Ganesh Chaturthi 2020 गणेशोत्सवामध्ये हटके दिसायचंय? जुन्या लुकला असा द्या नवा टच

Spread the love

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2020) वेगळा असेल. यावर्षी मनसोक्त खरेदी करता आली नसली तरीही घरी उपलब्ध असणाऱ्या कपड्यांना नवा टच देऊन सुंदर आणि आकर्षक लूक मिळवता येईल. याविषयी कॉश्च्युम डिझायनर पौर्णिमा ओक यांनी मार्गदर्शन केलं आहे.

ओढणीला द्या साडीचा लुक

ओढणीला केवळ सलवार कुर्त्यांवर न घेता तिला आकर्षक पद्धतीनं शरीराभोवती गुंडाळून साडीचा किंवा हाफ नऊवारीचा लूक आणता येईल. यासाठी तुम्हाला विशेष मेहनत घेण्याची आवश्यकता नाही. शिवाय वेगळा ब्लाऊज शिवून घेण्याची आवश्यकता नाही. स्टेटमेंट ब्लाऊजचा पर्याय तुमच्यासमोर आहे. जीन्स आणि ग्लिटर टॉप घालून त्यावर वेगळ्या रंगाची ओढणी गुंडाळल्यास तुम्ही आणखी खुलून दिसाल.
(साडीसह ज्वेलरीचं परफेक्ट कॉम्बिनेशन कसं करायचं? काजोलकडून घ्या टिप्स)

दागिन्यांचा साज

पेहराव पारंपरिक असो वा पाश्चिमात्य दागिन्यांनी त्याला चार चांद लावता येतात. अगदी सर्वसाधारण कुर्त्यांना आणि साड्यांना हट के लूक आणण्यासाठी दागिने मदत करतात. सोन्याच्या दागिन्यांना ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा पर्याय आहे. विशेषतः तरुणींमध्ये ऑक्सिडाइज्ड दागिन्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. ऑक्सिडाइज्ड दागिने घालून वावरण्यासही सोपं असतं.

(कपाट स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्यासाठी वापरा या ७ टिप्स)

​झुमके

इंडो- वेस्टर्न स्टाइलनं पेहराव करू इच्छिणाऱ्या तरुणींना या दागिन्यांची उत्तम साथ मिळेल. हल्लीच्या काळात जास्त घेर असणाऱ्या अनारकली कुर्त्यांवर एक मोठा झुमका घालण्याचा ट्रेंड आहे. याव्यतिरिक्त अंगठ्या आणि चोकर घालू शकता. चाळीशीच्या पुढील महिलांसाठी साड्यांवर ऑक्सिडाइज दागिने घातल्यास नेहमीपेक्षा हटके लुक येईल.

(Hairstyles For Women या ५ सोप्या हेअर स्टाइलमुळे तुम्हाला मिळेल कूल लुक)

​साडी नेसताना

साडी म्हणजे महिलांचा आवडीचा विषय. हल्ली घागऱ्यासारख्या दिसणाऱ्या साड्या मार्केटमध्ये आणि ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीनं वेगळा लूक आणू शकता. नेहमीच्या साड्यांनाही वेगळ्या पद्धतीनं गुंडाळून त्यांना घागऱ्याप्रमाणं नेसू शकता. यासाठी युट्यूबवर असंख्य व्हिडिओ उपलब्ध आहेत. ट्रेंडी लूक येण्यासाठी आणि उठावदार दिसण्यासाठी कायम नवीन कपड्यांची गरज नसते. तुम्हाला रंगसंगतींसोबत खेळता यायला हवं.

(Fashion Tips आकर्षक दिसण्यासाठी फॉलो करा या ९ फॅशन टीप्स)

​स्कर्टचा उत्तम पर्याय

हल्ली प्रत्येक तरुणीच्या कपाटात स्कर्ट असतोच. बऱ्याच मुली जुन्या साड्यांचा स्कर्ट शिवून घेतात. बाजारातही स्कर्टमधे भरपूर ऑप्शन उपलब्ध असतात. भरजरी घागऱ्यात वावरणं तुलनेनं कठीण असतं. अशा वेळी जरी कापडाच्या एखादा छानशा अम्ब्रेला स्कर्टवर पारंपरिक अथवा बनारसी सिल्कची ओढणी गुंडाळली तर हाफ साडीचा लूक मिळेल. स्कर्टवर तुमच्या कलेक्शनमधील एखादा वेगळा ब्लाऊज घालून पाहा. अशाप्रकारे नेहमीच्या वापरातील कपड्यांना आकर्षक बनवा.

(पावसाळ्यात कपाटातील कपड्यांना वास येतो? समस्या दूर करण्यासाठी ७ सोपे उपाय)

​फ्युजनचा तडका

साडीमध्ये वावरण्यास अडचण येणाऱ्या तरुणींनी कुर्त्यांमध्ये वेगवेगळ्या आयडीया करून पाहाव्या. प्रत्येकवेळी एकाच पद्धतीचे कपडे न घालता फ्युजन करण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यापर्यंत असणारे कुर्त्यांना दुपट्यांच्या साहाय्यानं वेगवेगळे लूक देता येतात. स्लिट पॅटर्न असणाऱ्या कुर्त्यांवर देखील निरनिराळे प्रयोग करू शकता. बांगड्या अथवा ब्रेसलेट्स, अंगठ्या घातल्यानं तुम्ही अधिक उठावदार दिसाल. कुर्त्यांना इंडो-वेस्टर्न फ्युजन देऊन ते परिधान करू शकता. मास्कलाही तुमच्या स्टायलिंगमध्ये सामील करून घ्या. पेहरावाला मॅचिंग मास्क कस्टमाइझ करून घेतल्यानं तो लूक तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील.

(Fashion Tips जुन्या कपड्यांना नवा लुक द्यायचाय? जाणून घ्या या सोप्या टिप्स)

​बंडानाचा पर्याय

तुम्ही जर फॅशनप्रेमी असाल आणि कमी वेळात हट के काहीतरी करण्यासाठी बंडानाला न विसरता कसं चालेल. ड्रेसला मॅचिंग बंडाना बांधून वेगळा लूकचा प्रयोग करून पाहू शकता. बंडाना बांधण्याचे अनेक व्हिडीओज युट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यांची मदत नक्कीच घेऊ शकता. बंडाना बांधण्यासाठी रंगबेरंगी स्कार्फची किंवा जरीच्या दुपट्यांची निवड करा. मॅचिंग मास्क आणि बंडाना देखील लुकमध्ये भर घालेल.

(लग्नासाठी लेहंगा, साडी खरेदी करण्यावरून आहे गोंधळ? मग हे नक्की वाचा)

संकलन- तेजल निकाळजे, साठये कॉलेज


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *