Hair Mask For Winter हिवाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी वापरा मधाचे ६ नैसर्गिक हेअर पॅक

Spread the love

​मध आणि अंड्याचे हेअर पॅक

मऊ आणि चमकदार केसांसाठी मध आणि अंड्याचे हेअर पॅक वापरा. मधामुळे केस हायड्रेट राहतात आणि अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर असते. ज्यामुळे केसांची चांगली वाढ होते. हे हेअर पॅक तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये अंड्याचे पांढरा भाग आणि एक मोठा चमचा मध एकत्र घ्या. हवे असल्यास आपण या मिश्रणामध्ये एक चमचा बदाम तेल देखील मिक्स करू शकता. २० ते ३० मिनिटांसाठी हेअर पॅक आपल्या केसांवर लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.

(Natural Hair Care या सहा चुकीच्या सवयींमुळे पुरुषांचे केस होतात पातळ, वेळीच द्या लक्ष)

​मध आणि कोकोनट क्रीम पॅक

या हेअर पॅकमुळे तुमचे केस चमकदार होण्यास मदत मिळेल. यासाठी आपण आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळणाऱ्या कोकोनट क्रीमचा वापर करू शकता. एका वाटीमध्ये क्रीम आणि एक चमचा मध एकत्र घ्या. दोन्ही सामग्री नीट एकजीव करून घ्या. यानंतर लेप टाळू आणि केसांवर लावा. हलक्या हाताने केसांचा मसाज करावा. तासाभरानंतर हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत.

(केसगळती रोखण्यासाठी व केसांच्या वाढीसाठी रामबाण आहे ‘हे’ आयुर्वेदिक तेल)

​दूध आणि मध हेअर पॅक

या हेअर पॅकमुळे आपल्या केसांना पोषण तत्त्वांचा खोलवर पुरवठा होण्यास मदत मिळते. यामुळे केस निरोगी आणि मऊ होतात. हेअर पॅक तयार करण्यासाठी एक चमचा मधामध्ये कपभर दूध मिक्स करा. हे मिश्रण आपल्या केसांवर लावा. ३० मिनिटांनंतर पॅक सुकल्यानंतर केस हर्बल शॅम्पूने स्वच्छ धुऊन घ्यावेत.

(Winter Hair Tips थंडीमध्ये केस होतात जास्त कोरडे? अशी सात प्रकारे घ्या योग्य काळजी)

​दही, मध आणि ऑलिव्ह ऑइल हेअर पॅक

दह्यामध्ये प्रोटीन आणि लॅक्टिक अ‍ॅसिड असते. हे घटक आपले केस हायड्रेट ठेवण्याचं काम करतात. याव्यतिरिक्त मध आणि ऑलिव्ह ऑइलमुळे केसांना ओलावा मिळतो. हेअर पॅक तयार करण्यासाठी वाटीमध्ये अर्धा कप दही, तीन – चार मोठे चमचे मध आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. हे पॅक आपल्या टाळू आणि केसांवर लावा. अर्ध्या तासानंतर केस थंड पाण्याने धुऊन घ्या.

(Healthy Hair Oil: जाड केसांसाठी तयार करा हे घरगुती आयुर्वेदिक तेल, जाणून घ्या पद्धत)

​अ‍ॅव्होकाडो आणि मध हेअर पॅक

अ‍ॅव्होकाडोतील घटक आपल्या केसांच्या आरोग्यासाठी पोषक आहेत. या फळामुळे केसांना नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळते. आपल्या केसांचे संरक्षण देखील होते. केसांना अधिक प्रमाणात लाभ मिळण्यासाठी अ‍ॅव्होकाडो आणि मधाचे हेअर पॅक वापरा. यासाठी एक अ‍ॅव्होकाडो घ्या आणि वाटीमध्ये मॅश करा. यानंतर त्यात एक चमचा मध मिक्स करा. हवे असल्यास यामध्ये आपण ऑलिव्ह ऑइल देखील मिक्स करू शकता. तासभरासाठी पॅक केसांवर लावून ठेवा. यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. केसांमध्ये कोंडा असल्यास हेअर पॅकमध्ये एक चमचा लव्हेंडर ऑइल मिक्स करू शकता.

(करीना-अनुष्‍कासह अन्य सेलिब्रिटीही करतात मुरुमांचा सामना, करतात हे नैसर्गिक उपाय)

​भोपळा आणि मध हेअर पॅक

भोपळ्यामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई अधिक प्रमाणात असते. या पोषक घटकांमुळे टाळूच्या भागातील रक्तप्रवाह वाढतो. यामुळे केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. हेअर पॅक तयार करण्यासाठी अर्धा कप भोपळ्याची प्युरी आणि दोन चमचे मध मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर केसांवर लावा आणि शॉवर कॅप घाला. १५ ते २० मिनिटांनं हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या.

(Natural Remedies केसांच्या वाढीसाठी टाळूचे करा स्क्रबिंग, असे तयार करा घरगुती स्कॅल्प स्क्रब)

NOTE केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नये.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *