्येक तरुणींनी आपल्या लग्नसोहळ्यासाठी अनुष्का शर्माचा ब्राइडल लेहंग्याचे डिझाइन देखील कॉपी केल्याचे पाहायला मिळाले आहे. या फोटोमध्ये नववधूने जो हलक्या गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे, त्यावर हाताने एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. रंगीबेरंगी धाग्यांच्या मदतीने लेहंग्यावर फुले, पक्ष्यांची डिझाइन करण्यात आलीय. सोबत या आउटफिटवर चंदेरी धागे आणि ब्ल्यु स्टोन वर्क देखील करण्यात आलं होतं. या नववधूने माथापट्टी, चोकर नेकलेस, राणीहार, झुमके आणि मॅचिंग बांगड्या असे दागिने घातले होते.

(Stylish Bag वेस्ट बॅग्सचा ट्रेंड भन्नाट)

​दीपिकाचा दुपट्टा होता खास

दीपिका पादुकोणनं परिधान केलेल्या ब्राइडल लेहंग्याच्या डिझाइनचीही भरपूर चर्चा झाली होती. तरुणींमध्ये लेहंग्याच्या या डिझाइनचीही भरपूर क्रेझ पाहायला मिळते. दीपिकाने लेहंग्यासह दुपट्टा देखील मॅच केला होता. अशा पद्धतीचा दुपट्टा देखील नववधू साडीपासून ते लेहंग्यावर मॅच करताना दिसताहेत. दीपिकाच्या या दुपट्ट्यावर ‘सदा सौभाग्यवती भव:’ असे लिहिण्यात आलं होतं. याच कारणामुळे दीपिकाच्या डिझाइनर दुपट्ट्याची भरपूर चर्चा झाली होती.

(ऐश्वर्या राय-बच्चन आणि करीना कपूरने नेसली एकसारखीच साडी? स्टाइलमध्ये कोणी मारली बाजी)

​दीपिकाचा फ्लोरल लेहंगा

दीपिका पादुकोणचा पोस्ट वेडिंग लुक देखील अतिशय सुंदर होता. तरुणींना तिचा हा डिझाइनर लेहंगा देखील प्रचंड आवडला. दीपिकाचा हा लेहंगा सब्यसाची यांनीच डिझाइन केलेला आहे. कित्येक नववधूंनी आपल्या लग्नसोहळ्यासाठी दीपिकाच्या या लुकची निवड केल्याचंही पाहायला मिळालं. लाल, गुलाबी, हिरव्या रंगाच्या फ्लोरल पॅटर्नसह सोनेरी रंगाच्या धाग्यांचा आणि आकर्षक खड्यांचा लेहंग्यासाठी वापर करण्यात आला होता.

(सारा अली खान व पूजा हेगडेच्या ड्रेसची एकसारखीच स्टाइल, नेमकं कोणी केलंय कोणाला कॉपी?)

​आलियाचा लाइम ग्रीन लहंगा

अभिनेत्री सोनम कपूरच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये आलिया भटच्या या लाइम ग्रीन लेहंग्याची सर्वाधिक चर्चा झाली होती. सब्यसाची मुखर्जींनी डिझाइन केलेला हा लेहंगा देखील बहुतांश तरुणींना आवडला. कित्येक जणींना आपल्या लग्नसोहळ्यासाठी आलिया भटचा हा लुक कॉपी केल्याचंही दिसलं. ऑर्गैंझा आणि सिल्कपासून तयार करण्यात आलेल्या लेहंग्यावर चंदेरी रंगाच्या धाग्यांनी अतिशय बारीक स्वरुपात फ्लोरल एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. या लेहंग्याची ओढणी वजनाने हलकी होती.

(आलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव)

तुम्हाला यापैकी कोणत्याही लेहंग्याचे डिझाइन सर्वाधिक आवडलं?


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *