Hair Care Tips स्ट्रेटनिंग टीट्रमेंट केल्यानंतर केसांची अशी काळजी घेणे आहे गरजेचं

Spread the love

बदलती जीवनशैली आणि स्पर्धेच्या युगात सर्वांनाच सुंदर व आकर्षक दिसण्याची इच्छा असते. यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतात. काही तरुणी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट सुद्धा करतात. यातही महिला वर्गामध्ये केसांचे स्ट्रेटनिंग करण्याची क्रेझ सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळते. हल्ली बाजारामध्ये स्ट्रेटनर मशिन देखील उपलब्ध आहे. याद्वारेही केसांचे स्ट्रेटनिंग करता येऊ शकते, पण यामुळे केस तात्पुरत्या स्वरुपात सरळ होतात.

जर तुम्हाला कायमस्वरुपी केस सरळ करून घ्यायचे असतील, तर या ट्रीटमेंटनंतर तुम्हाला केसांची भरपूर काळजी घ्यावी लागेल. कारण ही ट्रीटमेंट केल्यानंतर सुरुवातीला तुमचे केस सुंदर दिसतील. पण योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि निस्तेज दिसू लागतात. स्ट्रेटनिंगनंतर केसांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, जाणून घेऊया सविस्तर माहिती.
(Hair Oil केमिकलयुक्त हेअर डाय ठेवा दूर, केसांसाठी वापरा हे नैसर्गिक तेल)

​उन्हापासून केसांचे संरक्षण करा

सध्याच्या फॅशनेबल युगात खूप कमी जणांना कुरळ्या केसांची स्टाइल पसंत असते. पण काही जणांना त्यांचे नैसर्गिक स्वरुपात असलेले कुरळे केस आवडत नसल्याने स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट केली जाते. ही ट्रीटमेंट महागडी असतेच शिवाय यानंतर केसांची भरपूर काळजी घ्यावी लागते. सरळ केलेल्या केसांचे धूळ, माती आणि उन्हापासून बचाव करणं आवश्यक आहे. कारण सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे केसांचे भरपूर नुकसान होते. यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी केसांवर स्कार्फ बांधण्यास विसरू नका.

(Natural Skin And Hair Care बहुगुणी केळ्याच्या फुलाचे फायदे, त्वचा व केसांसाठी असा करू शकता वापर)

​केसांना असा करा कंगवा

केस ओले असताना केसांमध्ये कधीही कंगवा फिरवू नये. तसंच केसांचा गुंता सोडवण्यासाठी मोठे दात असलेल्या कंगव्याचा वापर करावा. असे न केल्यास केस तुटण्याची शक्यता असते. केसांचे हे नुकसान टाळण्यासाठी या छोट्या-छोट्या गोष्टीकडे नीट लक्ष दिल्यास तुम्हाला भरपूर मदत मिळू शकते. दरम्यान स्‍ट्रेटनिंग ट्रीटमेंटमध्ये केमिकलचा वापर केला जातो. यामुळे केस कमकुवत होतात.

(Natural Hair Oil केसांसाठी घरामध्ये कसे तयार करायचे कोरफडीचे तेल, जाणून घ्या फायदे)

​केस धुण्यासाठी या पाण्याचा वापर करावा

केस धुण्यासाठी चुकूनही गरम पाण्याचा वापर करू नये. गरम पाण्यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा आणि मॉइश्चराइझरवर वाईट परिणाम होतात. तसंच केसांवरील चमक देखील नाहीशी होऊ लागते. यासाठी खबरदारी म्हणून केस थंड किंवा कोमट पाण्याने धुवावेत. थंड पाण्यामुळे केसांमधील ओलावा टिकून राहतो आणि केसांवरील चमक देखील वाढण्यास मदत मिळते.

(Skin And Hair Care त्वचा व केसांसाठी वापरून पाहा केसरचे तेल, जाणून घ्या घरगुती तेलाची रेसिपी)

​हेअर कलर वापरू नका

केस सरळ केल्यानंतर कधीही मेहंदी किंवा कोणत्याही केमिकलयुक्त कलरचा त्यावर प्रयोग करू नये. जर तुम्हाला यापैकी एखाद्या गोष्टीचा वापर करायचा असेल तर त्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. केसांचे नुकसान होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा केसगळती, केस तुटणं इत्यादी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

(Skin And Hair Natural Care त्वचा आणि केसांसाठी ‘या’ प्रकारच्या पाण्याचा करावा उपयोग)

​शॅम्पूचा अति वापर करणं टाळा

स्ट्रेटनिंग केलेल्या केसांना जास्त प्रमाणात शॅम्पू लावणे टाळावे. शॅम्पूचा अति वापर केल्यानं केसांचा पोत बिघडतो. केस कोरडे आणि निर्जीव होऊ लागतात. तसंच तुमच्या हेअर स्टायलिस्टने सांगितलेल्या शॅम्पूचाच वापर करावा.

(Natural skin Care तांदळाच्या पाण्याने कशी तयार करायची मॉइश्चराइझिंग क्रीम, जाणून घ्या पद्धत)

NOTE त्वचेप्रमाणेच प्रत्येकाच्या केसांचाही प्रकार वेगवेगळा असतो. यामुळे कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *