Diet In Arthritis : संधिवाताच्या रुग्णांनी कोणता आहार घ्यावा व कोणता टाळावा?

Spread the love

संधिवात (Arthritis) एक असा आजार आहे ज्यामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. हा त्या गंभीर आजारांपैकी एक आहे ज्याने एकदा का आपले शरीर धरले जी त्याला सोडायलच बघत नाही. संधिवाताचा त्रास काय असतो ते एक संधिवाताचा रुग्णच जाणू शकतो. सहसा हा त्रास जेष्ठ लोकांना होतो. तरुणांमध्ये याचे प्रमाण फार कमी आढळून येते. संधिवात म्हणजे एक प्रकारची सूज आहे. ही सूज हाडांच्या सांध्यांमध्ये निर्माण होते. काही लोकांना केवळ एकाच सांध्यात हा त्रास जाणवतो तर काही जणांना विविध ठिकाणी हा त्रास जाणवतो.

मात्र प्रकार कोणताही असला तरी त्रास हा असह्य असतो. बसताना वा उठताना भयंकर त्रास होतो. एक गोष्ट चांगली की आता या आजारावर संशोधन होऊन बऱ्यापैकी चांगली आणि रामबाण औषधे व उपचार निर्माण झाले आहेत. तरी या आजरामध्ये आहाराचा घटक सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. अन्य आजारांपैकी या आजारात चुकीच्या आहारशैली मुळे आजार वाढण्याचा धोका असतो. चला तर या लेखातुन जाणून घेऊया की संधिवाताच्या रुग्णाने काय खावे आणि काय नाही.

चाकवत

ज्या लोकांना संधिवाताची समस्या आहे त्यांनी नियमितपणे अवश्य चाकवतच्या भाजीचे सेवन करावे. चाकवतची भाजी फक्त हिवाळ्यात उपलब्ध होते इतर ऋतूमध्ये नाही. त्यामुळे जेव्हा ती उपलब्ध असेल तेव्हा आवर्जून चाकवतीचे सेवन करावे. जाणकारांनी सुद्धा चाकवत ही संधीवताच्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या भाजीच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे आणि त्याचा फायदा सुद्धा लोकांना दिसून येत आहे. तुम्ही ज्यूसच्या रुपात चाकवतीचे सेवन करू शकता. रोज सकाळी उपाशी पोटी चाकवतचा ज्यूस करून प्यावा.

(वाचा :- करायची आहे पोट, मांड्या व कंबरेवरील चरबी कमी? मग प्या ‘या’ भाजीचं सूप!)

सफरचंद

हो मंडळी, संधिवाताच्या रुग्णांवर सफरचंद खूप उपयोगी ठरते आणि ते म्हणतात ना रोज एक खाल्लेलं सफरचंद तुम्हाला डॉक्टरपासून दूर ठेवते तसेच इथे रोज खाल्लेलं सफरचंद तुम्हाला संधिवाताच्या वेदनेपासून दूर ठेवतं. पण संधिवातावर सफरचंद खाताना ते सोलून खावे. त्याची साल खाऊ नये. कारण अनेकदा सफरचंदावर केमिकलचा वापर केलेला असतो आणि सालीवर असणारी ही केमिकल्स संधीवताच्या रुग्णासाठी योग्य नाहीत. शक्य असल्यास सेंद्रिय सफरचंद खावीत. जेणेकरून त्याचा अधिक फायदा दिसून येईल.

(वाचा :- पाणी पिण्याचा व झोपण्याचा हा साधासोपा मुलमंत्र आचरणात आणल्यास लठ्ठपणा होईल झटपट कमी!

पाणी

संधिवाताच्या रुग्णाने रोज किमान 3 लिटर पाणी प्यायलाच हवे. इतर पदार्थ तुम्ही उपलब्धतेनुसार खाऊ शकता पण पाणी तर सदैवच आपल्या घरात उपलब्ध असते. त्यामुळे संधिवाताचा त्रास असलेल्यांनी न चुकता 3 लिटर पाणी प्यावे. पाण्याशिवाय लिंबू सरबत, नारळ पाणी, फळांचे ज्यूस सुद्धा तुम्ही पिऊ शकता. जितके जास्त तरल पदार्थ तुमच्या शरीरात असतील तेवढा तुम्हाला संधिवातापासून आराम मिळेल. जे लोक संधिवात असून सुद्धा कमी पाणी पितात त्यांना संधिवाताचा अधिक त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही गोष्ट करत असाल तर आताच थांबवा आणि शक्य तितके पाणी प्या.

(वाचा :- पावसाळ्यात जिभेचे चोचलेही पुरवा आणि फिट सुद्धा राहा ‘या’ खास पदार्थांसह!)

जास्त थंड खाऊ नये

आता आपण पाहूया की संधिवाताच्या रुग्णाने काय खाणे टाळले पाहिजे. तर त्याचे उत्तर आहे संधीवाताच्या रुग्णाने जास्तीत जास्त थंड खाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. संधिवाताचे डॉक्टर सुद्धा आपल्या पेशंटना आवर्जून हा सल्ला देतात.आईस्क्रीमसारखे अति थंड पदार्थ सुद्धा खाऊ नयेत. यामुळे संधिवात वाढण्याचा धोका असतो. याशिवाय जास्त प्रोटीन असणारे पदार्थ जसे की छोले, चणे, राजमा यांसारखी कडधान्ये खाणे बंद करावीत. य गोष्टी जेवढ्या कमी कराल तेवढा तुम्हाला संधिवाताच्या वेदनेमध्ये फरक दिसून येईल. पण जर तुम्ही या बाबत निष्काळजीपणा दाखवला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.

(वाचा :- केसगळती, दातदुखी व हाडांच्या दुखण्याने त्रस्त आहात? मग ‘हे’ पदार्थ करतील वेदनेतून सुटका!)

मासे खाऊ नयेत

जर तुम्ही अट्टल मांसाहारी असाल आणि तुम्हाला संधिवात असेल तर तुम्ही मासे खाणे ताबडतोब बंद करायला हवे. संधिवाताच्या रुग्णाने मासे अजिबात खाऊ नयेत असं तज्ञ सुद्धा सांगतात. यातील ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे संधिवाताशी लढणाऱ्या शरीरासाठी अजिबात योग्य नसते. तर आहाराबाबत या काही गोष्टी आहेत ज्यांची काळजी प्रत्येक संधिवात असणाऱ्या व्यक्तीने घ्यावी आणि शक्य तितके सुदृढ राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने अन्य उपचार घेत राहावेत.

(वाचा :- दुधाचे आठवडाभर वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये करा सेवन, दिसतील आश्चर्यकारक फायदे!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *