Hair Oil केमिकल हेअर डाय आता ठेवा दूर, या घरगुती तेलामुळे केस नैसर्गिकरित्या होतील काळे

Spread the love

केस पांढरे होणे ही आता सामान्य समस्या आहे. हल्ली लहान वयातच कित्येकांना या समस्येचा सामना करावा लागतो. योग्य वेळेत यावर उपाय न केल्यास सर्व केस पांढरे होऊ शकतात. काही जण पांढरे केस काळे (Hair Care Tips) करण्यासाठी बाजारात मिळणारे केमिकलयुक्त हेअर डाय किंवा कलरचा वापर करतात. पण वारंवार अशा प्रोडक्टचा वापर केल्यास केसांचे भरपूर नुकसान होऊ शकते.

डाय लावण्याऐवजी घरातील बहुपयोगी नैसर्गिक सामग्रींपासून केसांसाठी तेल तयार करा. नियमित या तेलाचा योग्य प्रमाणात वापर केल्यास केसांना भरपूर लाभ मिळतील. केसांशी संबंधित समस्या कमी करण्यास उपयुक्त ठरेल अशा घरगुती रामबाण तेलाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. यातील पोषक गुणधर्मामुळे केस काळे होतीलच, शिवाय घनदाट आणि मजबूत देखील राहतील. घरात उपलब्ध असणाऱ्या सामग्रीपासून हे तेल सहजरित्या तयार करता येते. चला तर जाणून घेऊया तेल तयार करण्याची पद्धत.

​​तेल तयार करण्यासाठी लागणारी सामग्री

नैसर्गिक कोरफड जेल, एक कप नारळ तेल, दोन चमचे एरंडेल तेल, ८ ते १० काळ मिरी, दोन चमचे कांद्याच्या बिया, एक आवळा, एक चमचा मेथी दाणे, १५ ते २० कढीपत्त्याची पाने

कसे तयार करण्याचे तेल :

तुमच्या घरात कोरफडीचे रोपटे असल्यास उत्तम. या रोपट्यातून कोरफडीचा ताजा गर काढून घ्या. आता गॅसवर एक भांडे गरम करत ठेवा. त्यात नारळाचे तेल, एरंडेल तेल, कांद्याच्या बिया, कोरफड जेल आणि अन्य सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या.

(Hair Colour केसांसाठी या तेलांपासून घरामध्येच तयार करा हर्बल कलर)

​तेल थंड करून लावा

हे मिश्रण पाच ते सहा मिनिटांसाठी गरम होऊ द्यावे. तेल जास्त प्रमाणात गरम करायचे नाही, हे लक्षात असू द्या. अन्यथा सर्व सामग्री करपण्याची शक्यता असते. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. मिश्रण थंड होऊ द्या. तयार झालेले तेल दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घ्या आणि एका बॉटलमध्ये भरून ठेवा.

(Skin Care Tips निरोगी त्वचेसाठी लिंबूपासून घरामध्येच तयार करा टोनर)

कधी आणि कसे लावायचे तेल?

केस काळेशार राहावेत, यासाठी हे तेल आठवड्यातून दोन वेळा आंघोळ करण्यापूर्वी लावावे. कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांना हे तेला लावा आणि हलक्या हाताने केसांचा मसाज करावा. ३० मिनिटांसाठी तेल केसामध्ये राहू द्यावे. शक्य असल्यास रात्रभर देखील तेल केसांमध्ये लावून ठेवा शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हर्बल शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ धुऊन घ्या.

(Hair Care घनदाट, लांबसडक केसांसाठी वापरा बेसन आणि दही हेअर मास्क)

​आवळा, कांद्याच्या बिया आणि कोरफड

आवळ्यामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ जास्त प्रमाणात असते. या जीवनसत्त्वामुळे केस काळे होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त त्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटचे गुणधर्म देखील आहेत, जे केसांच्या मुळांचे संरक्षण करण्याचे कार्य करतात. यामुळे आपले केस निरोगी राहतात आणि केसांची वाढ देखील चांगली होते.

कांद्याच्या बिया : केसांच्या वाढीसाठी कांद्याच्या बियांच्या तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये निगेलोन आणि थायमोक्विनोन यासारखे एन्झाइम असतात. या घटकांमुळे केसांना पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. महत्त्वाचे म्हणजे यामुळे टक्कल पडण्याची समस्याही दूर होण्यास मदत मिळते.

(Tips For Hair Care मेहंदीच्या पानांमुळे पांढऱ्या केसांची समस्या होईल दूर, जाणून घ्या फायदे)

​कोरफड

कोरफडमध्ये अमिनो अ‍ॅसिड आणि प्रोटेयोलिटिक एन्झाइमचे प्रमाण जास्त असते. हे घटक आपले केस मजबूत ठेवण्याचे काम करतात तसंच केसांची वाढ होण्यासही मदत मिळते. सोबतच यामध्ये अँटी सेप्टिक आणि अँटी फंगल गुणधर्म देखील आहेत. ज्यामुळे केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत मिळते. कोरफडमधील औषधी घटकांमुळे केसांना नैसर्गिक स्वरुपात काळा रंग मिळू शकतो.

(Hair Care केसगळती रोखण्यासाठी करा हे ७ घरगुती उपाय, जाणून घ्या पद्धत)

​नारळाचे तेल

नारळाच्या तेलामुळे केस लांबसडक, घनदाट आणि मजबूत होतात. शिवाय केसांची वाढ देखील चांगल्या पद्धतीने होते. नारळाच्या तेलामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन आणि फॅटी अ‍ॅसिडमुळे आपल्या टाळूच्या त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे टाळूच्या त्वचेवरील रोमछिद्रांमधून सीबमचा अति प्रमाणात होणारा स्त्राव नियंत्रणात येण्यास मदत मिळते. या तेलाच्या वापरामुळे केस मऊ आणि चमकदार राहण्यास मदत मिळते.

(Home Remedies कापूरसह नारळाच्या तेलाने करा केसांचा मसाज, कोंडा होईल कमी)

​एरंडेल तेल

एरंडेल तेलामुळे आपल्या टाळूची त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. मुळांसह केसांना भरपूर पोषक घटकांचा पुरवठा होतो. यामध्ये रिकिनोइलिक अ‍ॅसिड आणि ओमेगा- ६ फॅटी अ‍ॅसिड असते. यामुळे जेव्हा एरंडेलच्या तेलाने मसाज केल्यानंतर रक्त प्रवाह वाढतो आणि केसांची वाढ होण्यास मदत मिळते.

(चमकदार त्वचा आणि काळ्याशार केसांसाठी क्रीम व शॅम्पू नव्हे, तर लावा हे रामबाण नैसर्गिक तेल)

NOTE केसांसाठी कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञमंडळींचा सल्ला घ्यायला विसरू नका. केसांचे नुकसान टाळण्यासाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतल्यानंतरच योग्य ते उपाय करावेत.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *