Diwali 2020 जुन्या कपड्यांना कसा द्यावा स्टायलिश टच, जाणून घ्या सेलिब्रिटी फॅशन डिझाइनरने दिलेल्या टिप्स

Spread the love

दिवाळी म्हणजे महत्त्वाच्या सणांपैकी एक. प्रत्येकाला दिवाळीत काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. या दिवाळीत खरेदीचा आनंद लुटता येणार नसला तरीही हट के दिसण्याची इच्छा मात्र नक्कीच पूर्ण करता येईल. हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्या कपाटात अनेक तऱ्हेचे कपडे असतात. ज्यांना फेस्टिव्ह टच देऊन तुम्ही फ्युजन करू शकता. मिक्स अँड मॅच करायला जमलं तर ही दिवाळी नक्कीच हटके ठरेल.

जुन्या शर्टला नवा लुक
यंदा दिवाळीत उठावदार लुक करायचा असेल तर नवनवीन शक्कल लढवा. दिवाळीत चमकीच्या कपड्यांना विशेष महत्त्व असतं. जुना किंवा ठेवणीतला शिमर फॅब्रिकचा शर्ट या दिवाळीत तुमचा लुक खुलवण्यास मदत करेल. लाइट शेडचे शिमर टॉप किंवा शर्टस गडद गुलाबी, सोनेरी रंगाच्या स्कर्ट किंवा लेहंग्यांसोबत घालून अगदी नवीन कपड्यांचा लुक येईल. शर्ट इन न करता त्याची फ्रंट नॉट बांधा. यावर छानसा नेकपिस, कुंदन किंवा मोत्यांचा चोकर शोभून दिसेल. जुन्या सिल्क साडीचा लेहंगासुद्धा शिवून घेऊ शकता.


शॉर्ट कुर्त्यांचा पर्याय

शॉर्ट कुर्त्यांची सिगरेट पँट किंवा स्कर्ट यासोबत नक्कीच स्टायलिंग होऊ शकते. इंडो-वेस्टर्न ट्राय करायचं असेल तर खणाचे कुर्तेसुद्धा उपयोगी पडतील. सध्या कुर्ते आणि स्कर्टचं गणित उत्तम जुळतंय. एखाद दुसरा कुर्ता किंवा पँटची ऑनलाइन खरेदीही करू शकता.
(खण इन ‘फॅशन’! यंदाच्या दिवाळीला ट्राय करा खणाच्या साडीची हटके स्टाइल)
लाँग कुर्त्यांची फॅशन जोमात
अनारकली, चिकनकारी आणि लखनवी कुर्ते हा उत्तम पर्याय आहे. सध्या कुर्त्यांना स्कर्टसोबत मॅच केलं जातंय. तुमच्याकडे शरारा, घेरदार घागरा किंवा पलाझो स्कर्ट असेल तर त्यालाही कुर्त्यासोबत परिधान करून हट के लुक आजमावून बघू शकता. कुर्त्यांची धोती पँट सोबत देखील स्टायलिंग केली जातेय. शॉर्ट अनारकली कुर्ते आणि धोती पँट यांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. प्लेन अनारकली कुर्ता आणि ऑक्सिडाइज्ड दागिन्यांना एकत्र करून भन्नाट लुक येतो.
(Diwali 2020 यंदा इंडोवेस्टर्न हिट! जाणून घ्या फॅशनमधील नवीन ट्रेंड)
जॅकेटची मजा न्यारी

परफेक्ट फेस्टिव्ह आऊटफिट्सचा विचार करताना जॅकेटला विसरून कसं चालेल. विशेषतः दिवाळी सणाला जॅकेटला भरपूर मागणी असते. जॅकेट्स कोणत्याही पेहरावाचं सौंदर्य खुलवतात. प्लेन कुर्त्यांवर एम्ब्रॉयडरी, गोटा पट्टी किंवा इतर नक्षीकाम असणारं जॅकेट घातल्यानं तुमच्या लुकला चार चांद लागतील. शिवाय, तुमचा खर्चही वाचेल. जॅकेट परिधान केल्यानं ओढणी घेण्याची आवश्यकता नसते. पेस्टल रंगांच्या कुर्त्यावर गडद रंगाचे जॅकेट्स शोभून दिसतात.
(Diwali 2020 आपल्या लहान मुलांसाठी असे घ्या स्टायलिश पारंपरिक आउटफिट, पाहा फोटो)
को-ऑर्ड ड्रेस वाढवेल सौंदर्य

पारंपरिक पद्धतीच्या को-ऑर्ड ड्रेससोबत लाँग जॅकेटही मिळतं. को-ऑर्ड ड्रेसचं जॅकेट काढून त्याला साडी अथवा दुपट्टा ड्रेप करून नवा लुक करू शकता. पिप्लम टॉप्सचा पर्याय आहे. आजीच्या जुन्या साड्यांनासुद्धा पलाझो पँट आणि जीन्सवर गुंडाळून फ्युजन करू शकता. साडी अथवा ओढणी अंगाला चिकटून बसावी याकरिता मेटॅलिक बेल्ट किंवा कंबरपट्ट्याची मदत घेऊ शकता. दागदागिन्यांची स्वतंत्र खरेदी न करता घरात उपलब्ध असणाऱ्या दागिन्यांचा जास्तीतजास्त वापर करा. स्टायलिंग करताना तुमची शरीरयष्टी, वावरण्याची पद्धत यांना खूप महत्त्व असतं, त्यानुसार आऊटफिट्स निवडावेत.

साड्या नेसताय?
दिवाळीत पारंपरिक साड्या नेसण्याकडे कल जास्त असतो. यंदा नव्या साड्यांची खरेदी करायला जमलं नसलं तरी जुन्या साडीला नवा टच नक्कीच देऊ शकता. आजकाल साड्यांवर पॅचवर्क करण्याचा ट्रेंड भरपूर जोमात आहे. फिरता रंग आणि प्लेन पदराच्या साडीवर मोर, पोपट, सरस्वती, नथ यांची डिझाइन अतिशय सुंदर दिसते. अशा प्रकारचे रेडिमेड पॅच विकतही घेऊ शकता. साड्यांचा पदर भरजरी असेल तर वेगळा ब्लाऊज शिवून त्यावर एम्ब्रॉयडरी करण्याचा पर्याय आहे. वेळ आणि खर्च दोन्हीची बचत करण्यासाठी जुन्या साड्यांना नव्या पद्धतीनं नेसून बघा.

संकलन- तेजल निकाळजे, साठये कॉलेज
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *