Hair Care केसगळती रोखण्यासाठी करा हे ७ घरगुती उपाय, जाणून घ्या पद्धत

Spread the love

जाणून घेऊया काही नैसर्गिक उपचारांची माहिती
कांद्याचा रस (Onion Juice)

सामग्री: कापलेला कांदा, कापूस
कापलेला कांदा मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्याचा रस काढा. कापसाच्या मदतीने हा रस केस आणि टाळूला लावा. १० मिनिटांसाठी हा रस केसांमध्ये राहू द्या. यानंतर हर्बल शॅम्पून केस स्वच्छ धुऊन घ्या. कांद्यामध्ये सल्फर जास्त प्रमाणात असते. यामुळे केसांची चांगली वाढ होते.

​ऑलिव्ह ऑइल

सामग्री : ऑलिव्ह ऑइल, गरम पाणी, कॉटन टॉवेल, लसूणच्या १० पाकळ्या

लसूणचा रस तयार करा आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करा. हे तेल आता गरम करा आणि हलक्या हाताने केसांचा मसाज करा. आता टॉवेल गरम पाण्यामध्ये भिजवा आणि हलका पिळून घ्या. यानंतर हाच टॉवेल केसांवर १५ मिनिटांसाठी गुंडाळून ठेवा.

लाभ : ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटी ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. यामुळे नवीन केस येण्यास मदत मिळते. तसंच हे तेल केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरच्या स्वरुपात कार्य करते. लसूणमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते, जे केसांसाठी पोषक आहे.

(आठवड्याभरात केसांच्या समस्या होतील कमी, भृंगराज तेलानं असा करा मसाज)

​कोरफड जेल

बाजारात मिळणाऱ्या कोरफड जेलऐवजी केसांसाठी नैसर्गिक जेलचा वापर करावा. हे जेल हाताने केस आणि टाळूला लावा. ४५ मिनिटांनंतर आपले केस स्वच्छ धुऊन घ्या. कोरफड जेलमध्ये एंझाइम असतात. हे आपल्या रोमछिद्रांवरील मृत पेशी हटवण्याचे काम करतात आणि रोमछिद्रे स्वच्छ करतात. यातील औषधी गुणधर्मांमुळे केस मऊ आणि चमकदार होतात. शिवाय केस हायड्रेट देखील राहतात.

(केसगळती, कोंड्यापासून हवीय सुटका? पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी)

​मध

सामग्री : एक मोठा चमचा शुद्ध मध, दोन थेंब सौम्य शॅम्पू

मध आणि शॅम्पू एकत्र करा. हे मिश्रण आपल्या केसांवर लावा आणि दोन मिनिटांसाठी ठेवून द्या. यानंतर कोमट पाण्याने आपले केस स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर केसांना कंडिशनर देखील लावा.

लाभ : मधामध्ये अँटी ऑक्सिडेंटचा साठा आहे. याव्यतिरिक्त मधातील हायड्रेटिंग आणि औषधी गुणांमुळे केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो.

(Skin Care तुम्हीही फेशिअल करता का? जाणून घ्या त्वचेवर कसे होतात दुष्परिणाम)

​आले

आले किसून घ्या आणि डोक्यावर ज्या भागामध्ये केस कमी झाले आहेत तेथे आल्याचा किस लावा. २० मिनिटांनंतर केस स्वच्छ धुऊन घ्या.

लाभ : आल्यामुळे केसांच्या भागातील रक्तप्रवाह वाढतो. शिवाय यामुळे आपले केस मजबूत होण्यासही मदत मिळते.

(Hair Care या १० पद्धतींनी केसांना लावा नारळाचे तेल, केसांमध्ये दिसतील आश्चर्यकारक बदल)

​आवळा

सामग्री : दोन चमचे आवळ्याचा रस, दोन चमचे लिंबू रस

आवळा रस आणि लिंबू रस एकत्र घ्या आणि त्याचे मिश्रण तयार करा. या मिश्रणाने हळूहळू आपल्या केसांचा मसाज करा. थोड्या वेळाने केस कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.

लाभ : आवळा आणि लिंबूमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ आणि अँटी ऑक्सिडेंट चे घटक जास्त प्रमाणात असतात. व्हिटॅमिन सीमुळे आपल्या केसांना नैसर्गिकरित्या काळा रंग मिळतो. शिवाय केस जाड आणि मजबूत होण्यास मदत मिळते. केसांची वाढ देखील जास्त होते.

(Tips For Hair Care मेहंदीच्या पानांमुळे पांढऱ्या केसांची समस्या होईल दूर, जाणून घ्या फायदे)

​मेथी दाणे

सामग्री: दोन मोठे चमचे मेथी दाणे, एक वाटी पाणी

रात्रभर एक वाटी पाण्यामध्ये मेथीचे दाणे भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर आपल्या केस आणि टाळूला मेथीचे पाणी लावा. २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने केस धुऊन घ्या.

लाभ : मेथीमुळे केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. तसंच यातील घटक केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरच्या स्वरुपात काम करतात. यामुळे केसगळती कमी होते. याव्यतिरिक्त हेअर मास्क म्हणून देखील तुम्ही मेथी पावडरचा वापर करू शकता.

(कोरफड आणि हळदीचे मास्क चेहऱ्यासाठी आहे बेस्ट, त्वचेला मिळतील मोठे फायदे)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *