Flower Print Fashion फुलाफुलांची फॅशन जोमात

Spread the love

तेजल निकाळजे, साठये कॉलेज

सध्या स्टायलिंग करताना पेहरावासोबत अ‍ॅक्सेसरीज, शूज यांनाही समान महत्त्व दिलं जातं. नेकपीस, ब्रेसलेट, केसांसाठीच्या अ‍ॅक्सेसरीज यासोबतच मॅचिंग चप्पलही आणखी उठावदार दिसण्यासाठी मदत करतात. या सगळ्यात फ्लोरल डिझाइनची चलती आहे. या पॅटर्नमध्ये नवनवीन आणि भन्नाट पर्याय उपलब्ध आहेत.

० पेहराव ठरेल लक्षवेधी

फ्लोरल प्रिंट असलेल्या कपड्यांना कायम मागणी असते. कॅज्युअल वेअरपासून सगळ्या प्रकारात फ्लोरल प्रिंट उपलब्ध आहे. फ्लोरल प्रिंटचं स्टायलिंग करताना कोणकोणत्या प्रकारच्या कपड्यांना प्राधान्य दिलं जातं ते पुढलप्रमाणे…
– मिडी ड्रेस, स्कर्ट, जीन्स, पँट्स, स्कार्फ
– टीप: फ्लोरल प्रिंटची आवड नसणाऱ्या तरुणींसाठी केवळ स्लीव्हज वर नक्षीकाम असणाऱ्या टॉप्सचा पर्याय आहे.


० फॅशनेबल बॅग्स
हट के लूकची आवड असणाऱ्यांनी फ्लोरल बॅग्सची फॅशन आजमावून पाहावी असं फॅशन डिझायनर आवर्जून सांगतात. भन्नाट स्टाइलच्या आणि फ्लोरल प्रिंट असलेल्या बँग्सची चलती आहे. शिवाय, फ्लोरल एम्ब्रॉयडरी असणाऱ्या बॅग्स देखील लक्ष वेधून घेतात. फ्लोरल प्रिंट असणाऱ्या बॅग्सचे प्रकार पुढीलप्रमाणे…
– कॅनव्हास शोल्डर, फ्लोरल पॅचवर्क, टोट आणि कॉलेज बॅग
– टीप: मोठ्या आकारच्या फुलांची प्रिंट असणाऱ्या बॅग्सना पर्याय म्हणून लहान आकाराच्या फुलांचं नक्षीकाम असणाऱ्या पर्स वापरायला हरकत नाही.
(चोकर्सची चलती! ट्रेंडनुसार निवडा स्टायलिश नेकलेस)

० बूट-सँडल्सची चलती…
फॅशनप्रेमींना चपलांचं महत्त्व वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पेहरावाला मॅचिंग आणि योग्य रंगसंगती असणाऱ्या शूजची निवड करणं देखील महत्त्वाचं असतं. चप्पलांमध्ये अनेक पॅटर्न, रंग आणि प्रिंट बाजारात असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. कोल्हापुरी चपलांमध्येही फ्लोरल डिझाइनला प्रचंड मागणी आहे. तरुणींसोबतच तरुणांध्येही फ्लोरल प्रिंटेड स्निकर्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बुटांच्या कोणकोणत्या प्रकारात फ्लोरल प्रिंट बघायला मिळते ते पुढीलप्रमाणे…
– स्निकर्स, म्यूल शूज, कॅनव्हास शूज, फ्लिप-फ्लॉप
(गुलाबी रंगाची क्रेझ : कपड्यांपासून ते फॅशनेबल वस्तूंपर्यंत हवाहवासा गुलाबी रंग)
कुर्त्यांना चार चांद लावणाऱ्या मोजडी, ओपन टो लोफर्स या प्रकारात देखील फ्लोरल प्रिंट पाहायला मिळते. दुसरीकडे पार्टीवेअर चपलांमध्येही फ्लोरल पॅटर्न असतं. त्याचे प्रकार पुढीलप्रमाणे…

– हाय हिल्सस, अँकल लेन्थ बूट्स, किटन हिल्स, पीप टो शू

– टीप: काही चपलांना अंगठ्याजवळ फुलं किंवा पॅच असतात. वापरल्यानंतर थोड्याच दिवसात फुलाचा पॅच पडतो आणि चपलांचा लूक जातो. त्यामुळे नेहमीच्या वापरातील चपला घेताना अंगठ्याजवळ फुल असणाऱ्या चपला घेणं टाळावं. शिवाय, जुन्या कॅनव्हास शूजवर घरच्या घरी फ्लोरल नक्षीकाम करू शकता.
(चमकते रहो! स्टायलिश लुक देणाऱ्या सिक्विन पॅटर्नची तरुणींना भुरळ)
० अ‍ॅक्सेसरीजना मागणी
पेहरावाला हट के आणि फॅशनेबल लूक देण्यासाठी अ‍ॅक्सेसरीजना पर्याय नाही. विशेषतः हेअरबँडमध्ये फ्लोरल प्रिंट अधिक आकर्षक दिसतात. बंडाना बांधण्याची आवड असणाऱ्या तरुणींना फ्लोरल प्रिंटमध्ये असंख्य पर्याय उपलब्ध असतात. कोणत्या प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीजमध्ये फ्लोरल पॅटर्न बघायला मिळतं, ते पुढीलप्रमाणे…
– नेकलेस, चोकर, ब्रेसलेट, अंगठ्या, घड्याळ्याचे पट्टे, क्राऊन्स, अँकलेट्स

वरील प्रकारांमध्ये फ्लोरल डिझाइन्स उपलब्ध आहे. ड्रेस अथवा जीन्सना आकर्षक लूक देण्यासाठी फ्लोरल प्रिंट्सच्या पट्ट्यांना मागणी आहे. कानातले आणि क्लिप्समध्ये लोकरीच्या धाग्यांनी तयार केलेल्या अ‍ॅक्सेसरीज लक्ष वेधून घेतात. फ्लोरल डिझाइनची आवड असणाऱ्यांसाठी क्विलिंग पॅटर्नच्या कानातल्यांचा पर्याय आहे.

– टीप: चोकर हा प्रकार शोभून दिसत असला तरीही बाहेर जाताना चोकरला पर्याय असणारं वेगळं नेकपीस जवळ ठेवा. कारण, चोकर गळ्याभोवती असल्यानं काही काळानंतर त्रास जाणवू शकतो. शिवाय, नाजूक असल्यानं तुटण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

नेल आर्टची क्रेझ भारी

नेल आर्ट हा तरुणींचा जिव्हाळ्याचा विषय असतो. नेल आर्ट करताना देखील फ्लोरल नेल आर्ट ट्राय करायला हरकत नाही.
टीप- फ्लोरल नेल आर्ट जमत नसल्यास बाजारात खास नेल आर्टसाठी वापरण्यात येणारी कृत्रिम फुलं उपलब्ध असतात. त्यांचा वापर करून फ्लोरल नेल आर्ट करू शकता.

मास्कचा पर्याय
आजकाल घरीच मास्क शिवण्याला प्राधान्य दिलं जातंय. मास्क तयार करण्यासाठी देखील फ्लोरल प्रिंटेड कापड वापरल्यास वेगळा लूक येईल. यासोबतच सध्या पेहरावाला मॅचिंग मास्क तयार करून घेण्याकडे देखील कल वाढलाय.
– टीप: मास्कमध्ये वेगळा लुक करून पाहायचा असल्यास हेअरबँड मास्कचा उत्तम पर्याय आहे. मास्क विकत घेताना सुती कापडाला प्राधान्य द्या.
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *