Ganesh Chaturthi 2020 काजू, मलई, मावा… आहाहा !

Spread the love

मुंबई टाइम्स
– मधुरा बाचल
१.शुगर फ्री पंचखाद्य मोदक
साहित्य- एक कप सीडलेस खजूर, पाव कप सुका मेवा, पाव कप सुकं किसलेलं खोबरं, पाव चमचा खसखस, एक चमचा साजूक तूप.
कृती- तूप गरम करून त्यामध्ये खसखस भाजून घ्या. खसखस भाजून झाली की खजूर घालून ते मऊ होईपर्यंत परतून घ्या. किसलेलं खोबरं, सुकामेवा घालून आणखी दोन मिनिटं परतून घ्या. वेलची पूड घालून मिक्स करून गॅस बंद करा. मिश्रण थंड झालं की मोदक साच्यामध्ये भरून मोदक वळून घ्या.

२.नो कूक रोज मोदक
साहित्य- एक कप डेसिकेटेड कोकोनट, पाव कप मिल्क पावडर, पाव कप रोज सिरप, दोन चमचे गुलकंद, दोन चमचे सुकामेवा, एक चमचा टूटीफ्रुटी.
कृती- गुलकंद, सुकामेवा, टूटीफ्रुटी मिक्स करून सारण बनवून घ्या. डेसिकेटेड कोकोनटमध्ये मिल्क पावडर आणि रोज सिरप घालून एकजीव करून घ्या. मोदक साच्यात मिश्रण घालून त्यामध्ये गुलकंदाचं सारण भरा.

३.झटपट मलई मोदक
साहित्य- २५० ग्रॅम पनीर, १२५ ग्रॅम पिठी साखर, पाव चमचा वेलची पूड.
कृती- पनीर किसून घेऊन ते हाताने छान मळून घ्या. कमीत कमी दहा मिनिटं तरी मळून घ्या. एकजीव करून घेतलेल्या पनीरमध्ये पिठीसाखर घाला. हे मिश्रण तव्यामध्ये घालून अगदी मंद आचेवर पाच ते सात मिनिटं परतून घ्या. मिश्रणाला पाणी अजिबात सुटता कामा नये. नंतर वेलची पूड घालून मिक्स करून घ्या. आता मोदक साच्यामध्ये घालून मोदक वळून घ्या.
(Ganesh Chaturthi 2020 बाप्पाचा आवडता पदार्थ उकडीचे मोदक, जाणून घ्या याचे आरोग्यवर्धक फायदे)


४. चॉकलेट मावा मोदक
साहित्य- २५० ग्रॅम खवा, १५० ग्रॅम पिठी साखर, १५० ग्रॅम डार्क चॉकलेट.
कृती- खवा पॅनमध्ये घालून हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. खवा परतून झाला की त्यामध्ये किसलेलं चॉकलेट घालून मिक्स करून घ्या. खवा चॉकलेट मिश्रण थंड झालं की त्यामध्ये पिठी साखर घाला. चॉकलेट साच्यामध्ये घालून मोदक वळून घ्या.
(Shravan 2020 सेलिब्रेटिंग श्रावण…)

५. नो कूक काजू मोदक
साहित्य- एक कप काजू, एक कप पिठी साखर, अर्धा कप मिल्क पावडर, चार चमचे पाणी, पाव चमचा रोज इसेन्स.
कृती- काजूची पूड करून घ्या. काजूची पूड, मिल्क पावडर आणि पिठीसाखर एकत्र मिक्स करुन घ्या. हे मिश्रण तीन मिनिटं मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घ्या किंवा तव्यावर भाजून घ्या. मिश्रण थंड झालं की पाणी आणि रोज इसेन्स घालून गोळा मळून घ्या. मिश्रण मोदक साच्यामध्ये घालून मोदक वळून घ्या.
(Ganesh Chaturthi 2020 गणेशोत्सवामध्ये हटके दिसायचंय? जुन्या लुकला असा द्या नवा टच)
(लेखिका प्रसिद्ध फूड यू-ट्युबर आहेत.)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *