(चेहरा व केसांच्या सौंदर्यासाठी संजीवनी ठरेल हे घरगुती आयुर्वेदिक तेल)
केसांपेक्षा टाळूचा मसाज अधिक महत्त्वाचा
केसांना दररोज तेल लावून मसाज करणे फायदेशीर ठरत नाहीत. यामुळे तुमची केसगळतीची समस्या अजिबात दूर होणार नाही. केसांऐवजी आपल्या टाळूचा तेलाने मसाज करावा. टाळूच्या त्वचेचे आरोग्य निरोगी असल्यास केसांचे आरोग्य निरोगी राहते, हे बाब लक्षात घ्या. शक्य असल्यास टाळूचा तेलानं किंवा तेलाशिवाय मसाज करावा. तसंच केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरणं बंद करावे.
(Hair Care Tips रात्रभर केसांवर लावा हे हेअर मास्क, सकाळी दिसतील आश्चर्यकारक बदल)
तेल मसाज करण्याची योग्य पद्धत

हातांवर कोमट तेल घ्या आणि हलक्या हाताने टाळूवर लावा. यानंतर हाताच्या बोटांनी जवळपास १० ते १५ मिनिटांपर्यंत टाळूचा (Hair Growth Tips) मसाज करावा. जोर देऊन टाळू रगडू नये. मसाजनंतर तासाभरासाठी केसांमध्ये तेल राहू द्यावे. यानंतर हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावे. मसाज केल्याने रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे केस लांबसडक, घनदाट आणि काळेशार होण्यास मदत मिळेल.
(Hair Colour केसांसाठी या तेलांपासून घरामध्येच तयार करा हर्बल कलर)
कोणते तेल ठरेल फायदेशीर ?

सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तेल उपलब्ध आहेत. पण नैसर्गिक तेलांचा वापर केल्यास अधिक फायदे मिळतील. उदाहरणार्थ ऑलिव्ह ऑइल, नारळाचे तेल, कडुलिंबाचे तेल, जोजोबा ऑइल, चमेलीचे तेल, पुदिन्याचे तेल, तिळाचे तेल, बदामाचे तेल, भृंगराज तेल, लव्हेंडर ऑइल इत्यादी नैसर्गिक तेलांचा वापर करावा. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास उत्तम.
(Hair Care मऊ आणि चमकदार केस हवे आहेत? वापरा मोहरीचे हेअर पॅक)
कोरड्या केसांची कशी घ्यावी काळजी?

भरपूर प्रमाणात तेल लावले तर कोरडे केस मऊ होतील, अशा गैरसमजुतीत राहू नका. जास्त तेल लावल्याने स्कॅल्पचे पोअर्स बंद होतात आणि त्यावर धूळ, मातीचे कण जमा होऊ लागतात. टाळूवर दुर्गंध साचल्याने फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. यामुळे टाळूला खाज सुटणे, केसगळती, केस तुटणे इत्यादी समस्या उद्भवतात. योग्य वेळीच उपाय न केल्यास या समस्या गंभीर होऊ शकतात.
(चेहरा व केसांच्या सौंदर्यासाठी संजीवनी ठरेल हे घरगुती आयुर्वेदिक तेल)
तेलामुळे अॅलर्जी झाल्यास काय करावे?

तेल लावल्याने तुम्हाला अॅलर्जीचा सामना करावा लागत असल्यास अन्य उपाय करून तुम्ही आपल्या केसांना पोषण तत्त्वांचा पुरवठा करू शकतो. तेलाऐवजी तुम्ही अंड्यापासून तयार केलेलं हेअर पॅक, मेहंदीच्या ताज्या पानांची पेस्ट, आवळा किंवा अश्वगंधापासून तयार केलेलं हेअर मास्क वापरू शकता. या नैसर्गिक उपचारांमुळे केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळू शकते.
(Hair Growth केसांसाठी करा ४ रामबाण उपाय, केसगळती-कोंड्यापासून मिळेल सुटका)
Source link
Recent Comments