Cucumber For Skin: नितळ त्वचा हवीय? मग असे तयार काकडीच्या सालीपासून फेस पॅक

Spread the love

​सुरकुत्या कमी होतात

२०११ मधील एका संशोधनातील अभ्यासानुसार, काकडीमध्ये अँटी ऑक्सिडेंटचे गुणधर्म आहेत. यामुळे अँटी रिंकल इंग्रीडिएंट स्वरुपात याचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अ‍ॅसिड देखील असते. व्हिटॅमिन सीमुळे नवीन पेशी तयार होण्यास मदत मिळते. फॉलिक अ‍ॅसिड आपल्या त्वचेचं प्रदूषणापासून संरक्षण करते. काकडीतील पोषण तत्त्वांमुळे आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

(कोरफड आणि हळदीचे मास्क चेहऱ्यासाठी आहे बेस्ट, त्वचेला मिळतील मोठे फायदे)

​मुरुम

हल्ली बरेच जण मुरुमांच्या समस्येमुळे त्रस्त असतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कित्येक प्रकारच्या महागड्या ट्रीटमेंट केल्या जातात. पण या केमिकलयुक्त उपचारांमुळे त्वचेचं अधिक नुकसान होते. याऐवजी तुम्ही आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये काकडीच्या सालीच्या रसाचा समावेश करा. यामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होण्यास मदत मिळेल. त्वचेचा रंग उजळेल आणि ओपन पोअर्स देखील स्वच्छ होतील. यासाठी काकडीची साल मिक्सरमध्ये वाटून त्यामध्ये लिंबू रस मिक्स करावा. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावा. पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.

(Skin Care Tips कडुलिंबाच्या पानांपासून घरामध्ये तयार करा सौंदर्यवर्धक साबण)

​डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी

काकडीची साल थंड करून वापरल्यास डोळ्यांना आलेली सूज कमी होऊ शकते. यातील पोषक घटक डोळ्यांच्या आसपासची त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. जवळपास १० ते १५ मिनिटांसाठी काकडीची साल आपल्या डोळ्यांवर ठेवा आणि आराम करा. याव्यतिरिक्त तुम्ही काकडीच्या सालीची पेस्ट देखील करू शकता. काकडीच्या सालीची पेस्ट करून आपल्या डोळ्यांना लावा आणि १० मिनिटांनी आपला चेहरा स्वच्छ धुऊन ठेवा. डोळ्यांना आलेली सूज कमी होईल.

(Skin Care चमकदार त्वचेसाठी आंघोळ करण्यापूर्वी ५ मिनिटे लावा बेसन फेस स्क्रब)

​काळवंडलेली त्वचा

काकडीमध्ये हलक्या स्वरुपात ब्लीचिंगचे गुणधर्म असतात. यामुळे सन टॅन, काळवंडलेल्या त्वचेची समस्या कमी होण्यास मदत मिळते. यासाठी केवळ काकडीची साल मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि रस चेहरा तसंच मानेवर लावा. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या नाजूक त्वचेचं संरक्षण होण्यास मदत मिळते.

(Skin Care Tips निरोगी त्वचेसाठी लिंबूपासून घरामध्येच तयार करा टोनर)

​कसा तयार करावा फेस पॅक

सामग्री – अर्ध्या काकडीची साल, दोन मोठे चमचे मध किंवा कोरफड

फेस पॅक तयार करण्याची पद्धत –

काकडीची साल आणि मध वाटीमध्ये एकत्र घ्या. त्याची जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांसाठी लेप चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.

(Skin Care दह्याच्या फेशिअलचे आश्चर्यकारक फायदे, त्वचा होईल चमकदार)

​काकडी आणि दूध फेस पॅक

सामग्री – अर्ध्या काकडीची साल, १/४ कप दूध, एक मोठा चमचा मध, एक मोठा चमचा ब्राउन शुगर

फेस पॅक तयार करण्याची पद्धत –

काकडीची साल स्वच्छ धुऊन घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटा. आता एका वेगळ्या वाटीमध्ये दूध, मध आणि ब्राउन शुगर मिक्स करा. या मिश्रणात काकडीच्या सालीची पेस्ट मिक्स करा. १५ मिनिटांसाठी हे पॅक आपल्या चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यानंतर आपला चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

(साबणाऐवजी वापरा हे घरगुती उटणे, चेहऱ्याच्या समस्या दूर होण्यास मिळेल मदत)

Note : चेहऱ्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आठवणीने घ्यावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *