Hair Care मऊ आणि चमकदार केस हवे आहेत ? जाणून घ्या कसं फॉलो करायचं ग्लास हेअर ट्रेंड

Spread the love

​केसांच्या निरोगी आरोग्यासाठी

ग्लास हेअर लुक मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपले केस निरोगी असणं आवश्यक आहे. यासाठी नियमित स्वरुपात व्हिटॅमिनयुक्त आहाराचे सेवन करावे, स्टाइल (heating tools) टुल्सचा वापर कमी करावा आणि केसांवर ब्लीच ट्रीटमेंट करू नये. अशी काळजी घेतल्यास केसांचे नुकसान होणार नाही. तसंच कोरड्या केसांची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी उशीसाठी सिल्क कव्हरचा वापर करावा.

(Natural Hair Care Tips पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतात का? जाणून घ्या माहिती)

​केसांना करावा पोषण तत्त्वांचा पुरवठा

आपले केस शॅम्पू आणि कंडिशनरने धुतल्यानंतर ते सुकवण्यासाठी मायक्रोफायबर टॉवलचा वापर करावा. केस सुकल्यानंतर स्मूदिंग किंवा हीट-प्रोटेक्टिंग लीव-इन सीरम लावावे. ज्यामुळे केस जास्त काळ मऊ राहतील आणि केसांवर नैसर्गिक चमक देखील येईल.

(केसगळती रोखण्यासाठी करा हा रामबाण उपाय, महिन्याभरात केसांमध्ये दिसेल आश्चर्यकारक फरक)

​केस योग्य पद्धतीने सुकवा

केसांसाठी सिंथेटिक बोअर ब्रिसल ब्रशचा वापर करावा. अशा प्रकारच्या ब्रशचा वापर केल्यास केसांवर चमक येण्यास मदत मिळते. तसंच केस सुकवण्यासाठी कधीही ड्रायरचा वापर करू नये. कारण यामुळे केस कोरडे होण्याची शक्यता असते.

(Natural Hair Care केसगळती कशी रोखावी? अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला नैसर्गिक उपाय)

हलक्या हातानं केसांचा कंगवा करावा म्हणजे केस तुटणार नाहीत. यानंतर ब्रशच्या मदतीने केसांमध्ये भांग पाडून ब्लो ड्राय करून घ्या.

(Hair Care Tips केसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन; मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर)

​आपले केस स्ट्रेट करा

केस सरळ करण्यासाठी स्ट्रेटनर किंवा ब्रशचा देखील आपण वापर करू शकता. हेअरलाइनच्या भोवती एक शेप सेट करून घ्यावा. ब्लो-ड्राय केल्यानंतर हेअर सीरम देखील लावू शकता. केसांवर सीरम लावल्यामुळे केस थोडे तेलकट दिसतील. पण केस सरळ होऊन सुकल्यानंतर केसांमधील तेल आपोआप कमी होईल. स्ट्रेटनिंग पूर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा ड्राय ऑइलचा वापर करू शकता.

(Skin Care Tips आयुर्वेदिक वनस्पतींपासून केस व त्वचेच्या समस्या कशा दूर कराव्यात, जाणून घ्या पद्धत)

बहुगुणी एरंडेल तेल

(Natural Hair Care टक्कल पडण्याची आहे भीती? केसगळती रोखण्यासाठी या नैसर्गिक तेलांचा करा वापर)

NOTE : केसांशी (Hair Care Tips) संबंधित कोणत्याही ट्रीटमेंट करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाच्या केसांचा पोत आणि प्रकार वेगळा असतो. केसांचे नुकसान टाळण्यासाठी दुसऱ्यांचे हेअर केअर रुटीन फॉलो करू नये.

(Hair Care Tips केसांच्या वाढीसाठी नेमकी काय घ्यावी काळजी? हेअर प्रोडक्ट्सचा कोणत्या क्रमाने करावा वापर)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *