कोरड्या केसांसाठी उपाय
जर तुम्ही कोरड्या आणि निर्जीव केसांमुळे त्रासलेल्या आहात तर बेसन हेअर पॅकचा वापर करा. बेसनमुळे केस मऊ आणि सुंदर होतात. आतापर्यंत तुम्ही केवळ चेहऱ्यासाठीच बेसन पॅकचा वापर करत होतात. पण केसांचं आरोग्य चांगले करण्यासाठीही बेसनचा उपयोग करून पाहा. दही आणि बेसन हेअर पॅकमुळे कोणकोणते फायदे मिळतात, हे जाणून घेऊया.
(Skin Care रात्री झोपण्यापूर्वी अॅलोव्हेरा क्रीम लावा, चेहऱ्यावर दिसतील आश्चर्यकारक बदल)
केसांना बेसन लावण्याचे फायदे

केसगळती कमी होऊन केसांची चांगली वाढ होते. केस मुळापासून मजबूत होतात. केस घनदाट होऊन त्यावर नैसर्गिक चमक देखील येते. टाळूची त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. टाळूच्या त्वचेमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत मिळते. तेलकट केसांच्या समस्येसाठी बेसन हेअर पॅक रामबाण उपाय आहे.
(आठवड्यातून एकदा मेथी पॅक केस आणि त्वचेवर लावा, मिळतील जबरदस्त फायदे)
बेसन आणि दही हेअर मास्कचे फायदे

बेसन, दही आणि लिंबू रस एकत्र करून हेअर मास्क तयार करा. या मास्कमुळे तुमच्या केसांना मोठ्या प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा होतो. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. हा घटक एक्सफोलिएशन आणि हायड्रेशनसाठी उपयोगी आहे. यामुळे टाळूवरील सूक्ष्म जीवजंतुंचा खात्मा होतो. लिंबूमुळे केसांना व्हिटॅमिन सी मिळते, यामुळे केस चमकदार होतात. लिंबूमध्ये अँटी सेप्टिक आणि अँटी फंगल चे गुणधर्म आहेत. ज्यामुळे कोंड्याचा त्रास कमी होतो.
(केसगळतीतून ७ दिवसांत मिळेल सुटका, जाणून घ्या एरंडेल तेल लावण्याची योग्य पद्धत)
बेसन हेअर मास्क कसे तयार करायचे

सामग्री : दोन मोठे चमचे बेसन, पाच मोठे चमचे दही, दोन मोठे चमचे लिंबू रस, एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल किंवा बदाम तेल, एक मोठा चमचा बदाम पेस्ट, एक मोठा चमचा मध
एक वाटीमध्ये सर्व सामग्री एकत्र करून घ्या. केसांना लावण्यासाठी पेस्ट थोडीशी पातळ असावी. यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. ओल्या किंवा कोरड्या केसांवरही तुम्ही हे मास्क लावू शकता. यानंतर केसांना शॉवर कॅप लावा. १५ ते २० मिनिटांसाठी मास्क केसांवर राहू द्या. यानंतर थंड पाणी आणि शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या.
(कोरफड आणि हळदीचे मास्क चेहऱ्यासाठी आहे बेस्ट, त्वचेला मिळतील मोठे फायदे)
बदाम पावडर आणि बेसन

बेसन आणि बदाम पावडर हेअर पॅकमुळे तुमच्या केसांचे आरोग चांगले होण्यास मदत मिळते. या हेअर पॅकमुळे केस घनदाट, काळे आणि मजबूत होतील. तुमच्या केसांचा पोत देखील चांगला होतो. बेसन आणि बदाम पावडर एकत्र घ्या. ही पेस्ट केसांवर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. पण ती पूर्णपणे सुकू देऊ नका. अन्यथा केस धुताना त्रास होऊ शकतो. केस धुण्यासाठी कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करावा.
(Hair Care निर्जीव आणि कोरड्या केसांसाठी रामबाण उपाय, किचनमधील या ३ सामग्रींचा करा वापर)
बेसन आणि नारळ तेल हेअर पॅक

कोरड्या केसांसाठी हे मास्क वरदान आहे. यासाठी तीन ते चार चमचे बेसन, नारळाच्या तेलाचे काही थेंब, थोडेसे दही एकत्र घ्या. सर्व सामग्री एकत्र करून याची पातळ पेस्ट करावी. १५ मिनिटांसाठी मास्क केसांना लावा आणि त्यानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता.
(पांढरे केस, कोंड्याच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी असा करा काळ्या मिरीचा वापर)
Source link
Recent Comments