अंकिता आपल्या फॅशन स्टाइलमध्ये सतत काही- न् – काही नवीन प्रयोग करत असते. मग एखाद्या सिनेमाचे स्क्रीनिंग असो किंवा सणसमारंभ… अंकिताची स्टाइल हटके अशीच असते. गणेशोत्सवामध्येही (Ganesh Utsav 2020) अंकिताची सुंदर आणि हटके स्टाइल पाहायला मिळाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अंकिताने आपल्या घरी लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. श्री गणेश पूजन, गौरी पूजनाचे काही खास व्हिडीओ आणि फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
( जेव्हा अंकिता लोखंडेनं परिणिती चोप्राची स्टाइल केली होती कॉपी, चाहते म्हणाले…)
१.पारंपरिक वेशभूषा
शेअर केलेल्या या फोटोमध्ये अंकिता गणपती बाप्पाची पूजा करताना दिसत आहे. अंकिताची ही पारंपरिक वेशभूषा तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडली. तिच्या या ‘महाराष्ट्रीयन लुक’वर लाइक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. दरम्यान हे फोटो शेअर करण्यापूर्वी अंकितानं गेल्या वर्षीच्या गणेश चतुर्थीचेही फोटो पोस्ट केले होते. तसंच आणखी एक पोस्टद्वारे तिनं सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची विनंतीही केली होती.
(अंकिता लोखंडेनं हिना खानची स्टाइल केली कॉपी? फोटो झाले होते व्हायरल)
२. महाराष्ट्रीयन लुक
अंकिता वेस्टर्न ड्रेस प्रमाणेच पारंपरिक पेहरावामध्येही तितकीच स्टायलिश दिसते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला अंकिताचा महाराष्ट्रीयन लुक पाहायला मिळाला. साडी आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये अंकिता प्रचंड सुंदर आणि मोहक दिसत होती. गौरी पूजनासाठी अंकिताने मरून रंगाची साडी नेसली होती. या साडीच्या बॉर्डरवर चंदेरी रंगाच्या धाग्यांचे सुंदर डिझाइन दिसत आहे. साडीवर देखील धाग्यांपासून आकर्षक विणकाम करण्यात आले आहे.
(Ankita Lokhande ‘पवित्र रिश्ता’मधील अंकिता लोखंडेचा स्टायलिश अवतार)

३. अंकिताचा मेकअप
अंकिताच्या संपूर्ण लुकबाबत सांगायचे झाल्याने तिनं महाराष्ट्रीयन पद्धतीने साडी नेसली होती. सोबत पारंपरिक दागिने देखील घातले होते. यामध्ये सोन्याचे नेकलेस, कमरपट्टा, नथ या दागिन्यांचे समावेश होता. तसंच तिने कपाळावर चंद्रकोर देखील लावली होती. कमीत कमी मेक अप मध्येही अंकिता नेहमी प्रमाणे सुंदर दिसत आहे. लाल रंगाची लिपस्टिक, हातांमध्ये लाल रंगाच्या बांगड्या आणि हेअर स्टाइल म्हणून अंबाडा बांधला होता. तिचा हा मराठमोळा लुकमध्ये चाहत्यांना खूप आवडला आहे.
(शिल्पा शेट्टीनं आपल्या ६ महिन्यांच्या लेकीसाठी तयार करून घेतला स्पेशल ड्रेस)
४. चाहत्यांना आवडला लुक
अंकिता हा पारंपरिक मराठी अवतार तिच्या चाहत्यांसह मित्रमैत्रिणींनाही आवडला. तिच्या फोटोवर लाइक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. अंकिताने आपली आई वंदना लोखंडे यांच्यासोबतचेही काही फोटो शेअर केले आहेत.
(सोनाली बेंद्रेनं नव्या लुकमधील फोटो केले शेअर, चाहते म्हणाले…)
Recent Comments