Hair Care Tips पुरुषांसाठी केस काळे करण्याचा रामबाण उपाय, नारळ तेलात मिक्स करा केवळ ‘या’ गोष्टी

Spread the love

बदलत्या जीवनशैलीनुसार बहुतांश जण केसांशी संबंधित समस्येमुळे त्रस्त आहेत. काही जणांना लहान वयातच केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतोय. यामागील प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतात. उदाहरणार्थ अनुवांशिक, पौष्टिक आहाराचे अभाव, ताणतणाव इत्यादी. दरम्यान अनुवांशिक कारणामुळे केस पांढरे झाले असतील तर नैसर्गिक स्वरुपात केस पुन्हा काळे होणार नाहीत, हे लक्षात घ्यावे.

काही पुरुष केस काळे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शॅम्पू आणि कंडिशनरचा उपयोग करतात. पण केमिकलयुक्त प्रोडक्टच्या वापरामुळे केसांचे नुकसानच अधिक होते. हे नुकसान टाळण्यासाठी नैसर्गिक उपचारांची मदत घेतल्यास केसांना दीर्घकाळासाठी लाभ मिळतील. यासाठी आपण नारळाच्या तेलाचा हेअर केअर रुटीनमध्ये समावेश करू शकता. नारळाच्या तेलामध्ये अन्य नैसर्गिक सामग्री मिक्स करून घरच्या घरी केसांसाठी तेल कसे तयार करायचे? जाणून घेऊया माहिती.
(Natural Hair Care Tips पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतात का? जाणून घ्या माहिती)

​कसे तयार करायचे नैसर्गिक तेल?

स्वयंपाकामध्ये वापरल्या जाणाऱ्या मेथी आणि कांद्याच्या बियांचा वापर करून आपण घराच्या घरी केसांसाठी नैसर्गिक तेल तयार करू शकता. आपल्या केसांना नैसर्गिक काळा रंग येण्यासाठीही या सामग्री प्रभावी आणि लाभदायक आहेत. मेथी आणि कांद्याच्या बियांमध्ये विशेष औषधी गुणधर्म आहेत, जे आपल्या केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात.

(Hair Care Tips या ६ कारणांमुळे सुरू होते केसगळती; दुर्लक्ष करू नका, लवकरच करा योग्य उपाय)

​मेथी व कांद्याच्या बिया केसांसाठी पोषक

नारळाच्या तेलामध्ये मेथी व कांद्याच्या बिया मिक्स करा. यातील नैसर्गिक आणि औषधी गुणधर्म आपल्या केसांच्या आरोग्यासाठी पोषक आहेत. योग्य पद्धतीने वापर केल्यास केसांना दीर्घकाळासाठी लाभ मिळतात. मेथी आणि कांद्याची बिया मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या. यानंतर नारळाचे तेल गरम करताना त्यामध्ये मेथी व कांद्याच्या बियांची वाटलेली पेस्ट मिक्स करावी. गॅस बंद करून तेल थंड होण्यास ठेवून द्या. हा नैसगिक उपाय काही दिवस सलग केल्यास केसांना दीर्घकाळासाठी लाभ मिळतील. तसंच तुम्हाला केसांमध्ये सकारात्मक बदल देखील दिसतील.

(Natural Hair Care कोंडा व कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी वापरा चण्याचे हेअर पॅक)

​तेल तयार करण्यासाठी सामग्री

  • नारळाचे तेल
  • मेथी – एक चमचा
  • कांद्याच्या बिया – एक चमचा

(पहिल्या प्रेग्नेंसीनंतर करीना केसगळतीमुळे होती त्रस्त, ऋजुता दिवेकरने तिला सांगितले हे उपाय)

(केसगळती रोखण्यासाठी करा हा रामबाण उपाय, महिन्याभरात केसांमध्ये दिसेल आश्चर्यकारक फरक)

​तेल तयार करण्याची विधि

  • सर्वप्रथम मेथी आणि कांद्याच्या बिया मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या. या बियांची बारीक पेस्ट तयार करा.
  • पेस्ट एका वाटीमध्ये काढा. आता गॅसवर नारळाचे तेल गरम करत ठेवा.
  • तेलामध्ये मेथी व कांद्याच्या बियांची पेस्ट मिक्स करा. १० मिनिटांसाठी तेल उकळू द्या.
  • गॅस बंद करून तेल थंड होण्यास ठेवून द्या. तेल थंड झाल्यानंतर एका बाटलीमध्ये भरा.
  • हातांवर तेल घ्या आणि मुळांसह संपूर्ण केसांना लावा. हलक्या हाताने केसांचा मसाज करावा.
  • हा उपाय आपण आठवड्यातून दोनदा करू शकता.
  • या नैसर्गिक तेलामुळे तुमच्या केसांना भरपूर लाभ मिळतील.

(Hair Care Tips केसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन; मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर)

केसगळती होण्यामागील मुख्य कारण

NOTE केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(Natural Hair Care केसगळती कशी रोखावी? अभिनेत्री रवीना टंडनने सांगितला नैसर्गिक उपाय)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *