Diwali Ubtan अभ्यंगस्नानासाठी घरच्या घरी तयार करा ४ प्रकारचे उटणे

Spread the love

दिवाळी म्हणजे रोषणाई, दिव्यांचा लखलखाट, सजावट आणि खमंग फराळ. याव्यतिरिक्त दिवाळीसाठी उटणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पहाटे उठून अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. ही प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान पूर्वीच्या काळी लोक घरीच उटणे तयार करत असत. पण हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी उटणे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. बऱ्याचदा या उटण्यांमध्येही हानिकारक रसायनांचा समावेश केला जातो. ज्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी घरच्या घरीच तयार केलेले उटणे वापरुन पाहा.

नैसर्गिक सामग्रींपासून तयार केलेले उटणे लावल्यास त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घरगुती उटण्यांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास तुम्हाला ब्युटी पार्लरमध्येही जाण्याची आवश्यकता भासणार नाही. घरच्या घरी चार प्रकारचे उटणे तयार करण्याची सोपी पद्धत आपण जाणून घेणार आहोत.
(Skin Care Tips टिकली लावल्यामुळे होते स्किन अ‍ॅलर्जी, कोणते उपाय करावेत? जाणून घ्या)

​हळद- तिळाचे उटणे

सामग्री : हळद – एक चमचा, तीळ – दोन ते तीन चमचे, आवश्यकतेनुसार पाणी

मिक्सरच्या भाड्यांमध्ये वरील सर्व सामग्री एकत्र घेऊन त्याची बारीक पेस्ट तयार करा. उटणे तयार झाल्यानंतर चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर अंग स्वच्छ धुऊन घ्या. या उटण्याच्या वापरामुळे चेहरा मऊ, नितळ आणि चमकदार होण्यास मदत मिळते.

चेहऱ्यासाठी तिळाचे लाभ : तिळामध्ये फॅटी अ‍ॅसिड असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेला नैसर्गिक स्वरुपातील मॉइश्चराइझर मिळते. यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, डार्क स्पॉट्स आणि मुरुमांची समस्या कमी होते.

हळदीचे फायदे : हळदीमध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म आहेत. यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येण्यास मदत मिळते आणि मुरुमांची समस्याही कमी होते. हळदीमुळे त्वचेवरील डागांची समस्याही दूर होते.

​हळद, तिळाचे तेल आणि चंदन

वाटीमध्ये एक चमचा चंदन पावडर, दोन ते तीन चमचे तिळाचे तेल घ्या आणि बारीक पेस्ट तयार करा. यानंतर त्यात चिमूटभर हळद मिक्स करा. तयार आहे तुमचे घरगुती उटणे. आयुर्वेदिक उपचारांमध्ये हळद, चंदन आणि तिळाच्या तेलाला भरपूर महत्त्व आहे. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फार पूर्वी चंदनाचा उपयोग केला जात आहे. चंदनाच्या वापरामुळे आपल्या त्वचेला थंडावा मिळतो.

(चेहऱ्यावर का लावू नये बॉडी लोशन, काय होऊ शकते नुकसान? जाणून घ्या)

​हळद, चंदन, तांदळाचे पीठ, बेसन, गुलाब पाणी व तिळाचे तेल

प्लेटमध्ये अर्धा मोठा चमचा तांदळाचे पीठ आणि बेसन एकत्र घ्या. त्यामध्ये गुलाब पाणी, चंदन पावडर आणि तिळाच्या तेलाचे एक ते दोन थेंब मिक्स करा. सर्व सामग्री नीट एकजीव करा. चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर हे उटणे लावा आणि अभ्यंगस्नान करा. तुम्ही रक्तचंदनाचाही उपयोग करू शकता. यामुळे त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत मिळते.

(Beauty Tips घरच्या घरी कसं तयार करायचं मेकअप फाउंडेशन, जाणून घ्या पद्धत)

हळद, चंदन, तांदळाचे पीठ, गुलाब पाणी व दुधाची मलई

दुधाच्या मलईमुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळते. एका वाटीमध्ये अर्धा चमचा तांदळाचे पीठ घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा गुलाब पाणी व दुधाची मलई देखील मिक्स करा. सर्व सामग्री नीट मिक्स करून उटणे तयार करा आणि संपूर्ण शरीरावर लावा. यातील नैसर्गिक सामग्रींमुळे आपल्या त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. याव्यतिरिक्त आपण मुलतानी माती, दही, मसूर डाळ, मध किंवा दुधापासून घरगुती उटणे तयार करू शकता.

(कोपराच्या रूक्ष व कोरड्या त्वचेपासून कशी मिळवावी सुटका, जाणून घ्या हे ७ नैसर्गिक उपाय)

​या गोष्टी देखील लक्षात ठेवा

संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना नैसर्गिक सामग्रींमुळेही अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून नेहमी पॅच टेस्ट करून पाहावी. त्वचेसाठी नैसर्गिक किंवा घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या हाताच्या त्वचेवर पेस्ट किंवा लेप लावून पाहावा. त्वचेवर जळजळ किंवा खाज येणे, त्वचा लाल होणे यापैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास उपाय करणं टाळावं. तसंच त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. महत्त्वाचे म्हणजे आठ वर्षांखालील मुलांच्या त्वचेवर हे घरगुती उटणे लावण्याची चूक नये. कारण त्यांची त्वचा अतिशय नाजूक असते.

(Diwali 2020 घरच्या घरी मेकअप करताना लक्षात ठेवा या टिप्स)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *