Diwali Special Recipe दिवाळीसाठी घरच्या घरी तयार करा ‘हे’ स्पेशल ५ गोड पदार्थ

Spread the love

सण- उत्सव कोणतेही असोत, प्रत्येकाच्या घरात गोड पदार्थांच्या मेजवानीचा खास बेत आखला जातोच. पुढील आठवड्यात दीपोत्सवास प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने सध्या प्रत्येकाकडे घराची साफसफाई, घराची सजावट, नवीन कपड्यांची खरेदी, फराळ इत्यादी गोष्टींची जय्यत तयारी सुरू आहे. तुम्ही यंदा दिवाळीसाठी कोणकोणत्या फराळाचा खास बेत आखणार आहात. फराळाच्या यादीमध्ये नवीन पदार्थांचाही समावेश तुम्ही करू शकता.

आम्ही तुमच्यासोबत गोड पदार्थांच्या सोप्या रेसिपी शेअर करणार आहोत. पारंपरिक मिष्ठान्नांसह या पदार्थांचाही तुम्ही आपल्या कुटुंबीयांसोबत आस्वाद घेऊ शकता. बाहेरून मिठाई विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच खमंग गोड पदार्थ तयार करा. भेसळयुक्त मिठाई खाण्याऐवजी घरातील पौष्टिक फराळाचा आस्वाद घ्या.
(खारी शंकरपाळी, जाणून घ्या सोपी रेसिपी)

​साखर- खोबऱ्याची पोळी

सामग्री : मैदा – अर्धा कप, चिरोट्याचा रवा – दोन चमचा, तेल – अर्धा कप, तूप – अर्धा कप, पाणी – एक कप, चिमूटभर वेलची पूड, पिठी साखर – एक कप, किसलेले सुके खोबरे – एक कप

पाककृती :

 • बाउलमध्ये मैदा, चिरोट्याचा रवा, थोडेसं मीठ एकत्र घ्या. सर्व सामग्री नीट मिक्स करा. यामध्ये थोडंसं तेल घालून मिश्रण चांगल्या पद्धतीने एकजीव करावं. आता बाउलमध्ये थोडे-थोडे पाणी ओता आणि पीठ मळा. पीठ सेट होण्यास दोन ते तीन तास एका बाजूला ठेवावे.
 • दुसऱ्या बाउलमध्ये सारण तयार करून घ्या. यासाठी बारीक किसलेले सुके खोबरे, पिठी साखर, चिमूटभर वेलची पूड एकत्र मिक्स करा. मिश्रणात आवश्यकतेनुसार तूप घाला. सारणाचे लहान लाडू वळून ठेवा.
 • पीठ पुन्हा मळा आणि यानंतर हातानंच पिठाला पुरीसारखा आकार द्या. पिठात मोदकाप्रमाणे सारण भरा. हलक्या हाताने पोळी लाटून घ्या.
 • लाटलेली पोळी दोन्ही बाजूनं पॅनमध्ये शेकवा. साखर-खोबऱ्याची पोळी तयार आहे.

(अ‍ॅपल रबडी रेसिपी)

गोड पोळीची रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ

​काजू हलवा

सामग्री : काजू – एक कप, गव्हाचे पीठ – अर्धा कप, साखर – एक कप, तूप – अर्धा कप, वेलची पावडर – १/४ चमचा, केशर – तीन ते चार काड्या, बदाम – ५ ते ६ , पाणी – तीन कप

पाककृती :

 • मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू वाटून त्यांची बारीक पूड तयार करा. यानंतर पॅनमध्ये तीन कप पाणी उकळत ठेवा. उकळत्या पाण्यामध्ये एक कप साखर मिक्स करून पाक तयार करावा.
 • साखरेच्या पाकात ३-४ केशरच्या काड्या घालाव्यात. मिश्रण थोडा वेळ उकळू द्यावं.
 • दुसऱ्या पॅनमध्ये अर्धा कप तूप गरम करा. तुपात अर्धा कप गव्हाचं पीठ परतवून घ्या. यानंतर पॅनमध्ये काजूची पावडर घालावी. पाच ते सहा मिनिटे मिश्रण ढवळावे.
 • मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात साखरेचा पाक मिक्स करा. हलवा शिजेपर्यंत सर्व सामग्री नीट ढवळत राहा.
 • हलवा तयार झाल्यानंतर वरून वेलची पूड आणि बदामाचे काप घालावेत. यानंतर हलवा पुन्हा एकदा नीट मिक्स करावा.

(घरच्या घरी तयार करा सत्तूची बर्फी, जाणून घ्या सोपी रेसिपी)

स्टेप बाय स्टेप जाणून घ्या काजू हलवा रेसिपी

​मावा करंजी

सामग्री : मैदा – एक कप , तूप – एक कप, कोमट पाणी – १/४ ग्लास , पिठी साखर – एक कप, भाजलेला मावा – एक कप, बारीक किसलेले सुके खोबरे – एक कप , पिस्ता आणि बदामाचे काप, रवा – अर्धा कप, चारोळी – एक चमचा, केशर आणि चिमूटभर वेलची पावडर

पाककृती :

 • पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करत ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात अर्धा कप रवा भाजून घ्या. यानंतर एक कप बारीक किसलेले सुके खोबरे, चारोळी, बदाम- पिस्त्याचे काप, वेलची पूड आणि केशर मिक्स करा.
 • दुसऱ्या बाउलमध्ये एक कप मैदा घ्या, त्यात अर्धा कप तूप मिक्स करा. तूप आणि मैदा नीट मिक्स करून घ्या. आता पिठामध्ये थोडं-थोडं कोमट पाणी ओता. करंजीसाठी पीठ मळा. पीठ मळून झाल्यानंतर ते स्वच्छ कापडाने थोड्या वेळासाठी झाकून ठेवा.
 • पॅनमधील मिश्रण थंड झाल्यावर त्यात एक कप पिठी साखर, एक कप भाजलेला मावा मिक्स करावा. तयार झाले करंजीचे सारण.
 • लाटलेली पुरी करंजी मेकरमध्ये ठेवून त्यात सारण भरा. तुपात करंज्या फ्राय करून घ्या.

(उपवासासाठी साबुदाण्याची खीर कशी तयार करावी? जाणून घ्या)

मावा करंजी रेसिपीचा संपूर्ण व्हिडीओ पाहा

​बालूशाही

सामग्री : मैदा – दोन कप , साखर – दोन कप , पाणी – एक कप, दही – १/४ कप , तेल – १/४ कप , साखरेच्या पाकासाठी १/४ कप पाणी, वितळवलेलं तूप – १/४ कप, चिमूटभर सोडा, गार्निशिंगसाठी ३-४ लहान वेलदोडे आणि बदामाचे काप

पाककृती :

 • एका बाउलमध्ये १/४ कप पाणी, वितळवलेलं तूप, चिमूटभर खायचा सोडा एकत्र घ्या. सर्व सामग्री नीट मिक्स करा. यानंतर बाउलमध्ये दोन कप मैदा मिक्स करा. आता यामध्ये दह्याचा समावेश करा. पुन्हा थोडासा मैदा मिक्स करून पीठ मळून घ्या आणि २० मिनिटांसाठी पीठ सेट होण्यास ठेवून द्या.
 • दुसऱ्या पॅनमध्ये दोन कप साखर घ्या आणि त्यात १/४ कप पाणी मिक्स करून साखरेचा पाक तयार करावा. बालूशाही करण्यापूर्वी पीठ पुन्हा मळा.
 • पिठाचे लहान- लहान आकाराचे गोळे तयार करा. पिठाला डोनटप्रमाणे आकार द्यावा.
 • गरम तेलामध्ये बालूशाही फ्राय करून घ्या. यानंतर बालूशाही साखरेच्या पाकात बुडवून ठेवा.

(गोडाचा शिरा तयार करण्याची सोपी रेसिपी)

VIDEO घरी कशी तयार करायची बालूशाही रेसिपी ?

​कोको बर्फी

सामग्री :

१०-१२ बिस्कीट, कंडेन्सड मिल्क – तीन मोठे चमचे, कोको पावडर – दोन ते तीन चमचे, काजू – नऊ ते १०

पाककृती :

 • मिक्सरच्या भांड्यामध्ये कुस्करलेल्या बिस्किटांची पावडर तयार करून घ्या. आपल्या आवडीनुसार साधे किंवा क्रीम बिस्कीट पाककृतीसाठी वापरू शकता.
 • एका बाउलमध्ये बिस्किटांची पूड आणि कोको पावडर एकत्र घ्या. दोन्ही सामग्री एकजीव करून घ्यावी. यानंतर मिश्रणात कंडेन्सड मिल्क घालावं.
 • आता मिश्रण कणकेसारखे मळून घ्या. त्याची गोल पोळी लाटा. तुमच्या आवडत्या आकाराची बर्फी तयार करा. तयार झाली आहे कोको बर्फी!

(कुरकुरीत व साखरेच्या पाकात बुडवलेली बदाम पुरी, जाणून घ्या सोपी रेसिपी)

कोको बर्फी रेसिपीचा पाहा संपूर्ण व्हिडीओ


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *