Evening Exercise And Yoga संध्याकाळी योगासने किंवा व्यायाम करण्याचे फायदे

Spread the love

​हे अतिरिक्त लाभ मिळतात

– सकाळच्या सुमारास योग, व्यायाम करण्याचे जे अतिरिक्त लाभ मिळतात ते तुमच्या शरीर आणि मेंदूच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. कारण सकाळी व्यायाम केल्यानं रात्री चांगली झोप येते आणि शरीराला भूक देखील लागते.

– दिवसभर काम करून थकलेले असताना काही जण संध्याकाळी एक्सरसाइज करायला विसरत नाही. सकाळी अपूर्ण झोपेच्या अवस्थेत यंत्रणाच्या मदतीने व्यायाम केल्यास शारीरिक दुखापती होण्याची शक्यता असते. त्यामुळे यासंबंधी योग्य ती काळजी घ्यावी.

(Pudina Benefits पुदिना खाण्याचे ६ आरोग्यदायी फायदे)

​संध्याकाळी व्यायाम केल्यास मिळू शकते तणावमुक्ती

जी लोक संध्याकाळच्या सुमारास व्यायाम करतात, त्यांना दिवसभराचा ताणतणाव आणि चिंता दूर कशी करायची याचे व्यवस्थापन करण्यास अधिक मदत मिळते. कारण योगासनांचा नियमित सराव केल्यास शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होऊ शकतो. ताणतणाव कमी झाल्याने आपल्याला रात्री चांगली झोप येते.

(OCD ओसीडी म्हणजे काय? काय आहेत या आजाराची लक्षणे)

​राग काढण्याचा योग्य मार्ग

– काही जणांना राग व्यक्त करणं अतिशय कठीण जाते. पण अस्वस्थतेमुळे भरपूर त्रास जाणवतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही या ऊर्जेचा सकारात्मक पद्धतीने उपयोग करू शकता. रागामुळे शरीरात वाढलेली ऊर्जा तुम्ही धावणे किंवा अन्य स्वरुपातील व्यायामामध्ये गुंतवू शकता.

– असे केल्यास शरीरामध्ये असंतुलित झालेले हार्मोन नियंत्रित करण्यास तुम्हाला मदत मिळू शकते. नकारात्मक विचार, राग आणि तणावामुळे आपल्या शरीराचे कित्येक प्रकारे नुकसान होते. यादरम्यान हार्मोनमध्येही बरेच बदल होत असतात.

(तुमच्यातही विसराळूपणा वाढतोय का? स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ सोपे उपाय)

​सकाळच्या थकव्यापासून बचाव करण्याची पद्धत

– सकाळच्या सुमारास ऑफिसला जाण्याची घाई, दिवसभराचे नियोजन, इत्यादी गोष्टींचे विचार कायम आपल्या मेंदूमध्ये सुरू असतात. जी लोक स्वतःच्या वेळेचे, दिवसभराच्या नियोजनाचे काटेकोरपणे पालन करण्यास असमर्थ ठरतात, अशा लोकांसमोर या समस्या नेहमी निर्माण होतात.

– अशा परिस्थितीत ही माणसे संध्याकाळी व्यायाम करून स्वतःला फिट ठेवू शकतात. कारण अति विचार करण्याच्या सवयीमुळे आपला मेंदू तसंच शरीर देखील थकून जाते. त्यामुळे दिवसभरातील कामांतून फ्री होऊन ही मंडळी संध्याकाळी व्यायाम करण्यावर भर देतात.

(पाठ, कंबर, पायांच्या दुखण्यापासून सुटका हवीय? करा हे सोपे आसन)

​शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते

सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केल्यानंतर आपले शरीर थकते. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो. सोबत ऑक्सिजनची पातळी देखील कमी होऊ लागते. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी व्यायाम केल्यास दिवसभरात शरीराची झालेली झीज भरून काढण्यास मदत मिळते. शरीराला ऊर्जा मिळते. व्यायामानंतर पुढील कित्येक तास शरीर सक्रिय राहण्यास मदत मिळते.

(Tips For Better Sleep शांत झोप हवी असेल तर हे एक काम नक्की करून पाहा)

​झोपेची वेळ निश्चित करा

अशा प्रकारे संध्याकाळी एक्सरसाइज करण्याचे वेगळे फायदे आहेत. पण तुम्हाला झोपेची वेळ निश्चित करणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. सोबतच झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी व्यायाम करणे शरीरासाठी चांगले असते. अन्यथा ऑक्सिजनच्या वाढलेल्या पातळीमुळे तुम्हाला झोप येणे कठीण ठरू शकते.

NOTE : कोणत्या प्रकारचे व्यायाम, योगासने करणं शरीरासाठी लाभदायक ठरेल, याबाबत आपल्या ट्रेनरकडून सल्ला घ्यावा. तसंच शारीरिक दुखापती टाळण्यासाठी ट्रेनरसमोरच व्यायाम करावा.

(वर्क फ्रॉम होमचा कंटाळा आलाय? या ५ गोष्टींमुळे होऊ शकते मदत)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *