Hair Care Tips रात्रभर केसांवर लावा हे हेअर मास्क, सकाळी दिसतील आश्चर्यकारक बदल

Spread the love

केस घनदाट आणि काळेशार असतील तर प्रत्येकाचीच नजर आपल्याकडे आपोआप वळते. सुंदर, मऊ, घनदाट आणि लांबसडक केस असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण धूळ, माती, प्रदूषणामुळे आपल्या केसांवर (Hair Care) दुष्परिणाम होऊ लागतात. तसंच केसांच्या देखभालीकडे वेळ दिला नाही तरीही तुमच्या त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. यासाठी तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केमिकलयुक्त महागडी ट्रीटमेंट करता.

पण यामुळे तुमच्या केसांना फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होते. हे धोके टाळण्यासाठी केसांसाठी घरगुती उपाय करून पाहा. घरगुती हेअर मास्क (Hair Mask) आपल्या केसांना रात्रभर लावून ठेवा. यामुळे तुमच्या निर्जीव झालेल्या केसांमध्ये जीव येईल. आज आम्ही तुम्हाला हेअर मास्क तयार करण्याची पद्धत सांगणार आहोत. हे हेअर मास्क चार सामग्रींपासून तयार केलं जाते.

​ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलचा (Olive Oil Benefits) योग्य पद्धतीनं वापर केल्यास आपल्या केसांशी संबंधित बहुतांश समस्या कमी होण्यास मदत मिळेल. ऑलिव्ह ऑइलमधील (Olive Oil Benefits For Hair) पोषण तत्त्वांमुळे आपले केस मऊ होण्यास मदत मिळते. यामुळे कोरडे केस आणि आपल्या टाळूला पोषक घटकांचा पुरवठा होतो. ऑलिव्ह ऑइलमधील पोषक तत्त्वे केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात. यामुळे निस्तेज आणि खराब झालेल्या केसांची समस्या कमी होऊन, केसांवर चमक येते.

(Hair Care: केसगळती आणि कोंड्यामुळे आहात हैराण? घरातच तयार करा हे स्क्रब)

​अ‍ॅव्होकाडो

अ‍ॅव्होकाडोमध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्त्वांचा साठा आहे. यातील औषध गुणधर्म आपली त्वचा, शरीर आणि केसांसाठी पोषक आहेत. यातील घटकांमुळे आपल्या कोरड्या केसांची समस्या कमी होते, निस्तेज केसांमध्ये जीव येतो आणि केसांची वाढ देखील चांगल्या पद्धतीनं होते. याव्यतिरिक्त अ‍ॅव्होकाडोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन डी आणि बीटा कॅरोटीन या व्यतिरिक्त अन्य गुणधर्मांचाही साठा आहे. मुख्यतः या फळामुळे कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

(केसांच्या प्रकारानुसार आठवड्यातून किती वेळा शॅम्पू करावा? वाचा ही माहिती)

​केसांच्या वाढीसाठी

कोरडे, कमकुवत, निर्जीव केसांवर उपाय म्हणून तुम्ही अ‍ॅव्होकाडो तेलाचा वापर करू शकता. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. अ‍ॅव्होकाडोच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी चे भरपूर प्रमाण आहे. ज्यामुळे केस मजबूत होतात. एक चमचा अ‍ॅव्होकाडो तेल आणि एक चमचा नारळाचे तेल एकत्र घ्या. आंघोळ करण्यापूर्वी दोन्ही तेल मिक्स करून केसांचा मसाज करा. तीस मिनिटांनंतर आपले केस स्वच्छ धुऊन घ्या.

(कोंडा,केसगळतीच्या त्रासातून हवीय सुटका? वापरा मुलतानी मातीचे ६ हेअर पॅक)

​मध

मधामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिनचा साठा आहे. ज्यामुळे केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते. यामुळे निस्तेज केसांचे आरोग्य चांगले होण्यास मदत मिळते. केसांमधील कोंडा, केस गळती, केस तुटणे, केस दुभंगणे यांसारख्या समस्या कमी होतात. केसांची वाढ योग्य प्रकारे होऊ लागते. केसांमध्ये अँटी ऑक्सिडेंट चे गुणधर्म असतात. हे घटक केसांसाठी पोषक आहेत. यामुळे आपल्या टाळूची त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते.

(घरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय)

​अंडी

अंड प्रोटीन, फॅटी अ‍ॅसिड, खनिजे आणि व्हिटॅमिन या घटकांचा उत्तम स्त्रोत आहे. हे सर्व घटक आपल्या केसांसाठी पोषक आहेत. यामध्ये अँटी ऑक्सिडेंट देखील असतात. अंड्याचा योग्य पद्धतीनं केसांसाठी वापर केल्यास केसांना चांगली वाढ होते. केस मजबूत देखील होतील. ब्युटी पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करण्याऐवजी केसांची अंड्याचा मास्क वापरा, केसांवर नैसर्गिक चमक येईल. शिवाय केस गळतीची समस्या देखील कमी होईल.

(आठवड्याभरात केसांच्या समस्या होतील कमी, भृंगराज तेलानं असा करा मसाज)

असे तयार करा हेअर मास्क

सामग्री : एक अ‍ॅव्होकाडो, एक अंड, दोन चमचे मध, दोन चमचे ऑलिव्ह ऑइल

ही सर्व सामग्री एकत्र घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा. यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता. पेस्ट तयार झाल्यानंतर केसांना लावा. तीस मिनिटांसाठी हेअर मास्क राहू द्यावे किंवा तुम्ही रात्रभर देखील हे मास्क लावून ठेवू शकता. यासाठी शॉवर कॅपचा वापर करा. दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पू आणि थंड पाण्यानं केस धुवावे.

(Hair Wash: गरम पाण्यानं केस धुण्याची चूक करू नका,पडू शकतं टक्कल)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *