Hair Care लांबसडक केस असल्यास ‘या’ चुका करणं तुम्हाला पडू शकतं महाग

Spread the love

​हेअर केअर रूटीन नियमित फॉलो करा

सूर्याची हानिकारक किरणे आणि हेअर स्टायलिंगमुळे केसांचे भरपूर नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा केसांना तेल मसाज करावा आणि हेअर मास्क देखील लावणं आवश्यक आहे. महिन्यातून एकदा तुम्ही हेअर स्पा ट्रीटमेंट देखील घेऊ शकता.

(घरच्या घरी या ६ नैसर्गिक सामग्रींपासून तयार करा फेस पॅक, संमिश्र त्वचा होईल तजेलदार व चमकदार)

​केमिकलयुक्त प्रोडक्टपासून राहा दूर

पॅराबेन आणि अ‍ॅल्कोहोलयुक्त हेअर केअर प्रोडक्ट वापरणं टाळावे. आपल्या लांबसडक केसांना नैसर्गिक सामग्रींद्वारे पोषण तत्त्वांचा पुरवठा करण्यावर भर द्या. यासाठी तुम्ही नैसर्गिक तसंच आयुर्वेदिक उपचारांची मदत घेऊ शकता. केसांचे नुकसान टाळण्यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्टचा आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये समावेश करू नये.

(Almonds Skincare बदामामुळे कोरड्या त्वचेपासून होईल सुटका, जाणून घ्या योग्य पद्धत)

​प्‍लास्टिक ब्रश

कंगवा करण्यासाठी केवळ लाकडी किंवा सिरॅमिक ब्रशचा वापर करावा. यामुळे आपल्या टाळूच्या त्वचेवर अधिक दुष्परिणाम होत नाहीत आणि नैसर्गिक तेल टाळूवर पसरण्यासाठीही मदत मिळते.

(Natural Hair Care केसांच्या वाढीसाठी ‘हे’ व्हिटॅमिन्स आहेत पोषक, केसगळतीची समस्याही होते दूर)

​कोणत्या शॅम्पूचा वापर करावा?

टाळूवरील नैसर्गिक तेल कमी होईल अशा हानिकारक शॅम्पूचा वापर करणं टाळावं. लांबसडक केसांवर अधिक प्रमाणात केमिकलयुक्‍त शॅम्पूचा वापर केल्यास केसांच्या मुळांवर दुष्परिणाम होऊ लागतात आणि केस अधिक कोरडे व निर्जीव देखील होतात. यासाठीच सौम्य शॅम्पू आणि कंडिशनरचा उपयोग करावा.

(Natural Hair Care लांबसडक व चमकदार केसांसाठी वापरा दह्याचे पॅक, जाणून घ्या पद्धत)

​केस ट्रिम करणं आवश्यक

काही दिवसांच्या अंतराने केस ट्रिम करणं आवश्यक आहे. यामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. यासाठीच न विसरता प्रत्येक महिन्यात ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केस ट्रीम करावेत. यामुळे दुभंगलेल्या केसांची समस्या दूर होते.

(Ayurvedic Remedies टाळूला येणारी खाज कमी करण्यासाठी करा हे आयुर्वेदिक उपाय, केसगळतीही होईल कमी)

​ओल्या केसांवर हेअर टुलचा वापर करू नये

ओले केस सुकवण्यासाठी ब्लो ड्रायरचा वापर करणं टाळा. केस सुकवण्यासाठी टॉवेलचा उपयोग करावा. ओल्या केसांवर कधीही ड्रायर किंवा अन्य हीटिंग टुलचा उपयोग करू नये. याव्यतिरिक्त केसांसाठी मायक्रोफायबर टॉवलचाच वापर करावा. तसंच जर तुम्हाला केसांवर हेअर स्‍टायलिंग टुलचा वापर करणं गरजेचं असल्यास त्याआधी हेअर सीरम किंवा हीट प्रोटेक्‍टेंट प्रोडक्टचा उपयोग करावा.

(Natural Care चमकदार व लांबसडक केसांसाठी घरच्या घरी तयार ‘हे’ प्रोटीन पॅक हेअर मास्क)

NOTE केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *