Diwali 2020 दिवाळीनिमित्त घरच्या घरी कसे करावे नेलआर्ट? जाणून घ्या ट्रेंड

Spread the love

सणासुदीच्या (Diwali 2020) काळात पेहराव, दागिन्यांपासून ते अगदी नेलआर्टपर्यंत विविध ट्रेंड बघायला मिळतात. गेल्या काही वर्षांपासून नेलआर्टमध्ये विविध प्रकार पाहायला मिळत आहेत. दिवाळी आठवड्यावर येऊन ठेपली असताना यंदा दिवाळीला साजेसे आणि ट्रेंडी नेलआर्ट कोणते करता येतील? याविषयी जाणून घेऊया…
(आलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव)

साकार पणती-फटाके
दिवाळी हा दिव्यांचा सण. दिवाळी आणि पणतीचं नातं तर सर्वांना ठाऊकच आहे. सध्या सगळीकडेच पणत्या रंगवणं, त्याची सजावट करणं याची लगबग सुरू आहे. त्यामुळे यंदा नेलआर्टवरदेखील पणतीच्या डिझाइन्स बघायला मिळणार आहे. या प्रकाराचं नेलआर्ट करताना तुम्ही गडद रंगाचं नेलपॉलिश लावून त्यावर हलक्या रंगाचा वापर करून पणती साकारू शकता. पणतीसोबत नखांवर फटाक्यांची चित्र काढण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे.
(Diwali 2020 टिशू साडीमुळे खुलेल सौंदर्य, जाणून घ्या फॅशन ट्रेंड)

​चमचमती स्टाइल

दिवाळी म्हंटलं की अनेक मुली पेहरावाला साजेसं असं नेलआर्ट करू पाहतात. पण ग्लिटरी नेल आर्टविषयी सांगायचं झालं तर ते अगदी सर्व लुक्ससाठी उत्तम पर्याय आहे. मुख्य म्हणजे हे नेलआर्ट केल्यावर तुमच्या नखांना बोल्ड लुकही मिळतो. तुमची आवडती न्यूड शेड नखांवर लावा आणि स्पंज ग्लिटरमध्ये बुडवून नखांना लावा. हे नीट सुकू द्या आणि त्यावर अजून एक न्यूड कोट लावा.

(Diwali 2020 खणाला मान, नथीची शान! महिलांना आकर्षित करतोय ‘हा’ लुक)

​मण्यांमुळे हटके लुक

सध्या बाजारात नेलआर्टसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अगदी लग्नापासून ते सणासुदीपर्यंत मोती, मणी ट्रेंडिंग पाहायला मिळत आहेत. मुख्य म्हणजे तुम्ही मोती किंवा मणीसाठी गडद रंगाच्या नेलंपॉलिशचा वापर करू शकता. जेणेकरून त्यावर पांढऱ्या रंगाचे मणी उठून दिसतील आणि नखांना छान लुक येईल.

(रब ने बना दी जोडी! विराटच्या वाढदिवशी अनुष्काने परिधान केला होता ‘हा’ सर्वात सुंदर ड्रेस)

​लक्षात ठेवा या टिप्स

  • नेलआर्ट करताना नखांवर नेलपॉलिश जरी नसलं तरी नखं नेल रिमूव्हरने स्वच्छ करून घ्या.
  • क्युटीकल्स काढण्यासाठी किंवा नखांवरील नेलपेंट काढताना धातूचं साहित्य वापरणं टाळा.
  • तुमची नखं लहान असल्यास नेलआर्ट करणं थोडं किचकट होऊ शकतं.

(ऐश्वर्या राय-बच्चन आणि करीना कपूरने नेसली एकसारखीच साडी? स्टाइलमध्ये कोणी मारली बाजी)

​त्वचेची काळजी घ्या

मण्याचं नेलआर्ट केलं असल्यास काम करताना निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Malaika Arora Style मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते झाले फिदा)

नखांना नेलपॉलिश लावताना विविध रंगांचा वापर केला पाहिजे. पण, त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या.

(करीना कपूरने पुन्हा सर्वांचं लक्ष घेतलं वेधून, ‘या’ आकर्षक ड्रेसमध्ये दिसतेय सुपर स्टायलिश)

​हे देखील ठेवा लक्षात

  • नेलपेंट लावताना नेहमी दोन कोट लावा. दोनपेक्षा अधिक कोट लावल्यास नखांच्या वाढीचा वेग कमी होतो.
  • मुख्य म्हणजे नखं खाऊ नका. त्यामुळे क्युटिकल्स तुटून नखांचा आकार बिघडतोच शिवाय नखांच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता देखील आहे.

(सारा अली खान व कृति सेनॉनने परिधान केलं एकसारखं आउटफिट? कोणाचा लुक आहे सुपर स्टायलिश)

वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ

घरच्या घरी कसे करायचे मॅनिक्युअर? जाणून घ्या पद्धत


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *